Lokmat Sakhi >Mental Health > मोबाइल सतत पाहून तुम्हालाही एम्पटी स्क्रोलिंग नावाचा गंभीर आजार झालाय का? नाही म्हणण्यापूर्वी ही घ्या टेस्ट

मोबाइल सतत पाहून तुम्हालाही एम्पटी स्क्रोलिंग नावाचा गंभीर आजार झालाय का? नाही म्हणण्यापूर्वी ही घ्या टेस्ट

empty scrolling : हे नवीन ॲडिक्शन आहे. तासंतास वाया जातात आणि आपण काहीच केलं नाही ही भावना पोखरते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 05:27 PM2022-05-05T17:27:42+5:302022-05-05T17:42:52+5:30

empty scrolling : हे नवीन ॲडिक्शन आहे. तासंतास वाया जातात आणि आपण काहीच केलं नाही ही भावना पोखरते.

Empty Scrolling is a new digital addiction, stress and empty scrolling is dangerous. | मोबाइल सतत पाहून तुम्हालाही एम्पटी स्क्रोलिंग नावाचा गंभीर आजार झालाय का? नाही म्हणण्यापूर्वी ही घ्या टेस्ट

मोबाइल सतत पाहून तुम्हालाही एम्पटी स्क्रोलिंग नावाचा गंभीर आजार झालाय का? नाही म्हणण्यापूर्वी ही घ्या टेस्ट

Highlightsलोकांचं आयुष्य हॅपनिंग आहे आणि आपलं काहीच नाही या भावनेनं मत्सर, राग, संताप, स्वत:विषयी राग हे सारं घडू लागतं.

जरा खरंखरं स्वत:ला विचारा, आपल्याला  एम्पटी स्क्रोलिंगचा आजार आहे का? (empty scrolling) हा असा काही आजार असतो का तर असतो आणि कुठल्याही व्हायरसपेक्षा जास्त तो आपल्याला जखडून ठेवतो. सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पाहत फक्त स्क्रोल करत असतो. तिथं घडत काहीच नाही तरी आपण तपासतो. कुणी काही बोलत नाही , अपडेट नाही तरी  स्क्रोल करतो. त्यानं आपल्या आयुष्यातही काही घडत नाही. मात्र हा एम्पटी स्क्रोलिंगचा आजार आपला घात करतोय हेदेखील अनेकदा लक्षात येत नाही.
डोळे उघडले की ताबडतोब आपण मोबाइल हातात घेतो. मध्यरात्री जाग आली तरी थोडावेळ व्हॉट्सॲप चेक करतात. पुन्हा झोपतात. जेवताना, पुस्तक वाचताना, सिनेमा पाहतात, मित्रांशी बोलताना, ऑफिसमध्ये काम करताना, इतकंच काय काहीजण तर टॉयलेटमध्येही मोबाइल घेऊन जातात. सतत स्क्रोलिंग चालूच. 
स्क्रीन  टाइम वाढल्याची चर्चा सतत होते.  स्क्रोलिंग इज न्यू स्मोकिंग अशीही चर्चा होते. लोक एकमेकांना सांगतात, पण या आजारानं सारेच ग्रस्त.

(Image : google)

त्याचे परिणाम?

१. झोपेवर परिणाम. झोप गायब होते. नेटफ्लिक्सने म्हंटलंच होतं की आमची स्पर्धा माणसाच्या झोपेशी आहे. झोप कमी होणं, न लागणं हे आरोग्याला बरं नाही.
२.  स्क्रीन टाइम जास्त वजन वाढण्याची किंवा ओबेसिटीची शक्यता जास्त. 
३. डोळे कोरडे होणे, लाल होणे, चिडचिड जास्त.
४.मानपाठ दुखतेच.
५. समोरासमोर बोलताच येत नाही? चॅटवर खूप बोलतात. प्रत्यक्ष भेटीत बोलताच येत नाही. 
६. स्ट्रेस वाढतो. आपण काहीच न करता स्क्रोल करतो, लोकांचं आयुष्य हॅपनिंग आहे आणि आपलं काहीच नाही या भावनेनं मत्सर, राग, संताप, स्वत:विषयी राग हे सारं घडू लागतं.

(Image : google)

एम्पटी स्क्रोलिंगवर इलाज काय?

१. जेवताना मोबाइल जवळ नको, लांब ठेवा. तेव्हा मोबाइल पहायचा नाही.
२. दहा मिनिटांपेक्षा कुठल्याही सोशल मीडियावर आपण रेंगाळलो तर एम्पटी स्क्रोलिंग सुरु झाल्याचं रिमाइंडर वाजलं पाहिजे.
३. आठवड्यातून एकदा नो स्क्रिन डे. ठरवलं तर हे जमतं.
४. मोबाइल उशाशी ठेवू नका.
५. तासंतास चटक लागल्यासारखं आपण सोशल मीडिया पाहत असू, तर गरज लागली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या मनावर काही ताण आहे का, हे पहा.

Web Title: Empty Scrolling is a new digital addiction, stress and empty scrolling is dangerous.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.