Join us  

कायम आनंदी राहायचं तर नियमित करा फक्त ३ गोष्टी, नैराश्य राहील दूर- शिका आनंदी राहण्याचं सोपं सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2022 4:19 PM

How to Be Happy Always : आपण आनंदी नसू तर त्याचा परिणाम आपल्या एकूण मानसिक अवस्थेवर तर होतोच, पण त्याचा आपल्या आरोग्यावर, प्रोफेशनल लाईफवर आणि कौटुंबिक आरोग्यावरही वाईट परीणाम होतो.

ठळक मुद्देआपण विनाकारण काही गोष्टींचा स्वत:ला त्रास करुन घेतो आणि आपला आनंद गमावून बसतो. आनंद ही आतून अनुभवण्याची गोष्ट आहे, मन स्थिर नसेल तर आपण कधीच आनंदी होऊ शकत नाही.

आनंद हा आपल्या मानण्यात असतो असं आपण अनेकदा ऐकतो. पण प्रत्यक्ष वेळ आली की आपलं मन खट्टू झाल्याशिवाय राहत नाही. असं आपल्या सगळ्यांच्याच बाततीत बरेचदा होतं. आपण नेहमी ठरवतो आपण आनंदी राहणार आणि काही ना काही कारणांनी आपल्याला दु:ख होतं आणि आपण निराश होतो. याच निराशेचे प्रमाण वाढले तर त्याचे रुपांतर नकारात्मकतेत होते आणि एक वेळ अशी येते की आपण सारखेच नकारात्मक विचार करायला लागतो. याचा परिणाम आपल्या एकूण मानसिक अवस्थेवर तर होतोच पण त्याचा आपल्या आरोग्यावर, प्रोफेशनल लाईफवर आणि कौटुंबिक आरोग्यावरही वाईट परीणाम होतो. म्हणूनच आपण कायम आनंदी असावं आतून फ्रेश असावं यासाठी काही अगदी सोप्या गोष्टी करण्याची आवश्यकता असते (How to Be Happy Always). 

१. तुलना नको 

अनेकदा आपण नकळत आपल्या सोबतचे मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी यांच्याशी आपली किंवा आपल्या कुटुंबाची, जोडीदाराची तुलना करतो. पण अशाप्रकारे तुलना केल्याने आपल्या परिस्थितीत काहीच फरक पडत नाही. उलट आपल्यालाच त्याचा त्रास होत राहतो. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि तुलना करणे टाळा.

२. आपला आनंद भौतिक गोष्टींवर अवलंबून नको 

अनेकदा आपला आनंद हा कपडे, वस्तू, खरेदी, ट्रीप, हॉटेलिंग किंवा आणखी काही गोष्टींवर अवलंबून असतो. पण अशाप्रकारे आनंदासाठी बाह्य गोष्टींची गरज असू नये. तो आनंद आपल्या आत असावा. यासाठी सकारात्मक विचार, आपल्याला आयुष्यात नेमके काय हवे याची स्पष्टता यांसारख्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे. 

३.  दुर्लक्ष करणे 

जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्या जीवाचं बरं वाईट होण्यापर्यंत घडत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा किती त्रआस करुन घ्यायचा हे आपल्या हातात आहे. अनेकदा आपण विनाकारण काही गोष्टींचा स्वत:ला त्रास करुन घेतो आणि आपला आनंद गमावून बसतो. पण त्यामुळे आपलेच नुकसान होते, त्यामुळे अनावश्यक गोष्टींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे गरजेचे आहे.  

टॅग्स :मानसिक आरोग्यलाइफस्टाइल