Join us  

सुख दे! आनंद दे.. टळू दे साऱ्या पिडा हेच मागणं बाप्पापाशी, अजून काय हवं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 8:00 AM

घरोघरी गणपतीचं आगमन होणार, सारं नवं नवं होणार, आपल्या माणसांसोबत साजरा करू सण, जुने सारे विसरुन, नव्या उमेदीने..

ठळक मुद्देगणपतीकडे अजून काय मागायचं.. बुद्धीसह प्रेमानं, सुखानं जगण्याची ताकद..सर्वांसाठी..

घरोघरी गणेशाचे आगमन होणार!दोन वर्षे कोरोनानं छळलं, ती काळी छाया आता मागे पडली असे वाटावे, असे दिवस आहेत.त्यात गणपतीचं आगमन.तो सुखकर्ता. दु:खहर्ता..त्याच्याकडे काय मागायचं असतं?कोरोनाकाळानं साऱ्या मानवजातीला बरंच काही शिकवलं.सर्वात आधी शिकवलं ते माणसांचं मोल.आपली माणसं, त्यांचं सोबत असणं, चार क्षण आनंदानं साजरे करणं,तिखट-कडवट गोष्टी मागे ठेवून आनंदानं, समजुतीनं, सोबतीनं पुढे चालणं.

(Image : Google)

लहानसहान गोष्टी मनात ठेवून कुढत न बसता, हा आता जो क्षण आपल्या पुढ्यात आहे तो आपण आनंदानं जगणं आणि जमलं तर इतरांच्या जगण्यात तो आनंद पेरणं. वाटून घेणं सुखदु:खं, बोलणं भरभरून, काही काचत-डाचत असेल तर ते तिथल्या तिथं सोडवून नव्या उमेदीनं पुढे जाणं..अडचणी, आव्हानं, संकटं तर येणारच..पण त्यापलीकडे जाण्याची जिद्द असणं. क्षणात सारं असतं, क्षणात नसतं, असे सुख-दु:ख किती जणांनी अनुभवलं.. त्या अनुभवातूनच आता घरोघरी झाले असतील कदाचित काही बदल.आपल्या स्क्रीनच्या बाहेर, आपल्या घरात असलेल्या माणसांचं आयुष्य‘हॅपनिंग’ करण्यासाठीचा संवाद, सोबत घेतलेला एक कप चहा, एकत्र जेवण, खळखळून हसणं, व्हॉट्सॲपच्या पलीकडे किमान फोन करत एकमेकांशी बोलणं..साऱ्या घराचं आनंदाचं गोकुळ करणं..जपणं आपल्या माणसांना आणि आपल्यालाही..गणपतीकडे अजून काय मागायचं..बुद्धीसह प्रेमानं, सुखानं जगण्याची ताकद..सर्वांसाठी..गणेशोत्सवात हा आनंदच भरभरून वाटू..सारे सुखात राहू..

टॅग्स :गणेशोत्सव विधी