Join us  

दसरा : मनावरची जुनी काजळी पुसून टाका पुढचं पाऊल हिमतीचं, घ्या हा टॉप १० फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2024 7:00 AM

आपण आपल्यालाच कधी कामाला लावतो का? विचार फार झाले कृती करतो का?

ठळक मुद्दे-हे एवढं तरी जमेल पुढच्या दसऱ्यापर्यंत आपल्याला?

मन बिघडलं की शरीराची घसरण सुरू होते. शरीराचा मेकओव्हर करता येतो. आपण नवे कपडे घेतो. जीम लावतो. योगाभ्यास करतो. डाएट बदलतो. एखादं नातं काचत असेल तर त्याचा निर्णय करतो. नोकरीत मन रमत नसेल तर दुसरी नोकरी सोडतो. अनेक न आवडणाऱ्या गोष्टी आयुष्यात सोडून देता येतात. पण मनाचं काय? मन असं की ते आपल्याला सोडून जगभर फिरतं आणि आपल्यालाही छळतं. आपलं मन आपल्याशी बोलतंही, पण ते अनेकदा इतकं उलटसुलट बोलतं की मेंदूला कळतच नाही चांगलं काय वाईट काय? निर्णय कसा घ्यावा. अनेकदा मनासारखं काही घडत नाही आणि त्यामुळे आपण नाराज असतो. अनेकदा मनासारखं घडूनही आपण नाराज असतो. सुख बोचतं की काय सलतं कळत नाही. हे सारं पाहूनही आपण आपलं मन आजारी असू शकेल असा विचार करत नाही. आपण आपल्याचभोवती रेषा मारतो आणि स्वत:च्याच कम्फर्ट झोनमध्ये अडकून पडतो. दसऱ्याला आपल्याला जरा आपल्या कम्फर्टपलिकडच्या आपल्या क्षमतांचा आणि मानसिक बळाचा अंदाज घेता येईल का? एक पाऊल टाकायचं का हिमतीचं..

मन नुसतं विचार करुन ऐकत नाही. आपण विचार खूप करतो. मनाला कृती सांगावी लागते. आपण हे सारं आपल्या मनाला आणि शरीराला शिस्त लावून आपलं ध्येय साध्य करण्यासाठी करतोय हे एकदा नक्की केलं की कृती देऊन मनाला कामाला लावायचं. म्हणजे मग आपलं शरीर आणि मन आपोआपच छान वागायला लागेल. स्वत:साठी काही करण्यानं दुसऱ्यासाठी करण्यातला उत्साह वाढतो, टिकून राहातो, शिवाय वर्तमानात राहायला मदत होते. मुख्य म्हणजे सुरुवात लहान लहान गोष्टींपासूनच करायची. 

काय करता येईल आपल्याला?

१. श्वासाचे व्यायाम-मेडिटेशन रोज करायचं.२. न वापरलेल्या वस्तू शोधून उपयोग नसेल तर त्या देऊन टाकणं.३. रोज अर्धा तास तरी योगाभ्यास.४. रोज वेळेवर जेवणं.५. रात्री जागरणं न करता रोज वेळेवर झोपणं.

६. मोकळेपणानं मदत मागणं.७. आवडती गाणी रोज ऐकणं. ८. रोज अर्धा तास तरी चालणंच.९. पेंडिंग कामाची यादी करुन त्या कामांना डेडलाइन देणं आणि ती करणं.१०. आपल्या माणसांशी फोन बाजूला ठेवून बोलणं.-हे एवढं तरी जमेल पुढच्या दसऱ्यापर्यंत आपल्याला?

टॅग्स :मानसिक आरोग्यमहिलापरिवार