Lokmat Sakhi >Mental Health > How To Deal With Loneliness : खूप एकटं वाटतं, कशातंच मन लागत नाही? ३ उपाय, नेहमी राहाल आनंदी, उत्साही

How To Deal With Loneliness : खूप एकटं वाटतं, कशातंच मन लागत नाही? ३ उपाय, नेहमी राहाल आनंदी, उत्साही

How To Deal With Loneliness : एकटेपणा तुम्हाला केवळ मानसिकच नाही तर शारीरिकदृष्ट्याही आजारी बनवू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 09:08 AM2022-06-29T09:08:09+5:302022-06-29T09:10:01+5:30

How To Deal With Loneliness : एकटेपणा तुम्हाला केवळ मानसिकच नाही तर शारीरिकदृष्ट्याही आजारी बनवू शकतो.

How To Deal With Loneliness : loneliness is risky for your health 3 Ways to Deal With Loneliness | How To Deal With Loneliness : खूप एकटं वाटतं, कशातंच मन लागत नाही? ३ उपाय, नेहमी राहाल आनंदी, उत्साही

How To Deal With Loneliness : खूप एकटं वाटतं, कशातंच मन लागत नाही? ३ उपाय, नेहमी राहाल आनंदी, उत्साही

एकटेपणा अनेकदा लोकांना तणावाखाली ठेवण्याचे किंवा त्यांना नैराश्यात टाकण्याचे काम करतो. तुम्हालाही या समस्येतून जाण्याचा अनुभव कधी ना कधी आला असेल. (Mental Health Tips) असे अनेक वेळा घडते जेव्हा त्या व्यक्तीचे म्हणणे किंवा समस्या ऐकण्यासाठी कोणीही नसते. जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना जास्त मित्र नाहीत. त्यांनी हा लेख नक्की वाचायला हवा.

एकटेपणा तुम्हाला केवळ मानसिकच नाही तर शारीरिकदृष्ट्याही आजारी बनवू शकतो. जगभर एकटेपणाची समस्या झपाट्याने वाढत आहे, विशेषतः वृद्धांमध्येच नाही तरूणांमध्येही एकटेपणाची समस्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते.  एकटेपणा म्हणजे काय आणि ते आपले कसे नुकसान करू शकतो समजून घेऊया (How To Deal With Loneliness)

सतत मनात विचार येत असतात, चिडचिड होते? 4 उपाय, दिवसभर डोकं, मन राहील शांत

अमेरिकन नियतकालिकानुसार, एकाकीपणाचे दोन प्रकार आहेत. यामध्ये, एकटेपणाचा पहिला प्रकार म्हणजे सामाजिक. ज्यामध्ये लोक अनेकदा एकाकीपणातून जात असतात कारण त्यांच्या आयुष्यात कोणीही मित्र किंवा कुटुंबीय नसतात. म्हणजेच, जे लोक मित्र किंवा कुटुंबापासून पूर्णपणे वेगळे राहतात. दुसरा एकटेपणा म्हणजे व्यक्तिनिष्ठ एकाकीपणा, ज्यामध्ये लोक जवळ असतात परंतु त्यांना काहीही जाणवत नाही.

एकटेपणाचा परिणाम

ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी आणि बोस्टनच्या ब्रिघम आणि वुमेन्स हॉस्पिटलच्या मते,  तुम्ही एकटेपणाचे बळी असाल तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर नक्कीच होणार आहे. जे लोक मित्र किंवा कुटुंबापासून दूर राहतात, त्यांना दिवसातून सुमारे 15 सिगारेट ओढण्याइतकाच आरोग्य खराब होण्याचा धोका वाढतो. दुसर्‍या संशोधनानुसार, कोणत्याही प्रकारचा एकटेपणा असलेल्या लोकांमध्ये मृत्यूचा धोका सुमारे 30 टक्क्यांनी वाढतो.

टेंशन फ्री आयुष्य जगणं सोप्पयं! फक्त ३ रूल्स फॉलो करा, मानसिक आरोग्य राहील उत्तम

यूसीएलएच्या संशोधनानुसार, एकाकीपणामुळे शरीरात जळजळ होण्याचा धोका वाढतो. यासोबतच ते आपली रोगप्रतिकारक शक्ती बिघडवण्याचे काम करते, जे बॅक्टेरियांशी लढण्याचे काम करते. या सर्वांशिवाय, एकटेपणातील लोक अनेकदा दारू पिणे, तणावाखाली सिगारेटचे सेवन करणे यांसारख्या गोष्टी करू लागतात, जे शरीरासाठी खूप हानिकारक आहे.

1) एकटे राहण्यामागे नक्कीच काही कारण आहे आणि ते कारण तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोणालाच माहीत नाही. एखाद्याशी बोलून जर तुम्हाला बरे वाटत असेल तर तुमची समस्या त्या व्यक्तीशी शेअर करा. यामुळे तुमचे मन थोडे हलके होईल जे तुमच्यासाठी चांगले असू शकते.

२) आपल्यासोबत बाहेर फिरायला कोणी जोडीदार नाही या विचाराने अनेक वेळा लोक घरातून बाहेर पडत नाही. फक्त या विचाराने तुम्ही स्वतःला घरात बंदिस्त करू लागता. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी घराबाहेर पडून फिरणे आवश्यक आहे.

३) एकटे राहिल्याने तुमचे विचार अधिक नकारात्मक होतात आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही नवीन आणि चांगले अनुभव मिळू शकत नाहीत. नवीन ठिकाणी सहलीला जा.  यामुळे तुमचा एकटेपणा, भिती दूर होऊन सकारात्मक बदल जाणवेल. नवीन अनुभव येतील.

Web Title: How To Deal With Loneliness : loneliness is risky for your health 3 Ways to Deal With Loneliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.