Lokmat Sakhi >Mental Health > दिवसभर एनर्जेटीक राहायचं तर सकाळी १० मिनीटांत करा फक्त ३ आसनं, रात्रीपर्यंत राहाल एकदम फ्रेश

दिवसभर एनर्जेटीक राहायचं तर सकाळी १० मिनीटांत करा फक्त ३ आसनं, रात्रीपर्यंत राहाल एकदम फ्रेश

Fitness Tips 3 easy Yoga Asana to Stay Fresh Throughout day : पावसाळ्याच्या वातावरणात एकीकडे दमट हवामान आणि दुसरीकडे पावसामुळे गारवा अशात हाडं, स्नायू जास्त ठणकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2022 03:24 PM2022-09-15T15:24:12+5:302022-09-15T15:27:31+5:30

Fitness Tips 3 easy Yoga Asana to Stay Fresh Throughout day : पावसाळ्याच्या वातावरणात एकीकडे दमट हवामान आणि दुसरीकडे पावसामुळे गारवा अशात हाडं, स्नायू जास्त ठणकतात

Fitness Tips 3 easy Yoga Asana to Stay Fresh Throughout day : If you want to stay energetic throughout the day, do only 3 asanas in 10 minutes in the morning, you will stay fresh till night | दिवसभर एनर्जेटीक राहायचं तर सकाळी १० मिनीटांत करा फक्त ३ आसनं, रात्रीपर्यंत राहाल एकदम फ्रेश

दिवसभर एनर्जेटीक राहायचं तर सकाळी १० मिनीटांत करा फक्त ३ आसनं, रात्रीपर्यंत राहाल एकदम फ्रेश

Highlightsशरीराचा प्रत्येक भाग उष्ट्रासनामुळे स्ट्रेच होत असल्याने हे आसन अतिशय उपयुक्त असते.शांतपणे श्वास घ्या आणि वेगाने सोडा, असे किमान २० वेळा करा. याचा फ्रेश राहण्यासाठी चांगला फायदा होतो. 

सकाळी झोपेतून उठलंकीच अनेकदा आपल्याला थकल्यासारखं वाटत असतं. ७ ते ८ तासांची पूर्ण झोप घेऊनही पूर्ण फ्रेश वाटत नाही. आणखी तर पुढे पूर्ण दिवस जायचा असल्याने सकाळीच असा थकवा असेल तर दिवस कसा जाणार असा प्रश्नही आपल्याला पडतो. डोळे उघडताच, स्वयंपाक, साफसफाई, डबे, मुलांच्या वेळा, ऑफीसचे काम असे एक ना अनेक विचार आपल्या डोक्यात सुरू असतात. काही जणांना दिवसभर उभं राहण्याचं किंवा कष्टाचं काम असतं तर काहींना दिवसभर बैठं काम असल्यानं स्नायू पार आखडून जातात. व्यायाम हा यावर एकमेव उपाय असल्याचे आपल्याला माहित असते. पण इतर गोष्टींच्या नादात आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. पावसाळ्याच्या वातावरणात एकीकडे दमट हवामान आणि दुसरीकडे पावसामुळे गारवा अशात हाडं, स्नायू जास्त ठणकतात ( Fitness Tips 3 easy Yoga Asana to Stay Fresh Throughout day).

मात्र दिवसभर फ्रेश राहून सगळी कामं करायची असतील. स्वत:ची आणि इतरांची पुरेशी काळजी घ्यायची असले आणि आपली ताकद वाढवायची असेल तर व्यायामाला पर्याय नाही. व्यायाम करायचा आहे पण वेळ नाही अशी सबब आपण अनेकदा देतो. हे खरेही असू शकते. मात्र दिवसभरात व्यायामासाठी वेळ नसेल तर सकाळी फक्त १० मिनीटांत काही सोपे व्यायामप्रकार केल्यास तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे सकाळी उठल्या उठल्या या गोष्टी केल्याने दिवसभराच्या कामासाठी एनर्जी टिकून राहते. पाहूयात घरच्याघरी झटपट करता येतील असे ३ व्यायामप्रकार आणि त्याचे फायदे ...

(Image : Google)
(Image : Google)

1. बालासन 

लहान मुलांची अवस्थआ म्हणून ओळखले जाणारे हे आसन ताण निघून जाण्यासाठी आणि भिती दूर होण्यासाठी उत्तम आसन मानले जाते. छाती, पाठ, खांदे या भागावर आलेला ताण दूर होण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त ठरते. वज्रासनात बसून हात वर घ्या. हळूहळू कंबरेतून खाली वाका आणि डोके जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. छाती गुडघ्यांवर दाबा. १ मिनीटासाठी या आसनात थांबा आणि पुन्हा वर या. असे किमान २ ते ३ वेळा करा. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटण्यास मदत होईल. 

(Image : Google)
(Image : Google)

2. कपालभाती 

ही शरीर शुद्ध करण्याची एक उत्तम प्रक्रिया आहे. श्वासोच्छवासाच्या माध्यमातून शरीरशुद्धी केल्याने सायनसचा त्रास तर दूर होतोच आणि इतरही अनेक फायदे होतात. तसेच कपालभाती केल्याने आपला दिवस सकारात्मक एनर्जीने सुरू होतो. आपल्याला सहज शक्य असणाऱ्या कोणत्याही स्थिती बसा. यामध्ये पद्मासन, साधी मांडी, वज्रासन असे कोणतेही आसन चालेल. शांतपणे श्वास घ्या आणि वेगाने सोडा. असे किमान २० वेळा करा. याचा फ्रेश राहण्यासाठी चांगला फायदा होतो. 

(Image : Google)
(Image : Google)

3. उष्ट्रासन 

शरीराचा प्रत्येक भाग या आसनामुळे स्ट्रेच होत असल्याने हे आसन अतिशय उपयुक्त असते. श्वसनक्रिया, पचनक्रिया, रक्ताभिसरण क्रिया या आसनामुळे सुरळीत होत असल्याने त्याचा चांगला फायदा होतो.  वज्रासनात बसावे आणि पाठ ताठ राहील असे पाहावे. कंबरेतून वाकून मागच्या बाजुने हात पायाच्या घोट्यांना किंवा टाचांना लावण्याचा प्रयत्न करावा. काही सेकंद किंवा शक्य असेल तर मिनीटे याच अवस्थेत थांबण्याचा प्रयत्न करावा. आसन सोडताना हळूवारपणे सोडावे, स्नायूंना झटका बसणार नाही याची काळजी घ्यावी. 


 

Web Title: Fitness Tips 3 easy Yoga Asana to Stay Fresh Throughout day : If you want to stay energetic throughout the day, do only 3 asanas in 10 minutes in the morning, you will stay fresh till night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.