Join us  

कितीही स्वत:ला छळलं-झापलं तरी जगणं बदलत नाही, असं का? प्रेमच नाही तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2024 8:00 AM

आपल्याला आपल्याविषयीच प्रेम वाटलं नाही तर इतरांविषयी कसं वाटेल?

ठळक मुद्देजगणं सोपं असतं आपण उगीच ते अवघड करतो.

आजूबाजूला प्रचंड स्पर्धा असते. आपल्यावर आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं, काहीतरी घडवायचं, आयुष्याला चांगला आकार देण्याचं प्रेशर असतं. आणि त्यामुळे आपला स्ट्रेस वाढायला लागतो. इतका की आपलं मानसिक स्वास्थ्य कधी बिघडतं हे आपल्या लक्षातही येत नाही. आपण किती प्रयत्न करतो आनंदी राहण्याचा पण आतून रिकामं पोकळ वाटतं.मनावर काम कधी करणार? खरंतर मनाला हलकं वाटण्यासाठीही आपण काही गोष्टी करु शकतो. पण अट एकच स्वत:साठी करायचं, इतरांना चांगलं वाटावं म्हणून काहीही करायचं नाही. 

 

(Image :google)

काय करता येईल?

१. बोला. मित्रमैत्रिणी करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. अपेक्षा न ठेवता इतरांसाठी मनापासून काही करा. म्हणजे एकटेपण अंगावर आदळणार नाही. आजूबाजूचे लोक इतके वाईट नसतात, चांगली माणसं भेटतात यावर विश्वास वाढेल.२. घरातल्या माणसांशी प्रेमानं वागा. त्यांच्याशी बोला. जमवून घ्या. आपल्या जवळच्या माणसांइतकं आपली साथ कुणीच देऊ शकत नाही. आपल्याच घरात आपल्यासाठी चांगलं चिंतणारं कोणी३. स्वत:च्या आनंदासाठी काही करा. शिका. छंद बाळगा. हातातला फोन जरा खाली ठेवा.

४. झोप, जेवण आणि व्यायाम तीन गोष्टी रोज वेळच्यावेळी करा. झोप नाही झाली की मन बिथरतंच.५. आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. आपण वाईटच गोष्टी कायम आठवतो. त्या चिवडतो. इतरांचं चांगलं काही झालं की ते पाहून कुढतो. असं करण्याचं काहीच कारण नाही. आपल्या आयुष्यातही चांगलं घडतंच. ते शोधायला हवं. अमुक असंच आणि तमुक तसंच हे शिक्के मारण्याची घाई करायची नाही. लॉंग रोप द्यायचा. दुसऱ्या, तिसऱ्या बाजू समजून घेण्यासाठी मनात जागा ठेवायची. त्यातून विचारांना, मताला एकच एक रंग चढत नाही. दिल दिमाग खुला रखने का..

जगणं सोपं असतं आपण उगीच ते अवघड करतो.

टॅग्स :मानसिक आरोग्यआरोग्य