Lokmat Sakhi >Mental Health > आवाज न वाढवता, भांडण न करताही आपला मुद्दा कसा मांडायचा? भांडकुदळ लेबल टाळूनही, बोलता येतंच..

आवाज न वाढवता, भांडण न करताही आपला मुद्दा कसा मांडायचा? भांडकुदळ लेबल टाळूनही, बोलता येतंच..

एखाद्या प्रश्नावर. समस्येवर एकत्र येऊन तोडगा काढायचा असेल तर आधी वाद विवाद होतातच. पण जर यात नुसतेच वाद झालेत आणि समस्येवर तोडगा न निघता एक वेगळाच प्रश्न उभा राहिला तर.... हे सर्व टाळायचं असेल तर आपली भांडण्याची, वाद विवाद घालण्याची पध्दत जरा तपासून पाहायला हवी. तज्ज्ञ म्हणतात की भांडावं. पण भांडण हे सुदृढ असावं! त्यात कोणीही दुखावता कामा नये. नाती बिघडता कामा नये आणि ज्या गोष्टींसाठी भांडतो आहोत त्यावर तोडगा निघणं म्हणजे सुदृढ अर्थात हेल्दी भांडण होय. हे असं हेल्दी भांडण कसं करावं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 10:10 AM2021-05-30T10:10:02+5:302021-05-31T15:41:42+5:30

एखाद्या प्रश्नावर. समस्येवर एकत्र येऊन तोडगा काढायचा असेल तर आधी वाद विवाद होतातच. पण जर यात नुसतेच वाद झालेत आणि समस्येवर तोडगा न निघता एक वेगळाच प्रश्न उभा राहिला तर.... हे सर्व टाळायचं असेल तर आपली भांडण्याची, वाद विवाद घालण्याची पध्दत जरा तपासून पाहायला हवी. तज्ज्ञ म्हणतात की भांडावं. पण भांडण हे सुदृढ असावं! त्यात कोणीही दुखावता कामा नये. नाती बिघडता कामा नये आणि ज्या गोष्टींसाठी भांडतो आहोत त्यावर तोडगा निघणं म्हणजे सुदृढ अर्थात हेल्दी भांडण होय. हे असं हेल्दी भांडण कसं करावं?

It's a quarrel ... but is our quarrel healthy? | आवाज न वाढवता, भांडण न करताही आपला मुद्दा कसा मांडायचा? भांडकुदळ लेबल टाळूनही, बोलता येतंच..

आवाज न वाढवता, भांडण न करताही आपला मुद्दा कसा मांडायचा? भांडकुदळ लेबल टाळूनही, बोलता येतंच..

Highlightsटिपेला पोहोचलेलं भांडण खाली आणण्यासाठी एक पाऊल आपण मागे जावं .वाद विवाद करताना डाएटिंगची भूमिका घ्यावी. वाद विवाद करताना कशावर करतोय हे निश्चित माहित असायला हवं, निश्चित करायला हवं आणि तेवढ्याच मुद्यांवर ठाम राहायला हवं.  वाद विकोपाला जातात कारण वादात/ भांडणात भावना धुसडल्या जातात. भावना बाजूला ठेवून तर्कसुसंगत बोलायला हवं.


आपण एकटे राहात नाही. आपण एकमेकांसोबत राहातो. साहजिकच आहे आपण एकमेकांसोबत वागताना आपल्या सर्व भावना व्यक्त करतो. एकमेकांमधे संवाद जसा होतो तसेच वाद -विवादही होतात. असं म्हणतात की वाद-विवादातून संवाद हा दृढ होत असतो. संवादात वादाला जागा असतेच. त्यामुळे एकमेकात भांडण होणं, एकमेकांशी टोकाचं भांडणं यात वावगं काहीच नाही. पण या भांडणातून काही घडतं की सगळंच बिघडतं हे बघणं महत्त्वाचं. भांडण हे एकमेकांचं काही पटलं नाही की होतं. एखाद्या प्रश्नावर. समस्येवर एकत्र येऊन तोडगा काढायचा असेल तर आधी वाद विवाद होतातच. पण जर यात नुसतेच वाद झालेत आणि समस्येवर तोडगा न निघता एक वेगळाच प्रश्न उभा राहिला तर.... हे सर्व टाळायचं असेल तर आपली भांडण्याची, वाद विवाद घालण्याची पध्दत जरा तपासून पाहायला हवी. तज्ज्ञ म्हणतात की भांडावं. पण भांडण हे सूदृढ असावं! त्यात कोणीही दुखावता कामा नये. नाती बिघडता कामा नये आणि ज्या गोष्टींसाठी भांडतो आहोत त्यावर तोडगा निघणं म्हणजे सुदृढ अर्थात हेल्दी भांडण होय.

हेल्दी भांडण कसं असावं?

भांडण हे विकोपाला जाऊन सगळंच विस्कटू नये, एकमेकांची मनं दुखावली जाऊ नये यासाठी तज्ज्ञांनी हेल्दी भांडण कसं असावं याबाबत मार्गदर्शनही केलं आहे.

  • एखाद्या भांडणातून काहीच निष्पन्न होणार नसेल आणि जर खूपच ताणून धरलं तर भांडणाची गाडी रुळावरुन घसरण्याची शक्यता असेल तर आधी ते भांडण थांबवलं पाहिजे. त्यासाठी आपल्याशी जो वाद घालतोय तो आपल्यासारखाच आहे हे पहिले मान्य करावं. टिपेला पोहोचलेलं भांडण खाली आणण्यासाठी  एक पाऊल आपण मागे जावं . जरी आपल्याला समोरच्याची भूमिका पटत नसली तरी या भांडणातून काहीच निष्पन्न होणार नसेल तर 'तुझं म्हणणं खरं !' असं म्हणून विषय थांबवावा. पण तुझं म्हणणं पटतं नाही म्हणून आपण एकीकडे जोर लावत राहिलो तर ऊर्जा खर्च होते, मनस्ताप होतो. निष्फळ भांडणं स्वत: पुढाकार घेऊन थांबवणं योग्य

 

  • भांडणामधे मी बरोबर आणि तू चूक असंच चित्र असतं. हे खोडून काढण्यासाठी कोणाकडून काहीतरी आक्षेपार्ह बोललं जातं, तर दुसरा अतिशय बचावात्म्क भूमिका घेतो. तज्ज्ञ म्हणतात की या दोन्ही गोष्टी चुकीच्या . भांडणात आक्रमक आणि बचावात्मक असा पवित्रा न घेता खंबीरपणे आपली भूमिका मांडणं हेच योग्य. कोणाचंही मत चुकीचं न ठरवता आपलं मत आपण ठामपणे मांडलं तर या भांडणातून शेवटी काहीतरी निष्पन्न होतं.

 

  • वाद विवाद करताना डाएटिंगची भूमिका घ्यावी. जसं डाएटिंग करताना आपण काय खाणार हे आपल्याला माहित असतं. ठरवून ठेवलेलं असतं. त्यामुळे ऐनवेळी मोहात पाडणारा पदार्थ असला तरी आपण डाएट करत असल्यामुळे जसा त्याला हात लावत नाही तसंच वाद विवाद करताना कशावर करतोय हे निश्चित माहित असायला हवं, निश्चित करायला हवं आणि तेवढ्याच मुद्यांवर ठाम राहायला हवं. म्हणजे भांडण भरकटत नाही.  

 

  • तज्ज्ञ म्हणतात की माणसाच्या कोणत्याही कृतीला ध्येय असतं. तसंच वाद विवादाचंही असावं. आपण कशासाठी भांडतोय, वाद घालतोय हे माहित असायला हवं. त्यासाठी स्वत:ला दोन प्रश्न विचारावेत. आपण कशावर बोलत आहोत? आपण त्यातून नेमकं काय साधणार आहोत? आणि मग सरळ कागदावर तीन प्राधान्याचे विषय लिहून काढावेत आणि समोरच्यालाही त्याची कल्पना द्यावी. आणि त्यावरच बोलावं. आणि समोरच्यानं जर वेगळा विषय काढला तर आपण हा दुद्दा संपू दे याविषयावर नंतर बोलू असं शांतपणे आणि ठामपणे सांगावं.

 

  • डाएट करताना आपण जशा स्वत:साठी मर्यादा आखून घेतो तसंच वाद विवादाच्या प्रसंगीही या मर्यादा घालून घ्याव्यात. म्हणजे मी अमूक विषयावरच बोलेन. बोलताना आवाज चढणार नाही हे स्वत:ला आणि समोरच्यालाही सांगावं.

 

  • भांडतांना, वाद विवाद घालताना आपला मुद्दा मांडतांना समोराच्याचा खोडून काढणं, समोरच्याला कमी लेखणं असं होतं. त्यामुळे व्यक्तीचा अपमान होऊन भांडण आणखी विकोपाला जातं. म्हणून इतरांचा मुद्दा खोडून न काढता, त्यांच्या मताचा आदर ठेवत आपण आपला मुद्दा शांतपणे अन ठामपणे मांडावा. यामुळे समोरच्याला आपल्या मताची स्पष्ट जाणीव होते. आणि वाद असला तरी मतभिन्नतेच्या स्वातंत्र्याची जाणीव होते.

 

  •  एखादा मुद्दा भांडण न होता समोरच्याला पटवून देता यायला हवा. समोरच्याच्या कृतीमधे सुधारणा होणं अपेक्षित असतं. पण थेट टीका करायला गेलं तर भांडण होतं. म्हणून समोरच्या व्यक्तीची ताकद, वैशिष्ट काय आहे त्यावर बोलून जे घडत नाही आहे किंवा जी कमतरता आहे त्यावर बोलावं. म्हणजे आपण ज्याच्याशी वाद घालतोय त्याच्या गुणांकडेही आपलं लक्ष जातं, त्याचा आदर राखला जातो. आणि समोरच्यालाही हा आपल्यावर टीका करत नसून आपल्याला महत्त्वाचं काहीतरी सांगतोय याची जाणीव होते.

 

  • अनेकदा काहीतरी चांगलं व्हावं म्हणून समोरच्याला सांगायला जातो आणि भांडण होतं असं अनेकदा होतं. त्यामुळे थेट उपदेश न करता संवाद साधला , त्या गोष्टीचं महत्त्व पटवून सांगितलं तर समोरचा आपलं म्हणण ते न नाकरता शांतपणे ऐकतो आणि वाद टळतो. जंक फूडवरुन आया आणि मुलांचं नेहेमीच भांडण होतं. आई मुलांना जंक फूड खायचं नाही असा थेट आदेश देते आणि मुलं तो धूडकावून लावतात आणि वाद होतो. तो टाळण्यासाठी जंक फूड या विषयावर मुलांसोबत शांतपणे बोललं तर ते का चांगलं नाही हे त्यांना समजायलाही मदत होते.

 

  •   वाद विकोपाला जातात कारण वादात/ भांडणात भावना धुसडल्या जातात. ओरडून, रडून-भेकून काही सांगण्यापेक्षा तर्कसुसंगत बाबींवर बोलायला हवं. भावना बाजूला ठेवून तर्कसुसंगत गोष्टींवर चर्चा व्हायला हवी. तज्ज्ञ म्हणतात की भावनामधे आणून समोरच्याचं मन वळवण्यापेक्षा त्याच्या बुध्दीला तो पटला तर वाद विवाद आणि त्यातून संवाद घडतो. 

 

  • अनेकदा भांडण समोरची व्यक्ती चुकीची वागली म्हणून होतं. पण ते वाढतं कारण त्याच्या कृतीवर न बोलता त्या व्यक्तीवर बोललं जातं. तुझं वागणं चुकलं जे सांगण्या ऐवजी तूच कसा चुकीचा हे सांगितलं जातं आणि तिथून भांडण वाढतं.

 

  •   वाद विवादात तू असा म्हणालास, तू अशी वागलीस अशीच विधानं केली जातात. बोट सतत समोरच्यावर ताणल्यानं भांडण वाढतं. त्यापेक्षा मी काय म्हणाले, मला काय वाटलं हे आधी सांगावं, म्हणजे समोरचा त्याचा दृष्टिकोन सांगेल. यामुळे मुद्दा विवादाचा असला तरी एकमेकांना समजून घेण्यास मदत होते.

 

  • भांडतांना समोरच्याचं ऐकण्यापेक्षा तो / ती जे बोलेल ते खोडून काढण्यावरच भर असतो. ही कृती भांडणं मोठं करायला प्रोत्साहन देते. त्याऐवजी समोरचा जे बोलत आहे त्यावर हे कसं?  हे त्यालाच स्पष्ट करायला सांगावं. यामुळे समोरच्यालाही स्पष्टीकरणाची संधी मिळते. या प्रक्रियेतून एकतर समोरच्याला त्याच्या म्हणण्यातील, भूमिकेतील चूक उमगते किंवा आपल्याला तरी नवीन काहीतरी शिकायला मिळतं.

 

  • बऱ्याचदा भांडण टोकाला गेलं तरी उत्तर मिळत नाही. तेव्हा अनेकदा मला बोलायचंच नाही, मी जातेच कशी असं म्हणून तिथून काढता पाय घेतला जातो किंवा समोरच्याच्या तोंडावर दार लोटलं जातं किंवा फोनवर बोलत असल्यास फोन कट केला जातो. पण यामुळे भांडण सुटत नाही अन् थांबतही नाही. उलट नात्यात कडवटपणा येतो. म्हणूनच तज्ज्ञ म्हणतात की, भांडतांना, वाद घालताना आपलं म्हणणं शांतपणे, प्रभावीपणे मांडलं, समोरच्यालाही ते मांडू दिल तर मूद्दे पटले नाही , एकमत झालं नाही तरी नात्यात कडवटपणा येत नाही. उलट त्या प्रश्नाकडे बघण़्याची नवीन दृष्टी मिळते. म्हणूनच तज्ञ्ज्ञ म्हणतात की भांडावं, पण भांडण हेल्दी असावं!

      

Web Title: It's a quarrel ... but is our quarrel healthy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.