Lokmat Sakhi >Mental Health > तुम्ही इमोशनली ‘ढ’ आहात की स्मार्ट? जवळची माणसंही छळतात तुम्हाला, ऑफिसातही सतत राजकारण..

तुम्ही इमोशनली ‘ढ’ आहात की स्मार्ट? जवळची माणसंही छळतात तुम्हाला, ऑफिसातही सतत राजकारण..

गणेश उत्सव स्पेशल : इमोशनल इंटिलिजन्स नावाचं सॉफ्ट स्किल नसेल तर आयुष्याच्या परीक्षेत नापास होण्याचा धोका! शिका सॉफ्ट स्किल्स स्पेशल सिरिज भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2023 07:00 AM2023-09-19T07:00:00+5:302023-09-21T12:00:39+5:30

गणेश उत्सव स्पेशल : इमोशनल इंटिलिजन्स नावाचं सॉफ्ट स्किल नसेल तर आयुष्याच्या परीक्षेत नापास होण्याचा धोका! शिका सॉफ्ट स्किल्स स्पेशल सिरिज भाग १

How do I teach myself emotional intelligence? Important soft skills for career -Ganesh- utsava special -1 | तुम्ही इमोशनली ‘ढ’ आहात की स्मार्ट? जवळची माणसंही छळतात तुम्हाला, ऑफिसातही सतत राजकारण..

तुम्ही इमोशनली ‘ढ’ आहात की स्मार्ट? जवळची माणसंही छळतात तुम्हाला, ऑफिसातही सतत राजकारण..

Highlightsइतरांच्या भावना समजून घेऊन त्याप्रमाणे वागा.

गणपती बुद्धीची देवता. आपण १० दिवस गणपतीची आराधना करताना आपली कौशल्य वाढवणार का? आपण काल जसे होतो त्यापेक्षा थोडे बरे आज होणार का असा प्रश्न पडला की मग इतरांना दोष न देता आपण स्वत:वर काम करणं सुरु करतो. गणपतीला साक्षी मानून, त्याचा आशीर्वाद मागत जर आपण एकेका कौशल्यावर काम केलं तर आपलं आजचं आणि उद्याचं जगणं नक्कीच कालपेक्षा चांगलं आणि आनंद असेल. नव्या काळात नुसती गुणवत्ता नाही तर आपले सॉफ्ट स्किल्सही तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं सॉफ्ट स्किल म्हणजे इमोशनल इंटिलिजन्स. आपली भावनिक बुद्धिमत्ता. ही या काळाची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. बुद्धिमत्ता थोडी उन्नीस असली तरी चालते, पण भावनिक बुद्धिमत्ता मात्र आपल्याकडे चांगली हवी. तरच आपल्याला सहानुभूतीसह भावना हाताळता येणं, इतरांना समजून घेणं जमेल. आणि स्वत:चा मानही राखणं जमेल!
आता बघा, आपल्याकडे एखाद्याच्या घरच्या कार्याला मदत करण्यासाठी खूपखूप माणसं जमा होतात. गावाकडे तर हा एकोपा जास्त दिसतो. शहरात तो कमी असला तरी ‘काही मदत लागली तर सांगा’ असं म्हटलं जातं. मदत केलीही जाते. टीमवर्क वेगळं शिकवावं लागत नाही. त्यामुळेच ‘हाऊ टू बिल्ड टीमवर्क’ अशा प्रकारची वर्कशॉप्स घ्यावी लागत नाहीत.
पण शहरात आता तसे वर्कशॉप घ्यावे लागतात कारण माणसांमध्ये आलेले एकारलेपण.
आपल्याकडे कितीही वस्तू असल्या आणि त्या घेऊन आपण कितीही मिरवल्या तरी वस्तू आपल्या मदतीला येत नाही. आपल्या सुखदु:खात सहभागी होत नाहीत. तिथं माणसंच हवीत. विविध लोकांशी असलेले चांगले संबंध, एकमेकांबद्दल वाटणारी सहानुभूती, घरची माणसं, शेजारी, ऑफीसातले ही सगळी माणसं आपण जोडली पाहिजे. प्रसंगी त्यांनाही मदत करायला हवी. विशेषत: जेव्हा एखादं आर्थिक संकट कोसळतं, अचानक कोणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं, तेव्हा माणसंच उपयोगाला येतात.
ही जी माणसं आहेत त्यालाच नव्या, आधुनिक जगात ‘सोशल कॅपिटल’ असं म्हणतात. 
ते वाढवायचं तर आपला आयक्यू अर्थात भावनिक बुद्धिमत्ता उत्तम हवी. 
आपल्याला आपल्या भावना हाताळता यायल्या हव्या. नेमक्या शब्दात व्यक्त करता यायला हव्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या डोक्याला इतरांच्या वागण्याचा त्रास होता कामा नये किंवा तो झाला तरी तो प्रॅक्टिकली समजून त्यावर उपाय शोधता यायला हवेत. 



ते कसं करायचं?

१. आधी स्वत:च्या भावना ओळखा.
२. आपल्याला कशाचा राग येतो, आनंद होतो, मूड जातो ते ओळखा.
३. आपण कसे रिॲक्ट करतो, इतरांना काय बोलतो कसे बोलतो हे पाहा.
४. आपण भावनांवर नियंत्रण ठेवतान त्या नीट हाताळतो की धुसपूस करतो. गॉसिपही करतो का हे पाहा.
५. सतत इतरांशी तुलना, सतत गॉसिप, याचं त्याचं करता याचा अर्थ तुम्ही स्वत: भावनिक असुरक्षित आहात. ते प्रगतीला मारक आहे.
६. इतरांच्या भावना समजून घेऊन त्याप्रमाणे वागा.
७. अनेक इमोशनल फ्री कोर्सेस ऑनलाइन उपलब्ध आहेत. ते करा. 
https://www.coursera.org/courses?query=emotional%20intelligence
 

Web Title: How do I teach myself emotional intelligence? Important soft skills for career -Ganesh- utsava special -1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.