Hugging Benefits : आपल्या पार्टनरला तुम्ही अनेकदा सहज हग करत असाल म्हणजे मिठी मारत असाल, पण या मिठी मारण्याचे फायदे तुम्हाला माहीत नसतील. असंही म्हणून शकतो की, मिठी मारताना त्याच्या फायद्या तोट्यांचा कुणी फार विचार करत नाही. मात्र, मिठी मारण्याचे खूपसारे फायदे होतात. मिठी मारल्यानं आराम तर मिळतोच, सोबतच सुरक्षाही वाटते. अशात मिठी मारण्याचे आणखी काय फायदे होतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून संधी मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला मिठी माराल.
मिठी मारल्यानं केवळ प्रेम वाढतं असं नाही तर नातंही मजबूत होतं. सोबत मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासही मदत मिळते. मिठी मारल्यानं तुमचं ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट कमी होतो. सोबतच हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. मिठी मारल्यानं कार्टिसोल हार्मोनची लेव्हल कमी होऊन स्ट्रेस दूर होण्यास मदत मिळते.
लव्ह हार्मोन रिलीज होतात
Bupa UK च्या रिपोर्टनुसार, जेव्हा आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसोबत विशेष पद्धतीनं बोलतो तेव्हा आपला मेंदू ऑक्सीटोसिन नावाचं एक केमिकल रिलीज करतो, ज्याला लव्ह किंवा हग हार्मोन म्हटलं जातं. हे तेव्हा रिलीज होतं जेव्हा तुम्ही कुणाला मिठी मारता किंवा कुणी तुम्हाला मिठी मारतं. यानं तुमचं नातं आणखी घट्ट होतं, सोबतच तणाव दूर करण्यास मदत मिळते.
ब्लड प्रेशर कमी होतं
एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, २० सेकंद कुणाला मिठी मारल्यानं ब्लड प्रेशर कमी करण्यास आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते. जर कुणी एखादं अवघड काम करण्यासाठी जात असेल किंवा एखाद्याला कशाची चिंता असेल तर त्यांना मिठी मारून रिलॅक्स करू शकता.
मूड चांगला होतो
मिठी मारल्यानं मूड चांगला होण्यास मदत मिळते. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, मिठी मारून बिघडलेला मूड चांगला करण्यास मदत मिळते. म्हणजे जर तुमचं कुणाशी भांडण झालं असेल त्या व्यक्तीला मिठी माराल तर तुम्हाला चांगलं वाटेल.
चिंता दूर होते
तुमच्या पार्टनरला किंवा जवळच्या व्यक्तीला मिठी मारल्यानं तुमची चिंता दूर करण्यास मदत मिळते. सोबतच एकटेपणाची भावनाही कमी करून आनंदाची जाणीव होते.