संयोगिता ढमढेरे
कोरोना महामारीमुळे जीवनात आलेल्या अनिश्चिततेने लोक खूप तणावात जगत आहेत. लसीकरणामुळे सुरक्षा मिळत असली तरी कोरोना मृत्युच्या आकडेवारीमुळे घबराट पसरलेली आहे. बेड, ऑक्सिजन तुटवड्याच्या बातम्यामुळे ही भीती आणखी गडद झाली. बंगळूरूच्या निम्हन्स संस्थेत सामाजिक मनोचिकित्सा विभागाचे प्राध्यापक आणि सायकॉलॉंजिकल सपोर्ट इन डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रमुख डॉ. के सेकर म्हणतात, या आपत्तीमध्ये सामान्य जीवन व्यतीत करणं सगळ्यांनाच खूप अवघड होत आहे. स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाय आहेत ते लोकांनी अमलात आणले तर तणाव कमी करता येईल. याविषयी त्यांच्या बरोबर झालेल्या मुलाखतीतील प्रमुख अंश..
(छायाचित्र : गुगल)
कोरोनाच्या महामारीने लोक खूप धास्तावले आहेत या वातावरणाचा अनेकांच्या मानसिक स्वास्थ्यावर खूप परिणाम होत आहे. अशा कठीण काळात शांत आणि तणावमुक्त राहण्यासाठी तुम्ही लोकांना काय सल्ला द्याल? या तणावयुक्त वातावरणात आपल्या भावना व्यक्त करणं खूप आवश्यक आहे. ही सर्वसाधारण प्रक्रिया आहे. बातम्या देणाऱ्या वेगवेगळ्या माध्यमातून लोक नकारातत्मक बातम्या एकत्र करतात. या नकारात्मक बातम्यांपासून स्वत:चा बचाव कसा करायचा याची निवड तुम्ही स्वत: करू शकता. प्रामाणिकपणे बातमी देणाऱ्या प्रमाणित माध्यमातून दिवसातून एकदाच बातम्या पहा. त्याबरोबर या दिवसात स्वत: कामात व्यग्र रहा. त्यामुळे तुमचं लक्ष दुसरीकडे असेल आणि नकारात्मक बातम्यांकडे ध्यान जाणार नाही. तिसरं म्हणजे हीच वेळ आहे तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर चांगला वेळ घालवू शकता. तुमची कामं करून झाली असतील तर तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवा. आपल्या जुन्या मित्रांच्या दृश्य भेटी घेऊ शकता. त्यांना खुश करणारे संदेश पाठवू शकता. नवीन छंद जोपासू शकता किंवा कुटुंबीय एकत्र मिळून काहीतरी रचनात्मक काम करू शकता. अशा छोट्या छोट्या प्रयत्नाने महामारीच्या या दुसऱ्या लाटेतल्या तणावपूर्ण वातावरणातही तुम्हाला सामन्य आयुष्य जगता येऊ शकतं. तणाव आणि चिंतेच्या या वातावरणात आरोग्यावर काय परिणाम होतो? कोणत्या लक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं? कोणत्या परिस्थितीत मानसोपचारतज्ज्ञांकडे जावं? तणाव, भीती आणि चिंता यांचे परिणाम वेगवेगळे असतात. चिंतेचा परिणाम संक्रमणामुळे मृत्यू, झोप न येणं, उदास राहणं, निराश होणं, आपल्या माणसांपासून दूर जाण्याची भीती, खूप जास्त राग येणं, दारू पिण्याचं प्रमाण वाढणं, तंबाखू किंवा इतर व्यसनांना बळी पडणं तणावाची परिस्थिती गंभीर झाली तर यासारखं वर्तन होऊ शकतं. केवळ कोविडचे रुग्ण नाही तर सर्वसामान्य माणसालही आज या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मानसिक आणि शारीरिक खूप थकवा आल्याने चिंताग्रस्त होणं, चित्त एकाग्र करू न शकणं, लक्षात न राहणं अशा समस्या भेडसावत आहेत. तणावावर नियंत्रण करू शकलो नाही तर शरीरात स्त्रवणारे हार्मोन्स अनियंत्रित होतात त्यामुळे मेंदूची विचार करण्याची क्षमता प्रभावित होते. महामारीचा प्रभाव सगळ्यांवरच झाला आहे हे खरं आहे. सगळ्यांनाच मदतीची गरज आहे आणि सगळेच एकमेकांची मदत करू शकतात. मदत करण्याचा प्रयत्न करा, लोकांना व्हर्च्युअली मदत करावी. असं केल्याने तुमचा तणाव खूप कमी होऊ शकतो. उपचारांची गरज आहे असे खूप लोक आहे. तुम्ही तुमची दिनचर्या नीट पार पाडू शकत नसाल, तुम्हाला नीट झोप येत नसेल, दारू जास्त पीत असाल किंवा तणाव कमी करण्यासाठी औषध घेत आहात इतका तुम्हाला तणाव असेल तर तुम्ही टोल फ्री हेल्पलाइन नंबर 0804611007 वर फोन करून मदत घेऊ शकता. कोविड १९ च्या रुग्णांना तणावमुक्त होण्यास मदत करेल असे काही व्यायाम आहेत का?
हे रुग्णाला झालेल्या संसर्गाची स्थिती, वय, अगोदरची आजारपण, आणि त्यांच्या एकंदर आरोग्याची स्थिती काय आहे यावर अवलंबून आहे. जे रुग्ण आजारानंतर पुन्हा नियमित दिनक्रम सुरु करण्यास सक्षम होतात त्यांचा तणाव लवकर दूर होण्यास मदत होते आणि आजार लवकर बरा होतो. आजवर उपलब्ध असलेल्या संशोधनावरून असं दिसून आलं आहे की नियमित शारीरिक कामं, चौरस आहार, योग, ध्यान आणि प्राणायाम आदींमुळे शरीर आणि मेंदू बरे होण्याची क्षमता निर्माण होते. कोविड -१९ च्या रुग्णांना आम्ही जास्त ताकदीचे व्यायाम करण्याचा सल्ला देत नाही. स्नायु लवचिक करणे आणि श्वसनाशी संबंधित व्यायामहे रुग्ण करु शकतात.
(‘कोविड सुसंगत वर्तन उत्तेजन आणि लस संकोच निर्मुलन’ डीएलए फाउंडेशन आणि युनिसेफचा संयुक्त उपक्रम)