Lokmat Sakhi >Mental Health > संताप होतो, डोकंच आऊट होतं, काय बोलतोय हेच कळत नाही, अशावेळी काय कराल?

संताप होतो, डोकंच आऊट होतं, काय बोलतोय हेच कळत नाही, अशावेळी काय कराल?

आपल्याला आपल्या भावना ना ओळखता येतात, ना सांभाळता, मग त्यातून माणसं दुखावतात, नाती तुटतात आणि आपणही उदास होतो, त्यावर उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 05:14 PM2021-05-21T17:14:13+5:302021-05-21T17:31:35+5:30

आपल्याला आपल्या भावना ना ओळखता येतात, ना सांभाळता, मग त्यातून माणसं दुखावतात, नाती तुटतात आणि आपणही उदास होतो, त्यावर उपाय काय?

emotion control? emotion management & response to the situation. | संताप होतो, डोकंच आऊट होतं, काय बोलतोय हेच कळत नाही, अशावेळी काय कराल?

संताप होतो, डोकंच आऊट होतं, काय बोलतोय हेच कळत नाही, अशावेळी काय कराल?

Highlightsकाही गोष्टींना पर्याय नसतात. गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात. त्यावर आपण तोडगा नाही काढू शकत. ते स्वीकारा. वास्तव स्वीकारा.

समिंदरा हर्डीकर-सावंत

भावनिक बुद्धिमत्ता. याविषयी बोललं खूप जातं. पण प्रश्न असतोच की, आपल्या भावनांचं नियंत्रण कसं करायचं? इमोशन्स कण्ट्रोल, त्यांचा विचार ही एक महत्वाची क्षमता आहे. 
पण भावनांचे नियंत्रण म्हणजे नक्की काय? अगदी सध्या शब्दात मांडायचे तर आपल्या भावना आपण अशा रीतीने व्यक्त करणं की आपल्याला आपल्या भावनेला तर योग्य स्थान देताच येईल
पण इतरांचे किंवा स्वतःचे नुकसानही नाही होणार. यालाच भावनांचे नियमन असे म्हणतात. पण आपण इमोशनल असतो, भडाभडा बोलतो, रागात असतो तेव्हा हे सारं आपल्याला जमतं का?
आणि नाहीच जमत तेव्हा भावनांची अनियंत्रित अभिव्यक्ती आपल्या नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करू शकते, आपल्या कामावरची एकाग्रता कमी करते. एवढेच नाही तर शारीरिक व मानसिक आजारही निर्माण करू
शकते.
आपण जेव्हा भावनांचं उत्तम नियमन करतो तेव्हा आपण रिॲक्ट नाही तर रिस्पॉण्ड करतो. आपण भावनेच्या भरात वाहत जात नाही, आपला आपल्यावर कण्ट्रो सुटत नाही.
नियंत्रणा बाहेर असलेल्याला उत्तेजित प्रतिक्रियेऐवजी म्हणजे एक्साइट होऊन काही न करता, भावना समजून घेऊन आपण नियंत्रित प्रतिसाद देतो.
यामुळे आपण आपल्या मनस्थितीचं अधिक योग्यपणे व्यवस्थापन करू शकतो. हे जमलं की मग अर्थातच
आपले नातेसंबंध बहरू लागतात.
आता प्रश्न असा आहे की आपण हे इमोशनल कण्ट्रोल कसं करणार? कसं शिकणार?

१. भावनांची गती मंदावण्याचा प्रयास करा..


 जेव्हा जेव्हा आपण उत्तेजित किंवा त्रस्त होतो, तेव्हा तेव्हा
प्रतिक्रिया देण्यापूर्वी क्षणभर थांबा. हे कठीण असतं, विशेषतः सुरुवातीला,
कारण आपण सहसा विचार न करता प्रतिक्रिया देतो. परंतु आपण एक दीर्घ श्वास घेऊ किंवा ५
पर्यंत मोजू किंवा एक मिनिट खिडकीतून बाहेर पाहू  आणि नंतर ज्या गोष्टीने किंवा
व्यक्तीने तुम्ही चिडला,एक्साइट झाला असाल त्यावर बोला.


२. रिॲक्ट होण्याऐवजी पर्याय शोधा. 


आपण या परिस्थितीला अधिक विधायकपणे कसे सामोरे
जाऊ शकतो, हा प्रश्न स्वत:ला विचारा. लक्षात ठेवा, आपण सर्वच इन प्रोग्रेस आहोत; आणि
अनेकदा आपल्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. असे झाले तरी आपण हा उद्रेक नीट सांभाळू शकू,
इतर पर्याय उपलब्ध आहेत, असा संकेत आपण आपल्या मेंदूला देत जाऊ. आज ना उद्या मेंदू याची नोंद  घेईलच आणि विधायक पर्यायांचा उपयोग करू लागेल.


३. वैफल्य पेला, सहनशीलता वाढवा!


आपल्या सर्वांनाच काही ना काही गोष्टी फ्रस्ट्रेट करतात.
या फ्रस्ट्रेशन किंवा वैफल्याला हाताळण्याचे कौशल्य जोपासणे अतिशय महत्त्वाचे आहे. विफल होऊन
चिडचिड करण्या ऐवजी आपण शांत राहू. पर्याय शोधू. सहनशिलता वाढवू. सहनशील असणं म्हणजे माघार घेणं नव्हे तर उत्तम पर्याय शोधणं.


४. समस्यांवर तोडगे शोधण्याचा प्रयत्न


 केवळ निराशा सहन करणं अधिक काळ मदत करणार नाही, समोर असलेले आव्हान पेलण्यासाठी  प्रयत्न करणं, त्या दिशेनं चालणं, आव्हान स्वीकारणंही गरजेचं आहे.


५. संवाद कौशल्य वाढवा


 आपल्या भावनांना अधिक चोख आणि स्पष्ट शब्दात व्यक्त करण्याचा
सराव करा. जेव्हा तुम्ही योग्य शब्दांत तुमच्या भावना मांडू शकाल, तेव्हा भावनांचे नियंत्रण तुम्हाला
बऱ्यापैकी सहज जमू लागेल.


६. अप्रिय गोष्टींचा स्वीकार 


काही गोष्टींना पर्याय नसतात. गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात. त्यावर आपण तोडगा नाही काढू शकत. ते स्वीकारा. वास्तव स्वीकारा. ते स्वीकारलं तरी आपल्या भावनांवर उत्तम नियंत्रण मिळवता येतं.


(लेखिका मानसशास्त्रज्ञ आणि दिशा समुपदेशन केंद्राच्या सह-संस्थापक आहेत.)
samindara@dishaforu.com 
www.dishaforu.com

Web Title: emotion control? emotion management & response to the situation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.