जसे अविचारी वागणे वाईट तसेच अतिविचार करणेही चुकीचेच आहे. आत्ताच्या बदललेल्या काळात समस्यांचे स्वरूपही बदलले आहे.(Gen Z And Overthinking ) पूर्वीच्या काळीही हे प्रकार घडायचे, मात्र आता त्यांचे प्रमाण वाढले आहे. या समस्या शारीरिक किंवा आर्थिक नसून मानसिक आहेत. अगदी लहान मुलांपासून विवाहितांपर्यंत सगळ्यांनाच काही ना काही मानसिक तणाव येत असतो.(Gen Z And Overthinking ) बदललेले रहाणीमान व संकल्पना तसेच प्रत्येक क्षेत्रातील वाढलेली चुरस या समस्यांचे प्रमाण वाढवत आहे. तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण यातूनच तर वाढत गेले. एखाद्या गोष्टीचा आपण अतिविचार करतो.(Gen Z And Overthinking ) आणि आपल्याला हे लक्षातच येत नाही की, या अति विचारामुळे शरीरावर- मनावर किती वाईट परिणाम होतात.
जेन-झी पिढीतील मुलांमध्ये एक शब्द फार वापरला जातो. तो म्हणजे ओव्हरथिंकींग.(Gen Z And Overthinking ) एखाद्या शुल्लक गोष्टीवरून देखील अति ताण डोक्याला देणाऱ्या लोकांना ओव्हरथिंकर म्हणतात. ऐकायला जरी ही समस्या छोटी वाटली, तरी तिचे परिणाम नक्कीच वाईट आहेत. गुरू गोपाल दासांपासून मोठमोठ्या डॉक्टरांपर्यंत सर्वच जण ओव्हरथिंकींग करू नका असा सल्ला देतात. बऱ्याच नवीन संकल्पना, सोशल मिडियाचा अतिवापर, नवीन पिढ्यांमधील वाढणारे ट्रोलिंगचे प्रमाण अशा अनेक कारणांमुळे मानसिकता ढासाळते. डोक्यात येणाऱ्या विचारांतून मग नको ती पाऊले उचलली जातात.
ओव्हरथिंकिंग कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे चांगल्या गोष्टीत मन रमवणे . आवडीच्या कृती करण्यासाठी वेळ काढा. वर्क लाईफ आणि पर्सनल लाइफ यांचा बॅलन्स साधणं. उत्तम पुस्तकं वाचणं. सोशल मिडियावर काय बघायचं काय नाही याचा विचार करणं. डोक्याला ताण देतील असे विषय न बघणं.वेबसिरीजच्या बिंज वॉचिंगमुळे डोक्यावर ताण येतो, तो टाळणं. आपण पाहतो ते विषय जर फार क्रूर असतील तर काल्पनिक गोष्टसुद्धा मनात घर करून बसते. त्यामुळे ते टाळणं. मन प्रफुल्लित राहील असे प्रयत्न करणं, तसा विचारही करणं.
ओव्हरथिंकिंग च्या वाढत्या समस्यांकडे बघून पालकांनादेखील आपण कुठे चुकत आहोत का? हा प्रश्न स्वत:ला विचारायची गरज आहे. पालकांनी अति दबाव मुलांवर टाकू नये. नवीन पिढीतील मुले जास्त हळवी आहे. याचे कारण म्हणजे अतिकाळजी. तसेच वाढते व्यसनांचे प्रमाणही तितकेच कारणीभूत आहे. व्यसनांमुळे हिंसक वृत्ती वाढते. ताबा सुटतो, निर्णय चुकतात आणि मग पश्चाताप करायची वेळ आल्यावर ओव्हरथिंकींग आपसूकच केले जाते. वाईट सवयींपासून दूर राहा. वेळीच सावध व्हा.