घरोघरच्या बहिण भावाचं नातं कसं असतं याबात वेगळं सांगायला नको. रक्षा बंधन आणि भाऊबीज सोडली तर आपण फारचं याबाबत विचार करत नाही. भाऊ किंवा बहिण ही घरातील अशी व्यक्ती असते जिच्याशी तुम्ही कधीही काहीही शेअर करू शकता. अगदी टॉम अॅण्ड जेरी प्रमाणे सगळ्याच बहिण भावांची भांडणं, रूसवा, फुगवा सुरू असतो.
ज्याप्रमाणे मदर्स डे, फादर्स डे साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आज 24 मे रोजी ब्रदर्स डे (Happy Brothers Day ) साजरा केला जात आहे. याच दिवशी बहिण आपल्या भावडांसाठी स्पेशल काहीतरी करते. या दिवसाची सुरूवात नेमकी कशी झाली. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अशी झाली सुरूवात
हा दिवस प्रथम 2005 मध्ये सुरू झाला. अमेरिकेच्या अलाबामा येथिल, सी. डॅनियल रोड्स,नावाचा व्यक्ती जो व्यवसायानं एक कलाकार आणि लेखक आहे. हा दिवस साजरा करण्यास सुरूवात करणारा तो पहिला होता. बरेच लोक 10 एप्रिल रोजी साजरा होणारा राष्ट्रीय भावंडं दिवस म्हणून साजरा करतात. पण वास्तविक पाहता हे चूक असून आजच्या दिवशी ब्रदर्स डे साजरा केला जातो.
अमेरिकेसह जगातील इतर देशांमध्ये आज राष्ट्रीय बंधू दिन साजरा केला जातो. त्यापैकी रशिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि जर्मनीसह आणखी बरेच देश आहेत जे 24 मे रोजी हा दिवस साजरा करतात. बंधूभाव वाढवण्यासााठी आपल्या कुटुंबियांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी, त्यांचे कौतुक करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो.
ब्रदर्स डे फक्त भावंडांसाठीसह नाही तर जे मित्र तुमच्यासाठी भावडांप्रमाणे आहेत याच्यासह साजरा करू शकता. अनेकदा असं पाहिलं जातं की, ज्या मुलींना भाऊ असतात त्यांचा आत्मविश्वास खूप जास्त असतो. हा एकमेव दिवस असा असतो जेव्हा बहिणींसाठी नाही तर भावांसाठी सेलिब्रेशन केलं जातं.