Join us  

How Does Sunlight Affect Our Mood : उन्हामुळे खूप चिडचिड होते? रागावर कंट्रोल ठेवण्यासाठी १० टिप्स; डोकं, मन दोन्ही राहील शांत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 12:44 PM

How Does Sunlight Affect Our Mood : या लेखात तुम्हाला रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मूड नेहमी चांगला ठेवण्यासाठी कोणते बदल करायला हवेत याबाबत सांगणार आहोत.

उष्णतेच्या लाटांमुळे सर्वजण हैराण झाले आहेत. गरमीपासून सुटका करून घेण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. परंतु अजून काही दिवस तरी गरमी कमी होण्याची चिन्हे नाहीत. परंतु या गरमीमुळे चिडचिड होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे.  आधीच घामानं हैराण त्यात  कोणत्याही गोष्टीचा चटकन राग आल्यानं चिडचिड होते तर कधी संपूर्ण दिवस खराब जातो. या लेखात तुम्हाला रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मूड नेहमी चांगला ठेवण्यासाठी कोणते बदल करायला हवेत याबाबत सांगणार आहोत. (Sun Impacts Your Mental Health)

१) रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी काय करायचं?

पाणी भरपूर प्यावे जेणेकरून शरीरातील पाण्याची पातळी कायम राखली जाईल, थंडावा असलेल्या जागेत काही काळ राहा,कितीही व्यस्त वेळापत्रक असले तरी स्वत:साठी वेळ काढावा. सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी चालावे., कामाच्या ठिकाणी बेबी प्लांट्स लावता आल्यास उत्तम.

2) चिडचिड  कमी होण्यासाठी काय खायचं नाही?

कॉफी : थकवा दूर करण्यासाठी कॉफीला प्राधान्य दिले जाते. त्यात कॅफिन असल्याने ऊर्जा वाढते. परंतु त्यामुळे रागाचा पारा वाढू शकतो. म्हणून गरमीमध्ये कॉफी घेणं टाळा.

घरात लाल मुंग्यांनी धुमाकूळ घातलाय; फक्त ५ उपाय, मुंग्यांची रांग होईल कमी

टोमॅटो : आयुर्वेदिक दृष्टिकोनातून टोमॅटो शरीरासाठी गरम असतो. त्याच्या सेवनाने चिडचिड वाढू शकते.

मसालेदार पदार्थ : या प्रकारच्या पदार्थांमुळे शरीरातील गरमी अधिक वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात हे पदार्थ टाळावेत.

काय सांगते संशोधन?

अमेरिकेतील ॲरिझोना रिसर्च सेंटरने केलेल्या अभ्यासात उच्च तापमानामुळे लोकांमध्ये चिडचिड वाढत असल्याचे निदर्शनास आले. उष्णतेमुळे डोके तापते. मेंदूला पुरेसा प्राणवायू आणि हायड्रेशन न मिळाल्यास त्याची प्रतिक्षिप्त क्रिया उमटते. त्यामुळे चिडचिड वाढते.

लैंगिक संबंधात रसच नाही; आपल्यात ‘ताकद’च नाही असं वाटण्याचे काय कारण? तज्ज्ञ सांगतात..

कोणते पदार्थ खायचे?

नारळ पाणी 

संत्री

केळी

आयुर्वेदिक चहा 

हिरव्या भाज्या  डार्क चॉकलेट 

आक्रोड 

ग्रीन टी

 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यमासिक पाळी आणि आरोग्य