Lokmat Sakhi >Mental Health > डोक्यात सतत निगेटिव्ह विचार येतात, मन अजिबात शांत नसतं? १ सोपा उपाय- स्ट्रेस होईल कमी चटकन

डोक्यात सतत निगेटिव्ह विचार येतात, मन अजिबात शांत नसतं? १ सोपा उपाय- स्ट्रेस होईल कमी चटकन

How To Get Rid Of Negative Thinking: डोक्यात सतत निगेटिव्ह विचार येत असतील तर ते घालविण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा... (best remedies for positive thinking)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2024 03:13 PM2024-09-18T15:13:31+5:302024-09-18T17:50:07+5:30

How To Get Rid Of Negative Thinking: डोक्यात सतत निगेटिव्ह विचार येत असतील तर ते घालविण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा... (best remedies for positive thinking)

how to get rid of negative thinking, best remedies for positive thinking, how to do ksepana mudra, benefits of ksepana mudra | डोक्यात सतत निगेटिव्ह विचार येतात, मन अजिबात शांत नसतं? १ सोपा उपाय- स्ट्रेस होईल कमी चटकन

डोक्यात सतत निगेटिव्ह विचार येतात, मन अजिबात शांत नसतं? १ सोपा उपाय- स्ट्रेस होईल कमी चटकन

Highlightsमनातले नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी आलिया भट, करिना कपूर यांच्यासारख्या सेलिब्रिटींना योगा ट्रेनिंग देणाऱ्या अंशुका परवानी यांनी सांगितलेला हा एक उपाय करून पाहा..

काही जण असे असतात की त्यांच्या डोक्यात सतत निगेटिव्ह विचार चालू असतात. यामध्ये महिलांचे प्रमाण तर जरा जास्तच असते. स्वत:बाबत, मुलांबाबत, नवऱ्याबाबत किंवा एखाद्या नातेवाईकाबाबत त्या सातत्याने नकारात्म्क विचार करत असतात (how to get rid of negative thinking). आपल्या आयुष्यात काहीच पॉझिटीव्ह होत नाही, सगळं वाईट आपल्या बाबतीतच होतं, असा त्यांचा ठाम विश्वास असतो. असा नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींना तर त्यांच्या या सवयीचा त्रास होतोच, पण त्यांच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तींसाठीही ते त्रासदायक ठरतं. म्हणूनच मनातले नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी आलिया भट, करिना कपूर यांच्यासारख्या सेलिब्रिटींना योगा ट्रेनिंग देणाऱ्या अंशुका परवानी यांनी सांगितलेला हा एक उपाय करून पाहा.. (best remedies for positive thinking)

 

मनातले नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी उपाय

मनातले नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ अंशुका यांनी इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

ब्रेस्ट कॅन्सरची ट्रिटमेंट सुरु असतानाही हिना खान करतेय कसून व्यायाम, ते पाहूनच चाहते म्हणाले...

यामध्ये त्यांनी क्षेपण मुद्रा करण्याचा सल्ला दिला आहे. दिवसांतून १० ते १५ मिनिटे हातांची क्षेपन मुद्रा करा आणि डोळे मिटून पाठीचा कणा ताठ ठेवून शांत बसा, असं त्या सांगतात.

यामुळे तुमचं मन शांत होईल, मनात नको ते विचार येणार नाहीत आणि नकारात्मकता जाऊन पॉझिटिव्ह, आनंद वाटू लागेल.

 

क्षेपण मुद्रा कशी करावी?

क्षेपण मुद्रा करण्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी एखाद्या शांत जागी ताठ बसा.

त्यानंतर दोन्ही हातांचे अंगठे आणि पहिलं बाेट साेडून उर्वरित बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. 

वाटली डाळ गचका होते- छातीत बसते? 'ही' रेसिपी ट्राय करा! डाळ होईल मोकळी, चटपटीत

यानंतर दोन्ही हातांचे पहिले बोट म्हणजेच अनामिका एकमेकांना जोडून घ्या आणि अंगठे एकमेकांवर ठेवा. 

आता तुमच्या हाताची जी स्थिती तयार झाली आहे तिला क्षेपण मुद्रा असं म्हणतात. ही मुद्रा करून तुम्ही हात छातीच्या जवळही ठेवू शकता. दिवसाच्या सुरुवातीला क्षेपण मुद्रा करता आली तर अधिक उत्तम. सकारात्मक वाटण्यासाठी काही दिवस हा प्रयोग नक्की करून पाहा. 


 

Web Title: how to get rid of negative thinking, best remedies for positive thinking, how to do ksepana mudra, benefits of ksepana mudra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.