स्पर्धात्मक युगात अनेक जण तणावग्रस्त जीवनशैलीत जगत आहेत (Stress - free). याचा थेट फटका शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. मानसिक तणाव कमी करण्यासाठी वेळीच काही उपाय करणं गरजेचं आहे (Mental health). स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्या माइंडवर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. शिवाय नेगिटिव्ह नसून पॉझिटिव्ह वातावरणात जगायला हवं.
तणावात जगल्याने डिप्रेशन, भीती आणि आत्मविश्वाश कमी होतो. त्यामुळे स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह ठेवा. यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्या पाहा(How Yoga Makes Stress-free Living Possible).
योग निद्रा
योग गुरु आणि अक्षर योग केंद्राचे संस्थापक हिमालयन सिद्ध अक्षर यांच्या मते, 'योग निद्रा हा जागृत झोपेचा योग प्रकार आहे. ज्यामुळे विचलित झालेले मन एकाग्र होते, आणि हळूहळू शांत होते. शिवाय शरीराला खोल विश्रांतीचा अनुभव घेण्यास मदत होते. नियमित योग मुद्रा केल्याने तणावाची पातळी बऱ्याच अंशी कमी होते.
फ्रिजमध्ये ठेवू नका ‘या’ ४ भाज्या, पाहा त्यानं होतं काय, पावसाळ्यात आजारपणाला आमंत्रण
प्राणायाम
तणावमुक्त जगण्यासाठी प्राणायाम करणं गरजेचं आहे. प्राणायाम हे एक श्वास नियमनाचा अभ्यास आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. आपण मानसिकदृष्ट्या निरोगी राहतो. ऑक्सिजनची पातळी वाढते. नियमित प्राणायाम केल्याने मेंदू आणि नसांना पुरेशी उर्जा मिळते. ज्यामुळे तणावाची पातळी कमी होते.
आसन
योग मुद्रा किंवा आसन, शारीरिक लवचिकता आणि मानसिक व भावनिक रूपाने स्थिर राहण्यास मदत करते. शरीराची जेव्हा योग्यरित्या हालचाल होते, तेव्हा मनही तणावमुक्त राहते. तणावमुक्त राहण्यासाठी काही आसने आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यासाठी आपण बालासन, शवासन ही आसने करू शकता.
मेडिटेशन
मेडीटेशन किंवा ध्यान हा एक मानसिक व्यायाम आहे. ज्यामध्ये विश्रांती, एकाग्रता आणि जागरूकता यांचा समावेश आहे. जस की, व्यायाम हा शारीरिक व्यायाम आहे, त्याचप्रमाणे ध्यान हा एक मेंदूचा व्यायाम आहे. यामुळे मानसिकदृष्ट्या शांत आणि भावनिकदृष्ट्या आपण स्थिर राहतो.
पोट साफ - आतडी तंदुरुस्त ठेवायची? करा ४ स्टेप्स, २१ दिवसात वजन घटेल - त्वचाही चमकेल
हिलिंग वॉक
हिलिंग वॉकचे अनेक फायदे आहेत. यामध्ये खांद्याच्या रुंदीवर ठेवून आपले हात वर करा, आणि चालायला सुरुवात करा. सुरुवातील कठीण जाईल, पण हळूहळू सवय होईल. यामुळे मेंदू आणि शारीरिक दोन्हींचा व्यायाम होईल आणि तणावमुक्त राहण्यास मदत होईल.