Lokmat Sakhi >Mental Health > भर पावसात रोमॅण्टिक वाटण्याऐवजी उदास-दु:खी वाटतं? पावसात रडवणारा हा ‘आजार’ तुम्हालाही झालाच तर..

भर पावसात रोमॅण्टिक वाटण्याऐवजी उदास-दु:खी वाटतं? पावसात रडवणारा हा ‘आजार’ तुम्हालाही झालाच तर..

पावसाळ्यात छान वाटण्याऐवजी उदास वाटतं का? यालाच तर सिझनल डिप्रेशन (Seasonal depression) म्हणतात. एवढ्या छान वातावरणात असं नैराश्य (SAD) का यावं? त्यावर उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 07:01 PM2022-07-07T19:01:42+5:302022-07-07T19:16:21+5:30

पावसाळ्यात छान वाटण्याऐवजी उदास वाटतं का? यालाच तर सिझनल डिप्रेशन (Seasonal depression) म्हणतात. एवढ्या छान वातावरणात असं नैराश्य (SAD) का यावं? त्यावर उपाय काय?

Feeling sad instead of romantic in rainy days. What is SAD? Why this mental disorder happen in rainy season? | भर पावसात रोमॅण्टिक वाटण्याऐवजी उदास-दु:खी वाटतं? पावसात रडवणारा हा ‘आजार’ तुम्हालाही झालाच तर..

भर पावसात रोमॅण्टिक वाटण्याऐवजी उदास-दु:खी वाटतं? पावसात रडवणारा हा ‘आजार’ तुम्हालाही झालाच तर..

HighlightsSAD म्हणजेच सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डरमान्सून ब्लूजची लक्षणं ओळखता येतात. पावसाळ्यातल्या वातावरणामुळे सीझनल ड्रिप्रेशन जाणवतं. यावर उपाय असून ते सहज करता येण्यासारखे आहेत. 

 पावसात छान आनंदी वाटतं. आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. रोमॅण्टिक वाटतं..असं  मस्त वातावरण असताना भर पावसात सॅड (SAD)  वाटणं हे जरा विचित्र नाही वाटत का? पण हे होतं. याला सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर (म्हणजेच सॅड)  (Seasonal Affective Disorder) असं म्हणतात.  यालाच मान्सून ब्लूज असंही म्हणतात. मेदांता हाॅस्पिटल येथील कन्सलटंट मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. रमण शर्मा  पावसाळ्यात होणाऱ्या या मान्सून ब्लूज (monsoon blues)  बद्दल सविस्तर माहिती सांगतात. 

Image: Google

मान्सून ब्लूजला वैद्यकीय भाषेत सॅड म्हणजेच सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर असं म्हणतात. यात व्यक्तीला ऋतू बदलल्यानंतर  एकटं वाटतं. यालाच हंगामी नैराश्य अर्थात सिझनल डिप्रेशन असं म्हणतात.  हे सिझनल डिप्रेशन येण्याचं कारण म्हणजे आपल्या मेंदूतील सेराटोनिन हे हार्मोन. हे हार्मोन जेव्हा जास्त सूर्यप्रकाश असेल तेव्हा जास्त सक्रीय असतं. पण पावसाळ्यात सूर्याचा प्रकाश कमी असतो. त्यामुळे सेराटोनिन कमी सक्रीय असतं. यामुळे  उदास वाटतं, दुखी वाटतं.  एकटेपणा वाटतं. आपलं जगात कोणीच नाही अशी भावना निर्माण होते.

Image: Google

मान्सून ब्लूजमुळे होतं काय?

1. शारीरिक तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं जातं. 

2. लोकांशी भेटणं, बोलणं टाळलं जातं. 

3. बाहेरच्या जगाशी संपर्क नकोसा वाटतो. 

4. सतत शांत राहून विचार करत राहाणं या गोष्टी होतात.

Image: Google

मान्सून ब्लूजची लक्षणं काय?

आपल्याला मान्सून ब्लूजचा त्रास होतोय हे ओळखण्याची विशिष्ट लक्षणंही आहेत. 

1. शरीराची, मनाची ऊर्जा कमी होते.

2. विनाकारण थक्वा येतो. 

3. झोप कमी येते किंवा खूप झोप येते. 

4. सतत उदास वाटतं. 

5. एकटं राहावसं वाटतं. 

Image: Google

पावसाळ्यात वाटणारा उदासपणा घालवण्यासाठी

1. आपल्याला वाटणाऱ्या एकटेपणाचं नेमकं कारण ओळखावं. त्यावर स्वत: उपाय शोधावा. आपल्याला सूचत नसल्यास त्यासाठी इतरांची मदत घ्यावी.

2. लोकांशी भेटीगाठी वाढवणं. लोकांशी संपर्क आणि संवाद वाढवावा. 

3. दिवसभराच्या कामाचं नियोजन करावं. नियोजन केल्याप्रमाणे कामं करावीत.

4. वाचण्याची सवय लावावी. 

5. स्वत:मध्ये नवीन कौशल्य विकसित केल्यास आपल्यातला उत्साह वाढतो. 

6. व्यसनांपासून दूर राहावं. 

7. एकटेपणा वाटल्यास मित्रमैत्रिणींशी / नातेवाईकांशी बोलावं, गप्पा माराव्यात.

8. सामुहिक कामात सहभाग घ्यावा. यामुळे शरीर आणि मनाला ऊर्जा मिळते. 

9. उदास वाटत असल्यास संगीत ऐकावं. 

10. ड जीवनसत्व असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. कारण पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्यानं शरीरातील ड जीवनसत्व कमी होतं. त्याचा परिणाम म्हणूनही उदास वाटतं. 

Web Title: Feeling sad instead of romantic in rainy days. What is SAD? Why this mental disorder happen in rainy season?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.