Join us  

तुमच्यावर कोणी विनाकारण चिडत असेल तर काय कराल? बीके शिवानी सांगतात खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2024 3:29 PM

How To Deal With Angry People: घर असो, ऑफिस असो किंवा इतर कुठलेही ठिकाण असो.. तुम्हाला असा अनुभव आला तर बीके शिवानी यांनी सांगितलेला हा एक सोपा उपाय नेहमी लक्षात ठेवा..(simple tricks and tips to keep ourselves cool and calm)

ठळक मुद्देडोकं शांत ठेवू शकल्याने तुमच्या चुका सुधारण्याची एक खूप चांगली संधीही तुम्हाला यामुळे मिळेल. कधीतरी करून बघा हा प्रयोग. 

आपल्या प्रत्येकासोबतच कधी ना कधी असं होतं की समोरची व्यक्ती विनाकारण आपल्यावर चिडचिड करते. मग ते नवरा बायको असाे, मुलं आणि पालक असो किंवा मग सासू- सुनेच्या कुरबुरी असो.. अगदी ऑफिसमध्येही आपण कधी ना कधी असा अनुभव घेतोच. आपला बॉस येतो आणि विनाकारण आपल्यावर डाफरून जातो. तो जेवढ्या रागात बोलत असतो तेवढी मोठी आपली चूकही नसते कदाचित. पण तरीही आपल्याला त्याचा ओरडा ऐकून घ्यावा लागतो (what to do when someone get angry on us without any reason?). अशावेळी आपलं मानसिक संतुलन बिघडू नये म्हणून आपण नेमकं काय करावं, याविषयीचा १ सोपा उपाय बीके शिवानी यांनी सांगितला आहे. (How To Deal With Angry People?)

 

समोरचा माणूस आपल्यावर चिडला की आपल्यालाही त्याचा खूप राग येतो. काही व्यक्ती त्या परिस्थितीतही डोकं शांत ठेवू शकतात किंवा स्वतःवर पूर्ण कंट्रोल ठेवू शकतात. पण सगळ्यांनाच ते जमत नाही.

टीनएजर्स होण्यापुर्वी मुलांना शिकवायलाच पाहिजेत 'या' गोष्टी; अभ्यासात पुढे जातील- गुणवान होतील 

एखादी व्यक्ती आपल्याला ओरडून गेली की मग आपला मूड खराब होतो. खूप वाईट वाटतं. मनातल्या मनात आपण त्रागा करतो. आणि स्वतःला दोष देऊन कुढत बसतो. त्यानंतरचा आपला सगळा दिवस खराब जातो. समोरचा व्यक्ती राग व्यक्त करून मोकळा होऊन जातो. पण आपल्याला मात्र मनातल्या मनात कुढत बसण्याचे मानसिक, शारिरीक त्रास सोसावे लागतात.

 

बीके शिवानी सांगतात की अशा पद्धतीचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेवा. अशी चिडचिड तीच व्यक्ती करते जी व्यक्ती मानसिक संतुलन हरवून बसलेली असते. किंवा तिला स्वतःला काही त्रास होत असतो, त्यामुळे तिची चिडचिड होते.

केसांची चमक जाऊन कोरडे झाले? 'या' पद्धतीने राईस वॉटर लावा; केस होतील मऊ- चमकदार

म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असते. त्यामुळे अशावेळी तुम्हाला त्या व्यक्तीचा कितीही राग आला तर "ती व्यक्ती आजारी आहे, त्यामुळे ती चिडते आहे" हे तुमच्या मनाला समजून सांगा. अशी सवय तुम्हाला लागली की आपोआपच समोरच्या व्यक्तीच्या चिडण्याचा त्रास होणार नाही. हो पण ती व्यक्ती आपल्यावर का चिडते आहे, तुमच्याकडून कोणती चूक होते आहे, ते मात्र लक्षात घ्या. ती चूक दुरुस्त करा. यामुळे स्वतःवर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवू शकालच, शिवाय डोकं शांत ठेवू शकल्याने तुमच्या चुका सुधारण्याची एक खूप चांगली संधीही तुम्हाला यामुळे मिळेल. कधीतरी करून बघा हा प्रयोग. 

 

टॅग्स :मानसिक आरोग्यरिलेशनशिपरिलेशनशिप