Lokmat Sakhi >Mental Health > Inspirational story : इच्छाशक्तीला मानलं! अपघातात डोक्याला गंभीर जखम, ११ वेळा सर्जरी; अखेर २४ वर्षीय तरूणीनं संकटाला हरवलं

Inspirational story : इच्छाशक्तीला मानलं! अपघातात डोक्याला गंभीर जखम, ११ वेळा सर्जरी; अखेर २४ वर्षीय तरूणीनं संकटाला हरवलं

Inspirational story : एकदा गंभीर जखमी झालेले रूग्ण बरे झाल्यानंतरही सामान्य जीवन जगू शकत नाहीत हा एक गैरसमज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 03:07 PM2021-05-31T15:07:32+5:302021-05-31T15:12:31+5:30

Inspirational story : एकदा गंभीर जखमी झालेले रूग्ण बरे झाल्यानंतरही सामान्य जीवन जगू शकत नाहीत हा एक गैरसमज आहे.

Inspirational story : After 11 head surgeries dancer get her regular life back | Inspirational story : इच्छाशक्तीला मानलं! अपघातात डोक्याला गंभीर जखम, ११ वेळा सर्जरी; अखेर २४ वर्षीय तरूणीनं संकटाला हरवलं

Inspirational story : इच्छाशक्तीला मानलं! अपघातात डोक्याला गंभीर जखम, ११ वेळा सर्जरी; अखेर २४ वर्षीय तरूणीनं संकटाला हरवलं

Highlightsआम्हाला आनंद आहे की आमच्या मुलीला पाच वर्षांपासून योग्य उपचार मिळाले, यामुळे ती पूर्णपणे बरे होऊ शकली.

आयुष्य कधी कसं बदलेल हे कोणालाच माहित नसतं. कोरोना काळात या वाक्याचा अनुभव अनेकांना आला असेल. आजारपणामुळे कधीही न ओढावलेल्या भयंकर स्थितीचा सामना लोकांना करावा लागत आहे. अशीच एका तरूणीची संघर्षमय कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईतील रहिवासी असलेली २४ वर्षीय निर्मोही अनिल ही तरूणी महाविद्यालयीन विद्यार्थीनी आणि भरतनाट्यम डांसर आहे.  मार्च 2015 मध्ये तिचा अपघात झाला आणि  त्यानंतर सगळचं बदललं.

जेव्हा निर्मोहीचा अपघात झाला त्या क्षणी ती घराजवळील कलिना येथील हॉटेलमध्ये जात होती. अपघातानंतर लगेचच त्याला प्राथमिक तपासणी व उपचारांसाठी जवळच्या स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. नंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोहिनूर रूग्णालयात हलवण्यात आलं.

निर्मोहीच्या आई स्वामी अनिल सांगतात, "निर्मोहीच्या अपघाताच्या बातमीनंतरही आम्ही खूप घाबरलो आणि खचून गेलो नाही. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला तिचा जीव वाचवायचा होता. त्या दिशेनं आम्ही प्रयत्न करायला सुरूवात केली.'' कोहिनूर रूग्णालयाचे न्यूरो सर्जन डॉ. विश्वनाथन अय्यर यांच्या नेतृत्वात टीमने निर्मोहीला तिच्यावर झालेल्या नकारात्मक परिणामापासून वाचवण्यासाठी क्रेनोटॉमी शस्त्रक्रिया केली. पण डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ती कोमामध्ये गेली आणि 45 दिवस व्हेंटिलेटरवरही होती.

डॉ. विश्वनाथन म्हणतात की, "जेव्हा तिला येथे आणले गेले तेव्हा ती बेशुद्ध  होती आणि मग कोमामध्ये गेली. तिच्या कुटुंबियांना  झालेल्या दुखापतीविषयी सांगितले तेव्हा त्यांना धक्का बसला.  धोका कमी करण्यासाठी तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्यामध्ये त्याच्या कवटीच्या दोन्ही बाजूंनी रक्ताच्या गुठळ्या आणि हाडं काढून टाकण्यात आली.''

अपघातानंतर मेंदूतून बोन फ्लिप काढण्यासााठी व वॉटर एक्यूमलेशन दुरुस्त करण्यासाठी स्वतंत्रपणे 11 शस्त्रक्रिया केल्या गेल्या. यानंतर त्यांना स्पीच थेरपी आणि फिजिओथेरपी घेण्याचा सल्ला देण्यात आला. आता तिची तब्येत ठीक आहे आणि तिने तिचा रोजचा नित्यक्रम सुरू केला आहे.  निर्मोही आता संपूर्ण उत्साहानं भरतनाट्यमचा सराव करते. 

डॉक्टर विश्वनाथन यांचा असा विश्वास आहे की, एकदा गंभीर जखमी झालेले रूग्ण बरे झाल्यानंतरही सामान्य जीवन जगू शकत नाहीत हा एक गैरसमज आहे. जर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला असेल तर पहिल्या दोन तासात त्याला प्रथमोपचार देणे फार महत्वाचे आहे. डोक्याची दुखापत बरी होण्यासाठी वेळ आणि धैर्य दोन्ही आवश्यक आहेत.

निर्मोहीची आई स्वाती म्हणाल्या की, ''आम्हाला आनंद आहे की आमच्या मुलीला पाच वर्षांपासून योग्य उपचार मिळाले, यामुळे ती पूर्णपणे बरे होऊ शकली. आता ती आपल्या सामान्य आयुष्यात परत येऊ शकेल. ती खूप शूर आहे, कधीही हार मानत नाही. केवळ तिच्या इच्छेच्या शक्तीमुळेच ती अशा गंभीर दुखापतीतून सावरण्यास सक्षम ठरली. ती घरी परतली आहे आणि आधीप्रमाणे भरतनाट्यम करायला सुरूवात केली आहे. आम्ही त्याच्या डॉक्टरांचे आभार मानतो ज्याने त्यांना नवीन जीवन दिले. " 

Web Title: Inspirational story : After 11 head surgeries dancer get her regular life back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.