नको जीव झालाय, अगदी नको. वाटतं पळून जावं, जीव द्यावा असं क्वचित मनात येणं वेगळं. पण सतत निराश वाटणं, मनात आत्महत्येचे विचार येणं ही धोक्याची घंटा आहे. जगणं परीक्षा पाहतंच पण म्हणून आपण अगदी मरुन जावंसं वाटतंय इतपत विचार करणं घातकच असतं. एक परीक्षा, एक इंटरव्ह्यू आणि त्यात आलेलं अपयश संपूर्ण आयुष्यापेक्षा मोठं कधीच नसतं. अगदी प्रेमभंगही. कुणी कितीही आवडत असला किंवा असली तरी आपल्या जीवापेक्षा काही आणि कुणीच मोठं नाही. अनेकदा आपल्या आयुष्यात भयंकर अनपेक्षित प्रसंग येतात. ताण वाढतो. कधी आपला अपमान होताे, कधी कुणी कमी लेखतं, कधी आर्थिक तंगी, कधी कुणी छळतं, कधी समोर वाटतच दिसत नाही. अशावेळी निराश होणं, स्वत:वरचा ताबा सुटणंही साहजिकच असतं. पण तीच वेळ असते स्वत:ला सावरुन पुन्हा उभं राहण्याची.अपयश कुणाच्या आयुष्यात येत नाही, त्याकडे आपण कसं पाहतो हाच खरा मुद्दा आहे..
(Image : google)
नक्की होतं काय?
१. स्वत:च्याच अपेक्षा पूर्ण करू न शकणं२. एकाच मार्गाकडे बघणं आणि तिथं अपयश आलं तर सगळं संपलं असं म्हणणं.३. आपल्याला अपयश आलं तर काय अशी सतत भीती वाटणं.४. स्वत:विषयी भलतीसलतीच मतं असणं.
(Image : google)
उपाय काय?
१. जर कोणी त्यांचे प्रश्न मांडत असतील तर ते ऐकून घ्या. त्यांना सकारात्मक मार्ग सुचवा.२. मदत मागा, आपल्याही समस्या इतरांना सांगा.३. प्रॅक्टिकल राहा.४. आपले आनंद इतरांवर अवलंबून ठेवू नका.५. आपण हतबल आहोत असं वाटलं तर जवळचे मित्रमैत्रिणी नाहीतर सरळ डॉक्टरशी बोला.६. कुठलंही अपयश किंवा व्यक्ती आपलं आयुष्य संपवू शकत नाही यावर भरवसा ठेवा.७. आपलं कुणीच नाही, आपण एकटे आहोत अशी भावना मनात आली तर त्यावर मात कशी करायची हे योग्य सल्ला घेऊन समजून घ्या.८. जीव आपला सगळ्यात प्यारा हे कधीच विसरू नका.९. जगण्यासारखं आयुष्यात भरपूर काही असतंच..१०. आपण भारी आहोत असं वाटून पुन्हा आयुष्य सुरु करायला धाडस लागतं ते करा.