Lokmat Sakhi >Mental Health > लिंबाचा वास घेतला तर स्ट्रेस कमी होतो, एकदम रिलॅक्स वाटतं हे खरं की खोटं?

लिंबाचा वास घेतला तर स्ट्रेस कमी होतो, एकदम रिलॅक्स वाटतं हे खरं की खोटं?

How Lemon Benefits Mental Health स्ट्रेस कमी करण्याचे अनेक उपाय आहेत, त्यात लिंबाचा एक उपायही सांगितला जातो. तो करावा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2023 10:50 AM2023-09-09T10:50:00+5:302023-09-09T10:50:02+5:30

How Lemon Benefits Mental Health स्ट्रेस कमी करण्याचे अनेक उपाय आहेत, त्यात लिंबाचा एक उपायही सांगितला जातो. तो करावा का?

How Lemon Benefits Mental Health | लिंबाचा वास घेतला तर स्ट्रेस कमी होतो, एकदम रिलॅक्स वाटतं हे खरं की खोटं?

लिंबाचा वास घेतला तर स्ट्रेस कमी होतो, एकदम रिलॅक्स वाटतं हे खरं की खोटं?

आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचं स्ट्रेस आहे. काहींना अभ्यासाचं टेन्शन तर काहींना आपल्या कामाचं. प्रत्येक गोष्टीत टेन्शन घेण्याची सवय अनेकांना असते. मात्र, या करणामुळे शारीरिकसह मानसिक स्थिती देखील बिघडते. जर आपण सतत ताण - तणावात जगत असाल तर, ब्लड प्रेशर, हृदयाच्या निगडीत समस्या, पोटाशी संबंधित आजार, लठ्ठपणा इत्यादी गोष्टींचा त्रास व्यक्तीला होऊ शकतो. त्यामुळे स्ट्रेसचे शिकार बनू नका, त्याला कमी करण्याचा प्रयत्न करा.

स्ट्रेस कमी करण्यासाठी अनेक जण लिंबाचा वास घेण्याचा सल्ला देतात. पण खरंच याने स्ट्रेस कमी होतो का? यासंदर्भात, आहारतज्ज्ञ प्रियांका जैस्वाल यांनी हरजिंदगी या वेबसाईटला माहिती दिली आहे(How Lemon Benefits Mental Health).

तणावाची लक्षणे कोणती?

- सतत डोकेदुखी

- जास्त किंवा कमी झोपणे

- सतत नकारात्मक विचार करणे

तासंतास बसून काम करताय? बैठ्या जीवनशैलीमुळे पोट - कंबर सुटले? ५ उपाय - वजन वाढणार नाही...

- स्वतःला कमी लेखणे

- लहान सहान गोष्टीत चीडचीड करणे

- कमी बोलणे, प्रत्येक गोष्ट दुर्लक्ष करणे

- खूप किंवा कमी खाणे

- कामात मन न लागणे

लिंबाचा वास घेतल्यानं ताण होतो दूर

तज्ज्ञांच्या मते, 'लिंबाचा वास घेतल्याने तणाव दूर होतो. यासह काही मिनिटात आपल्याला फ्रेश व उत्साही वाटू लागते. लिंबाच्या वासाने आपल्या वागण्यावरही बदल घडते. ज्यामुळे काही मिनिटात आपले मूड फ्रेश होते.'

व्यायाम - डाएट करूनही तिशीनंतर वजन कमी का होत नाही? ५ कारणं, वेळीच बदला नाहीतर..

ते पुढे म्हणतात, 'लिंबाचा वापर अनेक चिंताग्रस्त लोकांवर उपचार करण्यासाठी केला जातो. लिंबाचा वास कॉग्निटिव फंक्शनमध्ये सुधार आणू शकते. लिंबूवर्गीय सुगंध मन सक्रिय करते. यासह सेरोटोनिनचे उत्पादन वाढवते. हे एक हॅपी हार्मोन आहे. यामुळे थकवा दूर होतो आणि चांगली झोपही लागते.'

स्ट्रेस कमी करण्यासाठी इतर उपाय

- जर आपल्याला सतत स्ट्रेस घेण्याची सवय असेल तर, ८ तासांची पूर्ण झोप घ्या. झोप घेतल्याने आपला स्ट्रेस काही अंशी कमी होऊ शकते.

- मेडीटेशन आणि व्यायाम हा एक शक्तिशाली स्ट्रेस बस्टर आहे. ज्यामुळे ब्रेन अॅक्टिव्ह मोडवर राहते. यासह नियमित योगा करा.

- मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचे सेवन करा. जंक फूडपासून दूर राहा, हेल्दी पदार्थ खा.

Web Title: How Lemon Benefits Mental Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.