आनंदी असाल तर निरोगी राहाल असं म्हटलं जातं. आनंदी राहाणं हे सर्व आजारांवरचं उत्तम औषध असतं. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात तणाव, चिंता, उदासी निर्माण करण्यास अनेक घटक कारणीभूत ठरतात. या ताणतणावाचा परिणाम आरोग्यावरही होतो. ताण न घेता आनंदी राहिलात, हसत खेळत राहिलात तर त्याचा परिणाम आरोग्यावर चांगला होतो. म्हणून काही झालं तरी आनंदी राहाण्याचा प्रयत्न करा असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.
Image: Google
विशिष्ट घटना-प्रसंगांनी नाही तर शरीरातील विशिष्ट हार्मोन्समुळे आपण आनंदी किंवा दुखी असतो. शरीरात काॅर्टिसाॅल या हार्मोन्सचं प्रमाण जास्त झालं की आपल्याला ताण तणाव येतो. चिंता वाढते. आनंदी राहाण्यासाठी शरीरात सेरोटोनिन हे हॅपी हार्मोन स्त्रवणं आवश्यक आहे. हार्मोन कोच आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये निरोगी राहाण्यासाठी हॅपी हार्मोनचं महत्व सांगितलं आहे. हे हॅपी हार्मोन शरीरात तयार होण्यासाठी आहार महत्वाचा. आहारातल्या विशिष्ट घटकांमुळे शरीरातील हॅपी हार्मोन वाढतं. त्यासाठी आहारात काय असायला हवं याबाबतचं मार्गदर्शन मनप्रीत यांनी आपल्या पोस्टमधून केलं आहे.
हॅपी हार्मोन्ससाठी..
Image: Google
1. ब जीवनसत्व
ब जीवनसत्वामुळे शरीरात सेरोटोनिन निर्माण होतं. या जीवनसत्वामुळे मूड चांगला होतो. ब जीवनसत्वामुळे शरीरावरील सूज कमी होते. मेंदू उत्तम कार्य करतो. शेंगदाणे, पालक, आंबवलेले पदार्थ यात ब जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे या पदार्थांचा समावेश आहारात असायला हवा.
Image: Google
2. लोह
शरीरात सेरोटोनिन निर्माण करण्यासाठी लोह हे महत्वाचं खनिज आहे. लोहामुळे ट्रिप्टोफॅन या अमीनो ॲसिडचं रुपांतर सेरोटोनिनमध्ये करण्याचं महत्वाचं काम लोह हे खनिज करतं. शरीराला पुरेसं लोह मिळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, डाळी, हरभरे, भोपळ्याच्या बिया, काजू या पदार्थांचा समावेश आहारात करायला हवा.
Image: Google
3. मॅग्नेशियम
अभ्यास आणि संशोधन सांगतं की शरीरात सेरोटोनिनचं प्रमाण वाढवण्यासाठी मॅग्नेशियमची मदत होते. ज्यांच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असते त्यांच्या शरीरात सेरोटोनिनही कमे असल्याचं अभ्यासात आढळून आलं आहे. बदाम, केळी, चिया सीड्स यामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण चांगलं असल्यानं त्याचा समावेश आहारात करायला हवा.
Image: Google
4. झिंक
ताण तणाव, चिंता, उदासी यांच्याशी लढण्यास झिंक या घटकाचा उपयोग होतो. झिंकमुळे शरीर आणि मनावरचा ताणतणाव कमी होवून सेरोटोनिनची निर्मिती होते. शेंगा, भोपळ्याच्या बिया, हिरवे मटार या पदार्थात झिंकचं प्रमाण चांगलं असतं.
Image: Google
5. क जीवनसत्व
प्रथिनांमध्ये असलेल्या ट्रिप्टोफॅन नामक अमिनो ॲसिडचं रुपांतर क जीवनसत्व सेरोटोनिनमध्ये करतं. क जीवनत्वामुळे शरीरात सेरोटोनिनची निर्मिती होण्यास चालना मिळते. लिंबू, संत्री, कीवी, आवळा या फळांचा समावेश रोजच्या आहारात केल्यास शरीराला पुरेसं क जीवनसत्व मिळून त्याचा फायदा सेरोटोनिन हे हॅपी हार्मोन निर्माण होण्यास होईळ.