Join us  

"हसना भी जरुरी है", आयुष्यात खळखळून हसा, हृदय आणि मेंदूसाठी आहे फायदेशीर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2023 5:43 PM

Benefits of Laughing Therapy मोकळेपणाने हसायला शिका, हसणे सोडू नका, शरीर आणि मानसिकदृष्ट्या आहे जरुरी..

कोरोना या वैश्विक महामारीनंतर माणसाच्या जीवनात अनेक बदल घडले आहेत. या कालावधीत अनेकांचा मृत्यू मेंटल हेल्थमुळे झाला आहे. दरम्यान, स्वतःला खूश ठेवणं काहींना फार अवघड जात होते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी आयुष्य जगणं फारच जिकरीचे झाले आहे. त्यात करिअर, कौटुंबिक जबाबदाऱ्या, कामाचा ताण - तणाव, एकटेपणा यामुळे स्वतःच्या मेंटल हेल्थकडे लक्ष देणं त्याहून कठीण झाले आहे. शारीरिकसह मानसिक आजाराकडे देखील लक्ष देणं तितकंच महत्त्वाचे आहे. यावर एक उपाय म्हणजे लाफिंग थेरपी. हसल्याने जीवन वाढते, हे वाक्य आपण ऐकलंच आहे.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, "हसणे ही एक सकारात्मक संवेदना आहे आणि तणाव दूर करण्याचा हा एक उपयुक्त आणि आरोग्यदायी मार्ग आहे. लाफ्टर थेरपी हा तणाव आणि नैराश्य दूर करण्यास मदत करते. व्यायामामध्ये हास्याचा समावेश केल्याने वयस्कर लोकांचे मानसिक आरोग्य सुधारते."

यासंदर्भात, डॉक्टर नायडू यांनी मानसिक आरोग्यावर मात करण्यासाठी हसण्याचे फायदे इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

लाफ्टर थेरपीचे ९ फायदे

हसल्याने शरीराची आणि मनाची उर्जा वाढते आणि तुम्ही स्वतःला इतर गोष्टीत सक्रिय ठेवता.

हसण्याने शरीरातील प्रतिकारशक्तीही वाढते.

तणाव अनुभवल्यानंतर हसा कारण ते एक परिपूर्ण ताण बर्स्टर आहे.

लाफिंग थेरपी घेतल्याने वेदना आणि तणाव कमी होतो.

हसताना फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. याने फुफ्फुसे चांगले काम करतात.

एंडोर्फिनचा (आनंद देणारा हार्मोन) स्राव गतिमान होतो. हे नैसर्गिक वेदनाशामक मानले जाते.

हृदय आणि मेंदूचे कार्य चांगले होते.

रक्तदाब संतुलन राहते.

वेदना सहन करण्याची क्षमता वाढते, तणाव कमी होतो, झोप चांगली लागते.

घरी लाफ्टर थेरपीचा फायदा कसा घ्यावा

हसण्यासाठी तुम्ही हास्य क्लबचे सदस्य देखील होऊ शकता. पण कुठेही बाहेर न जाता घरात देखील आपण हसण्याचा आनंद लुटू शकता.

टीव्हीवर कॉमेडी शो किंवा कॉमेडी चित्रपट पहा

मुलांसोबत वेळ घालवा आणि मजेदार अॅक्टिविटीमध्ये सहभागी व्हा.

घरी पाळीव प्राणी असतील तर त्यांच्यासोबत खेळा.

जोक्स वाचा - ऐका आणि इतरांना शेअर करा.

टॅग्स :मानसिक आरोग्यहेल्थ टिप्सआरोग्य