Join us  

मनात विचारांचं काहूर-चित्त थाऱ्यावर नाही? जया किशोरी सांगतात आनंदी राहण्याचा मंत्र; बदलेल आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 12:12 PM

How To Stop Overthinking By Jaya Kishori : कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार केल्यास निगेटिव्ह थिंकींग होऊ शकते म्हणून नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न करा.

मोटिव्हेशल स्पिकर जया किशोरी (Jaya Kishori) तरूणांमध्ये बऱ्याच प्रसिद्ध आहेत. त्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर बरेच ट्रेंड होत असतात. ज्यातून बरंच काही शिकून लोक जीवनात अप्लाय करू शकतात. आयुष्यात काही समस्या असतील आणि त्याचे समाधान तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही काही सोपे उपाय करून ही समस्या टाळू शकता. (How To Stop Overthinking By Jaya Kishori) जया किशोरी एक मोटिव्हेशनल थॉट्सवर काम करतात. आयुष्यातील कठीण स्थितीतून बाहेर येण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला जया किशोरी यांच्या टिप्स फायदेशीर ठरतील. (Solve Any Life Problem By Jaya Kishori Motivational)

बेटरअप.कॉमच्या रिपोर्टनुसार ओव्हरथिंक झाल्यानंतर दीर्घ श्वास घ्या, मोठ्या चित्राकडे पाहा, मनातील भिती काढून टाका, सतत काहीतरी करण्याची तयारी ठेवा, जास्त पुढचा विचार करू नका- आहे तो  मोमेंट जगण्याचा प्रयत्न करा, तुम्ही कधीही स्वत:ला एकटे समजू नका. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार केल्यास निगेटिव्ह थिंकींग होऊ शकते म्हणून नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न करा.

हाडांना पोकळ बनवतो व्हिटामीन बी-12 चा अभाव; रोज ५ शाकाहारी पदार्थ खा; व्हिटामीन भरपूर मिळेल

जेव्हा समोर काहीच दिसत नसेल तेव्हा काय करावे?

जया किशोरी सांगतात की जेव्हा चारही बाजूंनी समस्यांनी घेरले असेल आणि आशेचा कोणताही किरण दिसत नसेल तेव्हा लोक उदास आणि निराश होतात. अशावेळी काय करावे आणि काय करू नये हे लोकांना समजत नाही.  अशावेळी अनेक समस्यांमधून जावे लागते. जया किशोरी सागंतात की, जेव्हा माणसाला दु:ख असते तेव्हा मन भरून रडून घ्यायला हवं जेणेकरून मन हलकं होईल.  जेणेकरून तुम्हाला फार उदास वाटणार नाही. 

कितीही खाल्लं तरी शरीर हाडकुळं दिसतं? १५ दिवसांत वजन वाढेल, हा घ्या साधा-सोपा आहार

पुन्हा कामाला लागा

जेव्हा तुम्हाला कसलं ही टेंशन असेल तेव्हा मन भरून रडून घ्या आणि पुन्हा कामाला लागा. कारण कोणत्याही समस्येवर मेहनत करून उत्तर शोधता येऊ शकते. यासाठी तुम्हाला मन एकाग्र करण्याची आवश्यकता असते.  मेहनत आणि प्रामाणिकपणाने काम करत राहा तुम्हाला प्रत्येक समस्येचं सोल्यूशन मिळेल. 

जया किशोरी का प्रसिद्ध आहेत

मोटेव्हेशल स्पिकर जया किशोरी प्रसिद्ध कथावाचक आहे. त्यांना कृष्णाप्रति अपार प्रेम असल्यामुळे त्यांना किशोऱी अशी पदवी मिळाली आहे.  श्री कृष्णाच्या भगवत गीतेतील वचन त्या भक्तांना सोप्या भाषेत समजावून सांगतात.

टॅग्स :मानसिक आरोग्य