Lokmat Sakhi >Mental Health > सतत चिंता, लोक काय म्हणतील? हा सिण्ड्रोम घालवण्यासाठी तज्ज्ञ सांगतात 8 सोप्या गोष्टी

सतत चिंता, लोक काय म्हणतील? हा सिण्ड्रोम घालवण्यासाठी तज्ज्ञ सांगतात 8 सोप्या गोष्टी

आपलं काम करताना, आपल्या विचारांनुसार वागताना इतरांची मतं विचारात घेणं, लोकं काय म्हणता हे समजावून घेणं ही आवश्यक बाब आहे पण लोकं काय म्हणतील याची भीती बाळगून (social fear syndrome) आपल्या कामावर परिणाम करुन घेणं ही एक प्रकारची विकृती आहे. 'लोक काय म्हणतील?' या सिंड्रोममधून बाहेर पडण्याचे (how to overcome on social fear syndrome) उपाय असून ते आपल्यालाच करणं गरजेचे आहेत. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 01:51 PM2022-08-23T13:51:34+5:302022-08-23T14:00:16+5:30

आपलं काम करताना, आपल्या विचारांनुसार वागताना इतरांची मतं विचारात घेणं, लोकं काय म्हणता हे समजावून घेणं ही आवश्यक बाब आहे पण लोकं काय म्हणतील याची भीती बाळगून (social fear syndrome) आपल्या कामावर परिणाम करुन घेणं ही एक प्रकारची विकृती आहे. 'लोक काय म्हणतील?' या सिंड्रोममधून बाहेर पडण्याचे (how to overcome on social fear syndrome) उपाय असून ते आपल्यालाच करणं गरजेचे आहेत. 

How to overcome on social fear syndrome? 8 tips for overcome social fear syndrome. | सतत चिंता, लोक काय म्हणतील? हा सिण्ड्रोम घालवण्यासाठी तज्ज्ञ सांगतात 8 सोप्या गोष्टी

सतत चिंता, लोक काय म्हणतील? हा सिण्ड्रोम घालवण्यासाठी तज्ज्ञ सांगतात 8 सोप्या गोष्टी

Highlightsआपले प्राधान्यक्रम आपण ठरवावेत. लोकांच्या दृष्टिकोनातून आपलं काम ठरवू नये.आपले विचार, आपली आवड याबाबत सजग राहावं. इतरांना आपल्याबद्दल काय वाटतं हा विचार करण्यात ऊर्जा  वाया घालवण्यापेक्षा आपण जे काम करणार आहोत ते कसं करणार यात आपली ऊर्जा खर्च करावी. 

काहीही करताना आपल्याला जर लोक काय म्हणतील याचीच चिंता वाटत असेल , लोकांच्या आपल्या प्रतीच्या मतांची भीती वाटत असेल (social fear syndrome)  तर नुकसान लोकांचं नाही तर आपलंच होतं. स्वत:ची प्रगती, विकास यात लोकांना काय वाटतं याचा विचार करत राहाणं हा मोठा अडथळा आहे.  खरंतर हे एक जाळं असून यात जर आपण फसलो तर यातून बाहेर पडून स्वत:च्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं केवळ अशक्य होतं. आपलं काम करताना, आपल्या विचारांनुसार वागताना इतरांची मतं विचारात घेणं, लोकं काय म्हणता हे समजावून घेणं ही आवश्यक बाब आहे पण लोकं काय म्हणतील याची भीती बाळगून आपल्या कामावर परिणाम करुन घेणं ही एक प्रकारची विकृती आहे. 'लोक काय म्हणतील?' या सिंड्रोममधून बाहेर पडण्याचे उपाय क्लिनिकल सायकोलाॅजिस्ट डाॅ. कामना छिब्बर यांनी सांगितले आहेत.  त्यांच्या मते आपलं जगणं हे जर लोकांच्या मतांचा विचार करुन जगलं तर एका विशिष्ट टप्प्यावर आपण आपल्या मनाचं काहीच करत नसून एक प्रकारे आपण आपली फसवंणूक करत आहोत याची जाणीव होते. अशी विफलता आपल्या वाट्याला येवू नये यासाठी 'लोक काय म्हणतील?' या सिंड्रोममधून ( how to overcome on social fear syndrome)  बाहेर पडणं आवश्यक आहे. त्यासाठीचे उपाय अवघड नाही. स्वत:कडे, स्वत:च्या विचारांकडे बघण्यची सवय लावली तर लोकं काय म्हणतील याचीच अजिबात भीती वाटणार नाही. 

Image: Google

1. आपलं काम करताना ते काम आपल्यासाठी किती महत्वाचं आहे, आपण त्याचा कसा विचार करतो याकडे लक्ष द्यावं. एखाद्याच्या दृष्टीनं आपण जे काम करतो ते अजिबात महत्वाचं नसेल. कारण त्या लोकांच्या प्राथमिकता, त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे असतात.  आपण काम करताना आपली प्राथमिकता, आपले प्राधान्यक्रम यांचा विचार करायला हवा, त्यांना महत्व द्यायला हवं. 

2. आपण आपलं काम, आपली कामाची पध्दत याकडे पूर्ण लक्ष केंद्रित केलं तर लोकं काय म्हणताय याकडे लक्ष द्यायला, त्याबाबत विचार करत बसायला वेळच मिळणार नाही. 

3. आपल्याला काय आवडतं याचा विचार करुन काम करायल हवं. आपली आवड इतरांच्या दृष्टीकोनातून ठरवू नये. आपल्या आवडी निवडीला प्राधान्य देवून काम करायला सुरुवात केली की इतरांना काय वाटतं याची भीती वाटत नाही. 

Image: Google

4.  आपले विचार काय आहे, आपला दृष्टिकोन काय आहे हे आपल्याशिवाय इतर कोणालाच चांगलं समजणार नाही. त्यामुळे आपल्यासाठी काय चांगलं काय वाईट हे इतरांनी ठरवून चालणार नाही. आपल्याला जे वाटतं ते करण्याचा प्रयत्न केल्यास लोकांना काय वाटतं, लोकं याचा काय विचार करतील हा मुद्दा दुय्यम ठरेल. 

5. आपण आपल्या बाबतीत जास्त सजग असायला हवं. आपल्याला काय वाटतंय, आपल्याला काय होतंय याला महत्व द्यावं. आपण एखादी गोष्ट का करतोय, ती आपण कशी करणार याबाबतीत आपण सजग असायला हवं. आपण जे करतोय त्याबाबत स्वत:ला जबाबदार धरलं तर लोकांना काय वाटतंय याचा विचारही येणार नाही. 

6. कोणतंही काम करताना ते परफेक्टच होईल याचा अट्टाहास धरु नये. असा अट्टाहस आपल्या कामाकडे लोकांच्या दृष्टिकोनातून बघितल्याने तयार होतो. त्यापेक्षा जे करायचे आहे ते करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावेत. आपलं सर्व लक्ष परिणामांकडे केंद्रित न करता प्रयत्नांवर केंद्रित केल्यास काम अपूर्ण राहिलं, अयश्वी झालं तरी आपल्याला काम आणि त्यासाठीचे प्रयत्न मनापासून केल्याची जाणीव होईल जी आपल्याला समाधान देईल. 

Image: Google

7. आपण जे केलं आहे, त्यातून आपल्याला जे मिळालं आहे ते मनापासून स्वीकारा. आपल्या कामाकडे, प्रयत्नांकडे आणि परिणामांकडे सकारात्मकतेनं बघा. जे केलं आहे, त्यातून जे मिळालं आहे त्यासाठी स्वत:च स्व:ला शाबासकी द्या. आपण आपला स्वीकार केला की इतरांचा विचार येतच नाही. 

8. इतरांना आपल्याबद्द्ल काय वाटतंय यात ऊर्जा घालवणं व्यर्थ आहे. कारण लोकांना आपल्याबद्दल जे वाटतं ते शंभर टक्के बरोबर असूच शकत नाही. त्यामुळे लोकं काय म्हणत याकडे लक्ष देण्यात खर्च होणारी ऊर्जा आपण काय करतोय, कसं करतोय यात खर्च करावी. 
 

Web Title: How to overcome on social fear syndrome? 8 tips for overcome social fear syndrome.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.