Lokmat Sakhi >Mental Health > घर आणि ऑफिस काम करुन वैतागलात, दमलात? ७ स्मार्ट उपाय, तुमचा स्ट्रेस होईल हमखास कमी

घर आणि ऑफिस काम करुन वैतागलात, दमलात? ७ स्मार्ट उपाय, तुमचा स्ट्रेस होईल हमखास कमी

Balance Between Work Life & Personal Life : वर्क लाइफ बॅलन्स ही सोपी गोष्ट नाही, त्यासाठी काही स्किल्स शिकावीच लागतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2022 03:54 PM2022-12-13T15:54:12+5:302022-12-13T16:32:20+5:30

Balance Between Work Life & Personal Life : वर्क लाइफ बॅलन्स ही सोपी गोष्ट नाही, त्यासाठी काही स्किल्स शिकावीच लागतील.

How Balance Between Work Life & Personal Life? 7 smart solutions | घर आणि ऑफिस काम करुन वैतागलात, दमलात? ७ स्मार्ट उपाय, तुमचा स्ट्रेस होईल हमखास कमी

घर आणि ऑफिस काम करुन वैतागलात, दमलात? ७ स्मार्ट उपाय, तुमचा स्ट्रेस होईल हमखास कमी

घरातील जबाबदाऱ्या, मुलं आणि आपलं काम सांभाळणं ही स्त्रियांसाठी सोपी गोष्ट नाही. कोणी नोकरी करते तर कोणी व्यवसाय, पण ऑफिस आणि घर सांभाळताना प्रत्येक बाईची तारांबळ उडतेच. वेळ कुठे कसा निघून जातो ते कळत नाही. अनेकवेळा इतकी कामे सगळ्या बाजूने धावून येतात की कुठले काम आधी करावे ते कळत नाही. येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा सामना करत ती या दोन्ही गोष्टी सांभाळत आहे. पण कधी मुलं आणि घर तर कधी ऑफिसच्या डेडलाईन हे सारं करताना ती दमून जाते. घर आणि ऑफिस एकाच वेळी सांभाळणाऱ्या वर्किंग वुमनसाठी काही खास टिप्स.. जरा प्लॅनिंग केलं तर ही कसरत सोपी होऊ शकेल.(Balance Between Work Life & Personal Life).

७ स्मार्ट गोष्टी

१. घरातल्या कामाची विभागणी करा - जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर घरातल्या कामाची जबाबदारी फक्त स्वतःवर न घेता इतरांनाही वाटून द्या. तुमच्या कुटुंबात जितकी लोक असतील त्यांच्याशी चर्चा करून रोजच्या कामाची यादी तयार करा. नेमून दिलेले काम हे त्या व्यक्तीनेच केले पाहिजे असा नियम सगळ्यांनीच स्वतःला घालून घेतला तर कामाचे ओझे राहणार नाही. 

२. मल्टीटास्किंग करा - घर आणि स्वतःचे करिअर घडवायचे असल्यास मल्टीटास्किंग जमणे गरजेचे आहे. एखादे काम करण्यात गुंतून जाऊ नका. प्रत्येक कामाला नेमून दिलेल्या वेळेत संपवण्याचा प्रयत्न करा. उदा.अगदी घरातली छोटी मोठी काम करताना आपल्या मुलांशी गप्पा मारा किंवा कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन लावली असता; कपडे धुवून होईपर्यंत घरातली इतर छोटी मोठी कामे करा.    

३. घर आणि ऑफिस यात समतोल राखा - घर आणि ऑफिस यात समतोल राखायला शिका. ऑफिसच्या कामाचा ताण - तणाव, टेन्शन, स्ट्रेस घरात येऊ देऊ नका; तसेच घरच्या कामाचे टेन्शन घरीच ठेवा ते ऑफिसमध्ये दिसू देऊ नका. 

४. सुट्टी एन्जॉय करा - आठवड्यातून एकदा मिळणारी हक्काची सुट्टी एन्जॉय करा. सुट्टीचा मिळालेला वेळ स्वतः काही नवीन शिकण्यात घालवा. तसेच घरच्यांना किंवा मित्र - मैत्रिणींना भेटा. 

५. आठवड्याचं प्लॅनिंग करा - जर पुढे येणाऱ्या आठवड्याचं प्लॅनिंग तुमच्याकडे असेल तर कोणत्या कामाला किती वेळ देता येईल हे आधी ठरवा. हे प्लॅनिंग करताना, घरातील कामांची यादी वेगळी आणि ऑफिसच्या कामांची यादी वेगळी असे विभाजन करा. 

६. अनावश्यक कामं टाळा - आपल्या ध्येयाशी संबंधित नसणाऱ्या, अनावश्यक कामांबद्दल जागरूक व्हा. त्यांच्यावर घालवत असलेला वेळ कमी करा. ज्या कामांचा भावी आयुष्यात फारसा उपयोग होणार नाही,अशा गोष्टींपासून दूर राहायला शिका. 

७. काही वेळ स्वतःसाठी काढा - रोज काही वेळ स्वतःसाठी आवर्जून राखून ठेवा. दिवसातील काही वेळ ध्यान, व्यायाम, वाचन करण्यात घालवा. यामुळे तुम्ही फ्रेश आणि आनंदी व्हाल.

Web Title: How Balance Between Work Life & Personal Life? 7 smart solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.