Lokmat Sakhi >Mental Health > आपण आपल्याच धुंदीत धावत सुटतो आणि मधल्यामध्ये लटकतो? कसं कमी होणार हे कन्फ्यूजन?

आपण आपल्याच धुंदीत धावत सुटतो आणि मधल्यामध्ये लटकतो? कसं कमी होणार हे कन्फ्यूजन?

आपल्या मनात हजार विचार, त्यातले कन्फ्यूजन हे लटकणं थांबून कशी शोधायची याेग्य वाट? (What do you do when you feel confused?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2022 04:32 PM2022-09-20T16:32:05+5:302022-09-20T16:35:11+5:30

आपल्या मनात हजार विचार, त्यातले कन्फ्यूजन हे लटकणं थांबून कशी शोधायची याेग्य वाट? (What do you do when you feel confused?)

how to tackle confusion in life? how to decide exact goal and way of life? | आपण आपल्याच धुंदीत धावत सुटतो आणि मधल्यामध्ये लटकतो? कसं कमी होणार हे कन्फ्यूजन?

आपण आपल्याच धुंदीत धावत सुटतो आणि मधल्यामध्ये लटकतो? कसं कमी होणार हे कन्फ्यूजन?

Highlights न उडी मारता येत, ना लटकून राहता येत... आपणही जगताना असेच लटकलेलो असतो का?

अश्विनी बर्वे

आपल्यावर सतत काही न काही आदळतच असतं. कितीही नकार दिला तरी काही गोष्टी नाकारता येत नाही. मग आपण मधल्या मध्ये कुठेतरी लटकत राहतो. लटकणे म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? आपण दोरीला बांधलो गेलो आहोत आणि मधल्यामध्ये लटकत आहोत. आठवून पहा, इश्क सिनेमात अमीर खान कसा त्या पाइपला लटकला होता. अजय देवगण आणि तो आपल्याच धुंदीत चालतात आणि लटकतात पाईपला. न उडी मारता येत, ना लटकून राहता येत... आपणही जगताना असेच लटकलेलो असतो का?

(Image : Google)

मी हे माझ्या एका शहाण्या आणि मॅज्युअर मैत्रिणीला सांगितलं तर तिने माझ्याकडे मुर्खाकडे बघतो तसं बघितलं. मला वाटलं मी सिनेमाचा उल्लेख केला म्हणून ती मला लहान समजली असेल. पण आपण सिनेमाशी किती जोडलेलो असतो हे कोणी कशाला सांगायला पाहिजे? प्रेम,अंगाई गीत,सासू-सुनेची भांडणे, कोर्ट आणि तिथं चालणारे वादविवाद शिवाय रक्तदान हे सगळं आपल्याला सिनेमांमुळे तर कळलं की नाही? कुठे कसं वागायचं हे तर सिनेमानेच शिकवलं. पण माझ्या मैत्रिणीला ते पटत नाही. 
पण तरीही माझ्यावर द्या दाखवत ती म्हणाली, ‘ध्येयावर लक्ष केंद्रित केलं की मन असं बावचळणार नाही!’
अहो हा सुविचार म्हणून ठीक आहे. पण प्रत्यक्ष ध्येय काय आहे हे माहित पाहिजे की नाही. तर बाईसाहेब लगेच म्हणाल्या, “प्रत्येक दिवसाचे एक ध्येय ठरव,मग आठवड्याचे ठरव,मग महिन्याचे आणि वर्षाचे ठरव.”

(Image : Google)

मी डोक्याला हात लावला.मनात म्हटलं हे जे ती सांगते आहे ना तेच माझ्यावर आदळत आहे. मग माझं मीच ठरवलं की जे जे चांगलं आहे ते मी माहित करून घ्यायला हवं. त्यातली प्रत्येक गोष्ट मला जमणार नाही पण जे काही माझ्या आवाक्यात आहे ते मी नक्कीच करू शकेन. हे मी बघायला हवं. कोण काय करतं आहे हे बघण्यापेक्षा मला काय जमतं आणि माझ्यात काय क्षमता आहेत हे बघून मी पुढे जायला हवं. म्हणजे अस्वस्थता येणार नाही आणि दुसऱ्याचं कौतुक करण्याची संधी मी सहज घेईन.
कोणाचं मनापसून कौतुक करता येणं ही सुद्धा एक कला आहे. कारण एरवी आपण अभिनंदन वगैरे म्हणतो पण त्यात जीव असतो का? उगाच तोंड देखलं म्हणतो का? एखादी गोष्ट मनापासून केली की त्याच्यातून आपण अधिक आनंदी होतो हे आत्ता आता मला पटत चाललं आहे. जरा अवघडच जातं सुरुवातीला. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. तुम्हाला माहित असेल की तुम्ही एखाद्या व्यक्तीचं मनापासून कौतुक केलं तर ती देवाची स्तुती होते. मला माहित नाही. पण कोणाच्या चेहऱ्यावर छानसं हसू येणार असेल तर करायला आवडेल. करुन तर पाहू..

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

Web Title: how to tackle confusion in life? how to decide exact goal and way of life?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.