अंथरूणात पडलेली व्यक्ती असो किंवा रस्त्यावर चालणारी प्रत्येकाच्याच मनात विचारांचे चक्र सतत सुरू असते. अनेकांना टेंशन घेण्याची इतकी सवय झालेली असते की सतत विचार करून करून त्यांचे मानसिक आरोग्य बिघडते. (Easy Ways to Stop Overthinking Every Little Thing) ओव्हर थिंकींगची लक्षणं काय, ओव्हर थिंकींग टाळण्यासाठी काय उपाय करता येतील ते पाहूया. ओव्हर थिंकीगची लक्षणं काय यापासून बचाव कसा करायचा ते पाहूया. (How to stop overthinking everything)
ओव्हरथिंकींग काय आहे
एकाच गोष्टीचा प्रमाणापेक्षा जास्त विचार केल्यामुळे मानसिक आजार होऊ शकतात. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ एखाद्या गोष्टीवर बद्दल विचार करते तेव्हा या स्थितीला 'ओव्हरथिंकीग' म्हणतात. असे लोक कोणताही निर्णय घेण्याआधी काय चूक, काय बरोबर याचा विचार जास्तवेळ करतात ज्यामुळे त्यांच्यात पटकन निर्णय घेण्याची क्षमता दिसून येत नाही. हे अत्यंत सामान्य, नैसर्गिक असले तरी तासनतास मेंदूला त्याच विचारात व्यस्त ठेवणं हे ओव्हर थिंकिंगचं कारण ठरतं.
हे कसं टाळायचं?
1) जर तुम्ही सतत कोणत्याही चुकीच्या गोष्टींचा अनावश्यक विचार करत असाल तर आपलं लक्ष इतर गोष्टीत रमवण्याचा प्रयत्न करा. अशा एक्टिव्हीज करा ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. नवीन स्किल्स शिका, रोज व्यायम करा, आवडती गाणी ऐका, डान्स करा. डोकं रिलॅक्स राहिले तर इतर गोष्टींचा विचार तुमच्या मनात येणार नाही.
बारीक होण्यासाठी रोज नाश्त्याला काय खायचं? तज्ज्ञ सांगतात स्लिम-फिट फिगरचं सोपं सिक्रेट
2) ओव्हरथिंकग टाळण्यासाठी नियमित मेडीटेशन करा. यामुळे तुमच्या मनातील भिती कमी होईल आणि तुम्हाला रिलॅक्स वाटेल. एखाद्या शांत जागी बसून मेडिटेशन करा. जर तुमच्याकडून कोणती चूक झाली असेल तर त्याचा सतत विचार करून काहीच होणार नाही. आपल्या चुकीला माफ करायला शिका आणि आयुष्यात पुढे जात राहा. पुन्ही ती चूक होणार नाही याची काळजी घ्या.
3) कधीच एकटं राहू नका. आपल्या कुटुंबाशी आपल्या समस्यांबद्दल चर्चा करा किंवा मित्रमैत्रिणींशी बोला. कुठेतरी फिरायला जा. काऊंसिलरची भेट घ्या.
४) प्रत्येकाचा कोणता ना कोणता ट्रिग प्वाइंट असतो. ट्रिगर पवाईंटमुळे ओव्हर थिंकींगची समस्या उद्भवते. जास्तीत जास्त सकारात्मक वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा.
वजन कमी करायचं तर रोज खा ‘हा’ पदार्थ, सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात...
५) ओव्हरथिंक ही अशी समस्या आहे यात तुम्ही स्वत: तुमची मदत करू शकता. दुसरं कोणीही काही करू शकत नाही.