मोबाइलवर फोटो काढत नाही असं जगात कोण आहे? आणि कुणी आपले शंभर फोटो काढले तरी एखादाच मनासारखा येतो. तो सोशल मीडियात पाेस्ट करायचा तर तो ही जसाच्या तसा न टाकता हजार फिल्टर लावले जातात. फिल्टर नाहीच लावला तर नो फिल्टर असे टॅग लागतात. मात्र त्यामुळे होतं काय की आपण फिल्टर न लावता फोटाेत काय कुठंच सुंदर दिसत नाही असं अनेकांना वाटतं. मग तात्पुरते फिल्टर तर येतात पण स्वत: जसे आहोत तसे स्वीकारण्याचा स्वभाव मात्र बदलतो आणि आपणच आपल्याला आवडेनासे होतो. अनेकांच्या आयुष्यात असं घडतं.
असा स्वत:चाच राग राग किंवा स्वत:ला आपण जसे नाही तसे दाखवण्याचा अट्टहास माणसांचा आत्मविश्वासच संपवून टाकतो हे लक्षात येत नाही. स्वत:कडे आरशात नीट पाहिलंही जात नाही, पाहिलं तरी हजार त्रुटी दिसतात. आणि परिणाम म्हणजे आपली सेल्फ इमेजच कायमची बिघडून जाते.याचा अर्थ चांगले फोटो यावे, आपण सुंदर दिसावं म्हणून प्रयत्न करु नयेत असं नाही..
(Image :google)
काय करता येईल?
१. फोटो काढताना, विशेष फोटो असेल तर आडवे पट्टे असलेल्या ड्रेस कधीही घालू नका. त्यात जाड दिसतो. मल्टी कलरम कपडेही टाळा. योग्य फिटिंगचे कपडे घातले, प्लेन घातले तर आहो त्यापेक्षा बारीक दिसतो. २. फोटोसाठी स्माईल देताना हनुवटी थोडी वर उचला आणि जीभ टाळूला टेकवा. यामुळे तुमचा चेहरा बारीक दिसतो आणि तुम्हाला डबल चीन लपते.3. फोटोसाठी जरा तिरके वळून उभे रहा. एक पाय दुसऱ्याच्या पुढे ठेवा. आपोआप बारीक दिसाल.४. कॅमेऱ्यापासून योग्य अंतरावर उभे राहा.
(Image :google)
पण मग फिल्टरचं काय?फिल्टर तर हजार उपलब्ध आहेत. कलर करेक्शन करता येतातच. पण आपण ते करावे का? सतत करावे का? फिल्टर लावून जो चेहरा दिसतो, तो म्हणजे आपण का? हा प्रश्न स्वत:ला जरुर विचारावा..