सगळं ठिक सुरू असलं तरी काही वेळा आपण उगाचच उदास असतो. रोज तेच तेच काम, घर, आजुबाजूला सतत तीच माणसं यामुळे आपल्याला एकप्रकारचे मानसिक थकवा आल्यासारखं होतं. अशावेळी वेगळं किंवा आपल्या आवडीचं काही करायचं म्हटलं तरी आपल्याला नको नको होतं. एखादवेळी असं झालं तरी ठिक आहे, पण नेहमी नेहमी असं होणं आपल्याला परवडणारं नसतं. अशावेळी आपल्या शरीराला काही हॅप्पी हार्मोन्सची प्रकर्षाने गरज आहे, हे ओळखायला हवं. हे हॉर्मोन्स वाढावेत यासाठी काही किमान प्रयत्न केल्यास आपली मानसिक आणि शारीरिक अवस्था चांगली ठेवण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होतो (How To Increase Happy Harmons and Stay Happy).
आपला मूड, आनंद या गोष्टींचा आपल्या शरीरात स्त्रवणाऱ्या हार्मोन्सशी अतिशय जवळचा संबंध असतो. त्याच हार्मोन्सला बोली भाषेत आपण हॅप्पी हार्मोन्स म्हणून ओळखतो. सेरोटोनिन (Serotonin), एण्डोर्फिन्स (Endorphins), डोपामाईन (Dopamine) आणि ऑक्सिटोसिन (Oxytocin) हे ते चार हॅप्पी हार्मोन्स आहेत. हे हार्मोन्स आपल्या शरीरात सकारात्मक विचार आणण्यास, आपलं मन आनंदी, उत्साही ठेवण्यास आणि मूड चांगला ठेवण्यास मदत करतात. या हॅपी हार्मोन्सची शरीरात जास्तीत जास्त प्रमाणात निर्मिती व्हावी यासाठी काय करावं हे समजून घेऊया.
१. डोपामाईन (Dopamine)- हे एक बक्षिसाच्या स्वरुपातले केमिकल आहे
- कल्पक काहीतरी करत राहणे
- लहान यशाचे सेलिब्रेशन करणे
- आपल्या टु डू लिस्टमधील काहीतरी आवर्जून करणे
- नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करणे
२. सेरोटोनिन (Serotonin) - मूड चांगला करण्यास उपयुक्त
- पळायला जा
- सूर्यप्रकाशात जा
- निसर्गात चाला
- ध्यान करा
३. ऑक्सिटोसिन (Oxytocin) - प्रेमाचा हार्मोन
- ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना मिठी मारा आणि किस करा
- गाणी ऐका
- इतरांची प्रशंसा करा
- लहान मुलांसोबत खेळा
४. एण्डोर्फिन्स (Endorphins) - दु:ख दूर करणारे हार्मोन
- डार्क चॉकलेट खा
- व्यायाम करा
- मनसोक्त हसा
- गरम पाण्याने आंघोळ करा