Join us  

मन अस्वस्थ, शरीराच्या सतत तक्रारी, जीवाला सुख नाही? ७ साधे सोपे नियम, जगण्यात सुखच सुख...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2023 6:06 PM

Sattvic Diet for Weight Loss : शांत मन, शांत झोप, त्वचेवर चमक, शरीर तंदुरुस्त आणि मायेची माणसं सोबत हे सारं कसं लाभावं? त्यासाठीच हे ७ नियम

आपल्याकडील मोठं - मोठे आध्यात्मिक गुरु, संत, महात्मे इतके शांत, ऊर्जात्मक आणि तणावमुक्त दिसतात. आध्यात्मिक मार्गावर चालत असताना त्यांच्या चेहऱ्यावर उर्जा आणि स्मितहास्य कायम असते. इस्कॉन ग्रुप द्वारकाचे उपाध्यक्ष अमोघ लीला प्रभू यांनी त्यांच्या उत्तम आरोग्याचे गुपित सगळ्यांसोबत शेअर केले आहे. अमोघजी गेल्या १३ वर्षांपासून सद्गुणी जीवन जगत आहेत. त्यांचे वय आता सध्या ४० असले तरीही त्यांच्यात २० वर्षांच्या मुलासारखी चपळता आहे. त्यांची जीवनशैली अत्यंत साधी आहे आणि ते त्यांच्या खाण्यापिण्याची पूर्ण काळजी घेतात. त्यांची चमकणारी त्वचा, शांत मन आणि चपळ शरीर यामागील रहस्य काय आहे ते जाणून घेऊया. 

अमोघ लीला प्रभूजींच्या पालन करून आपणही जीवन आनंदी आणि निरोगी बनवू शकता. वेळेवर झोपण्याची आणि उठण्याची सवय तसेच खाण्यापिण्याचे प्रमाण योग्य असेल तर त्याचा मनावरही चांगला परिणाम होतो. त्यामुळे सध्याच्या या व्यस्त जीवनशैलीतून स्वतःसाठी थोडासा वेळ काढून आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले तर आपण एक निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगू शकतो. त्यांनी सांगितलेले हे ७ नियम आचरणात आणून आपण तंदुरुस्त राहू शकतो(How to Switch to a Sattvic Diet for Decades Younger Skin & a Calm Mind).

१. वयाच्या चाळिशीतही तरुण दिसण्याचे रहस्य...

अमोघ लीला प्रभू हे पूर्णपणे शुद्ध शाकाहारी आहेत, ते लसूण आणि कांदाही खात नाहीत. तसेच, त्यांचा असा विश्वास आहे की आपण आपल्या भुकेपेक्षा ७०% - ८०% कमी खावे , जेणेकरून शरीर सक्रिय राहते. सक्रिय जीवनशैली अंगीकारण्यासाठी ते भरपूर चालण्याचा व्यायाम करतात. 

ग्रीन टी पिताना हमखास ५ चुका करताय? वजन तर कमी होणारच नाही उडेल झोप, बिघडेल तब्येत...

२. नाश्त्यामध्ये खा या गोष्टी... 

अमोघ लीला प्रभू सांगतात की सकाळच्या वेळी आपल्याला अग्नीच्या तत्वाची आवश्यकता असते, हे अग्नी तत्व आपल्याला फळ आणि सूर्यापासून मिळू शकते. त्यामुळे ते सकाळी नाश्त्यात फळे आणि नारळ पाणी घेतात. 

३. दुपारचे जेवण... 

दुपारच्या वेळी आपली पचनशक्ती खूप चांगली आणि सक्रिय असते, आणि अशावेळी जर आपण अन्न खाल्ले तर आपले अन्न चांगले पचते. अमोघ लीला प्रभू यांच्या म्हणण्यानुसार, एकाच वेळी मल्टीग्रेन धान्याची भाकरी किंवा इतर काही पदार्थ खाल्ल्यामुळे आपली पचनसंस्था मंदावते. तसेच आपले शरीर एका वेळी मल्टीग्रेन अन्न पचवू शकत नाही. त्यामुळे ते मल्टीग्रेन अन्न खाण्याचे टाळून एकाच धान्यापासून बनलेली भाकरी किंवा चपाती खातात. तसेच ते रोज वेगवेगळ्या धान्यांपासून बनलेली भाकरी खातात. यासोबतच सॅलडचाही समावेश करतात. सॅलडमध्ये ते मिठाचा वापर अजिबात करत नाहीत. तसेच ते पांढऱ्या मिठाऐवजी रॉक सॉल्ट वापरण्यावर जास्त भर देतात. 

सिधे रस्ते की उलटी चाल! डोकं फारच भंजाळलं, स्ट्रेस वाढला तर १ सोपा उपाय...

४. संध्याकाळचे जेवण... 

अमोघ लीला प्रभू यांना संध्याकाळच्या जेवणात तुलनेने पचायला हलके असलेलं अन्न खायला आवडते. संध्याकाळच्या जेवणात ते पातळ खिचडी, पोहे किंवा सूप पिणे पसंत करतात.

५. साखर आहे विषासमान... 

अमोघ लीला प्रभू हे साखरेला विषासमान मानतात. साखर ही विषासारखी आहे कारण त्यात शरीराला उपयोगी पडतील अशी कोणत्याही प्रकारची खनिजे नसतात. त्यामुळे हे साखरेऐवजी गुळाची पावडर आणि गूळ खाण्यावर जास्त भर देतात. 

६. कोणत्या प्रकारचे दूध प्यावे? 

अमोघ लीला जी म्हणतात की गाईचे दूध शरीरासाठी खूप चांगले मानले जाते. पण जर आपण दिवसभर फक्त बसून काम करत असाल तर गाईचे दूध आरोग्यासाठी चांगले नाही. जर आपल्याला गाईचे दूध प्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तितकाच व्यायामही करावा लागेल. तसेच ते पाण्यात मिसळून प्यावे, जेणेकरून ते लवकर पचते. अमोघजी नारळाचे दूध पिण्याला जास्त प्राधान्य देतात कारण ते खूप पौष्टिक असते. 

७. रात्री १० वाजेपर्यंत झोपा... 

अमोघ लीला प्रभू मानतात की एखाद्या व्यक्तीने रात्री १० पर्यंत झोपले पाहिजे आणि पहाटे ४ वाजता उठले पाहिजे. जे रात्री उशिरा झोपतात त्यांना अनेक आजारांनी घेरले जाते, कारण आपल्या शरीरात विषारी पदार्थ साचत राहतात, जे वेळेवर न झोपल्यामुळे रक्तात विरघळतात आणि बाहेर पडू शकत नाहीत.

टॅग्स :फिटनेस टिप्स