Lokmat Sakhi >Mental Health > हर्बल टी प्या स्ट्रेस फ्री व्हा! 5 प्रकारच्या हर्बल टीमुळे शरीर मनावरचा ताण होतो गायब

हर्बल टी प्या स्ट्रेस फ्री व्हा! 5 प्रकारच्या हर्बल टीमुळे शरीर मनावरचा ताण होतो गायब

स्ट्रेस फ्री जगण्यासाठी हर्बल टी प्या!1 कप हर्बल टीमुळे शरीर -मनावरचा ताण होतो गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 06:30 PM2022-06-09T18:30:51+5:302022-06-09T18:34:02+5:30

स्ट्रेस फ्री जगण्यासाठी हर्बल टी प्या!1 कप हर्बल टीमुळे शरीर -मनावरचा ताण होतो गायब

Drink herbal tea to be stress free! 5 types of herbal teas cause body and mind stress disappears | हर्बल टी प्या स्ट्रेस फ्री व्हा! 5 प्रकारच्या हर्बल टीमुळे शरीर मनावरचा ताण होतो गायब

हर्बल टी प्या स्ट्रेस फ्री व्हा! 5 प्रकारच्या हर्बल टीमुळे शरीर मनावरचा ताण होतो गायब

Highlightsशरीर मनावरचा ताण घालवून ताजतवानं राहाण्यासाठी, निरोगी जगण्यासाठी आपल्या रोजच्या दिनक्रमात एक कप हर्बल टीचा समावेश करायला हवा!

चहा जर योग्य घटकांनी युक्त असेल आणि तो जर योग्य पध्दतीनं तयार केलेला असेल तर चहा पिणं आरोग्यास लाभदायी ठरतं.  शरीर मनावरचा ताण घालवून ताजतवानं राहाण्यासाठी, निरोगी जगण्यासाठी आपल्या रोजच्या दिनक्रमात एक कप हर्बल टीचा समावेश करायला हवा असं तज्ज्ञ सांगतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर हर्बल टी पिण्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. 1 कप हर्बल टीमुळे पचन सुधारतं, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, हर्बल टीमुळे वजन कमी होण्यास मदत होते. ॲण्टिऑक्सिडण्टस, खनिजं आणि जीवनसत्वयुक्त हर्बल टी स्ट्रेस फ्री जगण्यासाठी उपयुक्त असल्याचं तज्ज्ञ सांगतात.  5 प्रकारचे हर्बल टी शारीरिक आणि मानसिक आरोग्यास लाभदायी ठरतात.

Image: Google

मिंट टी

मिंट टी म्हणजेच पुदिन्याचा चहा. पुदिन्यामध्ये विविध प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. गरम पाण्यात पुदिन्याची पानं टाकून मिंट टी केला जातो. एका संशोधनानुसार मिंट टीमध्ये शरीराला आराम देणारे घटक असतात.  एक कप मिंट टी प्याल्यानं शरीर आणि मनाला शांतता मिळते. 

Image: Google

कॅमोमाइल टी

कॅमोमाइल टीमधे सूज आणि दाहविरोधी गुणधर्म असतात. ॲण्टिऑक्सिडण्ट्सयुक्त कॅमोमाइल टीमध्ये आरोग्य समस्या बऱ्या करण्याची क्षमता असते. शरीरावरच्या जखमा भरुन येण्यासाठी, सांधेदुखीत आराम मिळण्यासाठी, त्वचा विकारात आणि नैराश्यासारखा मानसिक विकारात कॅमोमाइल टी फायदेशीर ठरतो. 

Image: Google

लव्हेंडर टी

लव्हेंडरची ओळख ही त्याच्या सुगंधासाठी असली तरी या फुलात अनेक औषधीय गुणधर्मही आहेत. मानसिक तणाव दूर कण्यासाठी, मेंदूला शांतता मिळण्यासाठी लवेंडर टी फायदेशीर असतो. लव्हेंडर टी करण्यासाठी ताज्या आणि सुकलेल्या फुलांचा वापर केला जातो. 

Image: Google

मोचा टी

मोचामध्ये अमिनो ॲसिड असतात. मोचामध्ये एल थीनाइन या घटकाचं प्रमाण चांगलं असल्यामुळे शरीराला आराम देण्यासोबतच या चहामुळे मनावरचा ताणही झटक्यात निघून जातो. 

Image: Google

रोज टी

गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार होणारा रोज टी म्हणजे एक सुंगधी मेजवानीच. या चहातील औषधी गुणधर्मांमुळे मासिक पाळीतील वेदना शमतात. पचनक्रिया सुधारते , रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. मानसिक ताणतणाव कमी होतात. 

Web Title: Drink herbal tea to be stress free! 5 types of herbal teas cause body and mind stress disappears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.