Lokmat Sakhi >Mental Health > कामाचा ताण वाढल्याने डोकं जड होतं-भणभणतं? 'हा' चहा प्या, स्ट्रेस कमी होऊन रिलॅक्स वाटेल

कामाचा ताण वाढल्याने डोकं जड होतं-भणभणतं? 'हा' चहा प्या, स्ट्रेस कमी होऊन रिलॅक्स वाटेल

Best Solution To Get Relief From Mental Stress: कधी कधी असं होतं की कामाचा ताण खूप असह्य होऊन जातो. असं झालं की हा एक सोपा उपाय करून पाहा..(morning drink that helps to balance cortisol hormone and reduces stress level)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2025 16:31 IST2025-03-29T14:29:55+5:302025-03-29T16:31:33+5:30

Best Solution To Get Relief From Mental Stress: कधी कधी असं होतं की कामाचा ताण खूप असह्य होऊन जातो. असं झालं की हा एक सोपा उपाय करून पाहा..(morning drink that helps to balance cortisol hormone and reduces stress level)

how to get rid of stress, best solution to get relief from mental stress, morning drink that helps to balance cortisol hormone and reduces stress level | कामाचा ताण वाढल्याने डोकं जड होतं-भणभणतं? 'हा' चहा प्या, स्ट्रेस कमी होऊन रिलॅक्स वाटेल

कामाचा ताण वाढल्याने डोकं जड होतं-भणभणतं? 'हा' चहा प्या, स्ट्रेस कमी होऊन रिलॅक्स वाटेल

Highlightsजेव्हा ताण वाढतो तेव्हा शरीरातल्या कॉर्टिसोल हार्मोन्सचे प्रमाणही वाढत असते. तो हार्मोन पुन्हा नियंत्रित करून मनावरचा वाढलेला ताण कमी करण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातले काही पदार्थ उपयुक्त ठरू शकतात.

हल्ली प्रत्येकाच्याच मागचा ताण खूप वाढला आहे. कोणाला ऑफिसमधल्या कामाचा ताण असतो तर कोणाला घरकाम, घरातल्या सगळ्यांच्या वेळा, आवडीनिवडी हे सगळं सांभाळताना ताण येतो. नातेसंबंधातले ताणही मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या खूप थकवणारे असतात. जेव्हा असे ताण वाढतात तेव्हा एक वेळ अशी येते की ते सहन करणं अशक्य होतं. डोकं अजिबातच चालत नाही. सुन्न होतं आणि काहीच सुचत नाही. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स करणारा हा एक सोपा उपाय पाहून घ्या. यामुळे ताण कमी होऊन नक्कीच तुम्ही रिफ्रेश व्हाल असं एक्सपर्ट सांगत आहेत..(morning drink that helps to balance cortisol hormone and reduces stress level)

 

मनावरचा ताण कसा कमी करावा?

स्ट्रेस किंवा मनावरचा ताण कमी करण्यासाठी काय उपाय करता येईल याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ श्वेता शाह यांनी शेअर केली आहे. यामध्ये त्या सांगतात की जेव्हा ताण वाढतो तेव्हा शरीरातल्या कॉर्टिसोल हार्मोन्सचे प्रमाणही वाढत असते.

श्रीखंडाला येईल केशराचा सुगंध आणि मस्त केशरी रंग, या पद्धतीने घाला केशर- श्रीखंड होईल चवदार

तो हार्मोन पुन्हा नियंत्रित करून मनावरचा वाढलेला ताण कमी करण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातले काही पदार्थ उपयुक्त ठरू शकतात. ते पदार्थ नेमके कोणते आणि कशा पद्धतीने ते खावे, याविषयीची ही माहिती..

 

श्वेता यांनी सांगितलेला उपाय करण्यासाठी हळद, दालचिनी पावडर, सुंठ, बडिशेपाची पावडर हे चार पदार्थ प्रत्येकी पाव वाटी या प्रमाणात घ्यावे. त्यामध्ये १ टेबलस्पून पिंक सॉल्ट घालावे.

भुवया खूपच पातळ झाल्या? १ सोपा उपाय करा- भुवया होतील जाड, काळ्याभोर आणि रेखीव

आता हे पदार्थ व्यवस्थित हलवून मिश्रण एका बरणीमध्ये भरून ठेवावे. जेव्हा तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असाल तेव्हा दोन कप गरम पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये लिंबाचा थोडा रस घाला आणि तयार केलेलं मिश्रण १ टीस्पून एवढं घाला. पाण्यामध्ये सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि गरम असतानाच हा काढा प्या.. यामुळे मनावरचा ताण तर कमी होईलच पण त्याशिवाय इतरही अनेक फायदे होतील.  


 

Web Title: how to get rid of stress, best solution to get relief from mental stress, morning drink that helps to balance cortisol hormone and reduces stress level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.