सकाळी उठताना आपल्याला फ्रेश आणि आनंदी वाटत असेल तर आपला दिवस छान आनंदी जातो. आपली दिवसाची सुरूवात कशी होते यावर आपला एकूण दिवस कसा जाणार हे अवलंबून असते. सकाळी उठताना आपल्याला मनाने आणि शरीराने फ्रेश वाटत असेल तरच आपला दिवस आनंदात जातो. नाहीतर काही वेळा काही ना काही कारणाने आपल्याला झोपेतून उठल्यावरच उदास वाटते. तर कधी विनाकारण आपली उठल्यापासून चिडचिड होत असते. मात्र दिवस चांगला जायचा असेलत तर आपला मूड सकाळी उठल्यावर फ्रेश असायला हवा. सकाळी आपण फ्रेश असलो तर दिवसभर आपला मूड चांगला राहण्यास मदत होते. आता दिवसभर वेगवेगळ्या लोकांना भेटत असताना, विविध परिस्थितींचा सामना करत असताना आपण आनंदी राहावं असं वाटत असेल तर नेमकं काय करायला हवं याविषयी समजून घेऊयात (How to Wake up Smiling in Morning Daily Habits to Stay Positive).
१. झोपताना सकारात्मक विचार करा
आपण झोपताना जे विचार करतो ते साधारपणे बराच काळ आपल्या डोक्यात घोळत राहतात. त्यामुळे शक्यतो रात्री झोपताना सकारात्मक विचार केले तर रात्री झोपेत आणि सकाळी झोपेतून उठल्यावर आपल्या डोक्यात सकारात्मक विचार असल्याने आपल्याला झोपेतून उठल्यावर सकारात्मक वाटण्याची शक्यता असते. त्यामुळेच झोपताना कधीही नकारात्मक, ताण देणारे, नैराश्य आणतील असे विचार शक्यतो टाळायला हवेत.
२. पुढच्या दिवसाची वाट पाहावीशी वाटेल असं काहीतरी करा
आपले सगळ्यांचेच रोजचे रुटीन सुरूच असते. या रुटीनमध्ये रोज काहीतरी वेगळे आणि नवीन घडेल असे शक्य नसते. पण आपण घेत असलेले शिक्षण, करत असलेले काम, आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा आनंद, आपल्या स्वत:ची उन्नती यासाठी काही ना काही करत राहायला हवे. त्यामुळे रोज जरी तेच काम, त्याच गोष्टी करायच्या असल्या तरी रोज रात्री झोपताना दुसऱ्या दिवशी लहानातली लहान काहीतरी वेगळी पण छान गोष्ट करायची असे ठरवा.
३. कृतज्ञता यादी तयार करा
आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी चांगल्या आहेत आणि ज्यांच्याबद्दल आपल्याला कृतज्ज्ञता वाटते अशा गोष्टींची एक यादी बनवा. अशाप्रकारे गोष्टींची यादी केल्यास आपल्यालाही आपल्या आयुष्यात कृतज्ज्ञ राहावे अशा गोष्टी समजतात. अशाप्रकारे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी वारंवार आठवत राहा. चांगल्या गोष्टी आठवल्यामुळे आपले विचारही चांगले राहतात. अशाप्रकारची सवय लावली तर नकारात्मक गोष्टी आपल्यापासून नकळत दूर राहतात.
४. दिवस छान जाणार असे स्वत:ला बजवा
सकाळी उठल्यावर कामाचा कितीही ताण असेल, तुमचा कालचा दिवस चांगला गेला नसेल तरी आजचा दिवस चांगला जाईल असे स्वत:ला बजवा. असे केल्याने आपण काही प्रमाणात निराशेत असलो, उदास असलो तरी आपली सकाळ आणि पर्यायाने आपला दिवस चांगला जाण्याची शक्यता असते. काही न करता आपण फक्त सकारात्मक बोललो तरी त्याचा आपल्या मनावर खूप चांगला परिणाम होतो आणि आपली मानसिकता बदलण्यास त्याचा फायदा होतो.