Lokmat Sakhi >Mental Health > ओव्हरथिंकिंगची सवयच, सतत चिंता करता? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते, निगेटिव्हिटी कमी करण्याचा उपाय

ओव्हरथिंकिंगची सवयच, सतत चिंता करता? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते, निगेटिव्हिटी कमी करण्याचा उपाय

How To Stop Overthinking: एखाद्या गोष्टीचा खूपच विचार करत असाल तर ही सवय मानसिक आरोग्यासाठी अजिबातच चांगली नाही. म्हणूनच त्यावरचा हा उपाय पाहून घ्या... (how to get rid of negative thoughts in mind)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2024 02:45 PM2024-04-25T14:45:33+5:302024-04-25T17:20:26+5:30

How To Stop Overthinking: एखाद्या गोष्टीचा खूपच विचार करत असाल तर ही सवय मानसिक आरोग्यासाठी अजिबातच चांगली नाही. म्हणूनच त्यावरचा हा उपाय पाहून घ्या... (how to get rid of negative thoughts in mind)

how to stop overthinking, how to get rid of negative thoughts in mind, yogasana for mental health and mental peace | ओव्हरथिंकिंगची सवयच, सतत चिंता करता? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते, निगेटिव्हिटी कमी करण्याचा उपाय

ओव्हरथिंकिंगची सवयच, सतत चिंता करता? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते, निगेटिव्हिटी कमी करण्याचा उपाय

Highlights एखाद्या गोष्टीचा एवढा विचार करणे आपल्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी अजिबातच चांगले नाही

अनेक जणांना एखाद्या गोष्टीचा खूप जास्त विचार करण्याची सवय असते. यालाच आपण ओव्हरथिंकिंग असंही म्हणताे. विशेष म्हणजे ही सवय महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. अगदी साध्या- साध्या गोष्टींचाही त्या खूपच विचार करतात. एखादा आपल्याला असं का म्हणाला किंवा अमूक एक व्यक्ती आपल्याशी का नाही बाेलला, अशा साध्या- साध्या गोष्टींपासून ते मुलांचे शिक्षण, आपले करिअर, आपले भविष्य या सगळ्यांचीच चिंता त्यांना एकदम भेडसावते (how to stop overthinking). सगळं छान सुरळीत चालू असतानाही मनात नकारात्मक विचारांचे काहूर उठलेले असते (how to get rid of negative thoughts in mind). एखाद्या गोष्टीचा एवढा विचार करणे आपल्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी अजिबातच चांगले नाही (yogasana for mental health and mental peace). म्हणूनच हा त्रास कमी करण्यासाठी आलिया भट, करिना कपूर यांच्या फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी सांगितलेला हा एक उपाय करून पाहा. 

 

ओव्हरथिंकिंग, मनातली नकारात्मकता कमी करण्यासाठी उपाय

एखाद्या गोष्टीचा खूप विचार करण्याची सवय तसेच नकारात्मकता कमी करण्यासाठी अंशुका यांनी काही योगासनं करण्याचा सल्ला दिला आहे. ही योगासनं केल्यामुळे अतिविचार करण्याची सवय कमी होईल आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल, असं त्या सांगतात. ती योगासनं नेमकी कोणती ते पाहा...

 

१. सेतूबंधासन

हा व्यायाम करण्यासाठी पाठीवर झोपा. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून तळपाय नितंबाजवळ घ्या.

रुपाली गांगुली म्हणते आज मी यशस्वी अभिनेत्री असले तरी 'या' गोष्टीची कायम खंत वाटते.....

यानंतर तळपाय आणि डोके फक्त जमिनीला टेकलेले असू द्या आणि संपूर्ण शरीर उचलून घ्या... सुरुवातीला १ मिनिटे हा व्यायाम करा. त्यानंतर वेळ वाढवत ३ मिनिटांपर्यंत न्या.

 

२. मत्स्यासन

मत्स्यासन करण्यासाठी पाठीवर झोपा. पायाची मांडी घाला. यानंतर मस्तकाचा भाग जमिनीला टेकेल, या पद्धतीने डोके ठेवा. सुरुवातीला कंबरेखाली एक लहानशी उशी घ्या.

नेहमीच ब्लीच करत असाल तर त्वचेवर होतील ५ वाईट परिणाम, म्हणूनच ब्लीच करताना नेहमी.....

यामुळे कंबरेला आधार मिळेल. ही आसनस्थितीही एखादा मिनिटे टिकवून ठेवा.

 

३. भुजंगासन

भुजंगासन करण्यासाठी पोटावर झोपा. दोन्ही तळहात छातीच्या बाजुला ठेवा.

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी ५ खास टिप्स, पोट- कंबरेवर लटकणारी चरबी पटापट उतरेल

यानंतर डोके, मान, छाती व पोटाचा काही भाग उचला. नजर समोरच्या भिंतीवर स्थिर ठेवा. सुरुवातीला १ मिनिटे हा व्यायाम करा. त्यानंतर वेळ वाढवत ३ मिनिटांपर्यंत न्या.

 

Web Title: how to stop overthinking, how to get rid of negative thoughts in mind, yogasana for mental health and mental peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.