Lokmat Sakhi >Mental Health > ज्युलिया रॉबर्टस सांगतेय नेचर पॉवरची गोष्ट, पृथ्वीवर जगायचं तर करा म्हणतेय ही एक गोष्ट!

ज्युलिया रॉबर्टस सांगतेय नेचर पॉवरची गोष्ट, पृथ्वीवर जगायचं तर करा म्हणतेय ही एक गोष्ट!

सध्या सोशल मीडियात हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्टस हिचा ‘मदर नेचर’ हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. निसर्गाच्या रौद्र रुपाचे वेगवेगळे चेहेरे जग अनुभवत असताना ज्युलिया रॉबर्टस हिचा व्हायरल होणारा व्हिडीओ खाडकन आपले डोळे उघडतो. असं काय आहे या व्हिडीओत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 02:16 PM2021-07-26T14:16:59+5:302021-07-26T14:38:03+5:30

सध्या सोशल मीडियात हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्टस हिचा ‘मदर नेचर’ हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. निसर्गाच्या रौद्र रुपाचे वेगवेगळे चेहेरे जग अनुभवत असताना ज्युलिया रॉबर्टस हिचा व्हायरल होणारा व्हिडीओ खाडकन आपले डोळे उघडतो. असं काय आहे या व्हिडीओत?

Julia Roberts tells the story of Nature Power, if you want to live on earth, do it! what Julia Roberts told. | ज्युलिया रॉबर्टस सांगतेय नेचर पॉवरची गोष्ट, पृथ्वीवर जगायचं तर करा म्हणतेय ही एक गोष्ट!

ज्युलिया रॉबर्टस सांगतेय नेचर पॉवरची गोष्ट, पृथ्वीवर जगायचं तर करा म्हणतेय ही एक गोष्ट!

Highlightsमदर नेचर हा व्हिडीओ ‘कॉन्झर्व्हेशन इंटरनॅशनल’ या पर्यावरण संस्थेच्या युट्यूबपेजवर रीलिज केलेली एक शॉर्ट फिल्म आहे.एक मिनिट 58 सेकंदाची ही फिल्म म्हणजे पर्यावरणावरील लघुपट मालिकेतली एक फिल्म आहे.निसर्गाच्या रौद्र रुपाचे वेगवेगळे चेहेरे जग अनुभवत असताना ज्युलिया रॉबर्टस हिचा व्हायरल होणारा व्हिडीओ जे सांगतोय ते पाहाणार्‍यास अंतर्मुख करतो. छायाचित्रं : गुगल

निसर्गानं रौद्ररुप धारण केल्यावर काय घडतं हे सध्या आपण पाहतो आहे आणि अनुभवतोही आहे. निसर्गाच्या रौद्र रुपानं उध्वस्त झालेली माणसं आज आपल्या या स्थितीसाठी निसर्गास बोट लावत आहे. पण नैसर्गिक आघातानं बसलेला धक्का, उध्वस्तपणाची वेदना थोडी बाजूला ठेवून बघितल्यावर लक्षात येतं की निसर्गाच्या या रौद्र रुपाला आपण माणूसच तर कारणीभूत आहोत. निसर्गानं आज आपल्याकडून हिरावून घेतलं आहे असं वाटणं स्वाभाविक आहे पण यापुढच्या काळात हा निसर्गच आपल्याला पुन्हा देत राहाणार आहे. हा निसर्गच आहे ज्याच्यामुळे आज आपण अस्तित्त्वात आहोत. पण सर्व काही व्यवस्थित सुरु असतं तेव्हा माणूस बहुतांशपणे ओरबाडण्याच्या, उपभोगण्याच्या भूमिकेत असतो. संवर्धन, जपणूक, काळजी हे शब्द निसर्गासाठी माणसाच्या लेखी नसतात. जो देतो त्याला जपणं, जोपासणं, त्याचं संवर्धन करणं हे झालं तरच देण्या घेण्याचं चक्र खर्‍या अर्थानं पूर्ण होतं. पण केवळ ओरबाडणं चालू ठेवलं तर अनर्थ अटळ आहे. जो सध्या जगात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींद्वारे सतत अनुभवायला येतो आहे.

पण जगात , समाजात अशी काही माणसं आहेत जी जीव तोडून निसर्गाला जपण्याचं काम करत आहेत, अशी काही माणसं आहेत जे कळकळून निसर्गाकडे संवेदनशीलतेनं बघण्याचं आवाहन करत आहे. सध्या सोशल मीडियावर हॉलिवूडमधील प्रसिध्द अमेरिकन अभिनेत्री ज्युलिया रॉबर्टस हिचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हॉलिवूडमधील प्रतिष्ठेचा गोल्डन ग्लोब हा अवॉर्ड तीनदा तर ऑस्करसाठी चार वेळा नामांकन मिळालेल्या, अभिनयासाठी ऑस्कर मिळवलल्या या अभिनेत्रीच्या ओळखीसाठी तिचं नावच पुरेसं आहे. जगभरात ज्युलिया रॉबर्टसच्या अभिनयाचे चहाते आहेत. पण अभिनेत्री आणि निर्माती असलेली ज्युलिया रॉबर्टस ही पर्यावरणवादी चळवळीचाही भाग आहे. त्यासाठी ती वेळोवेळी आपलं योगदान देत असते. हा व्हिडीओही त्याचाच एक भाग आहे.

छायाचित्र : गुगल 

सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होणारा हा व्हिडीओ आहे 2014 मधला. म्हणजे सात वर्षांपूर्वीचा. हा व्हिडीओ तेव्हाही गाजला होता आणि आजही तो गाजतो आहे. हा व्हिडीओ ‘कॉन्झर्व्हेशन इंटरनॅशनल’ या पर्यावरण संस्थेच्या युट्यूबपेजवर रीलिज केलेली एक शॉर्ट फिल्म आहे. एक मिनिट 58 सेकंदाची ही फिल्म म्हणजे पर्यावरणावरील लघुपट मालिकेतली एक फिल्म आहे. या व्हिडीओमधे दिसतो तो निसर्ग. हा निसर्ग या व्हिडीओतून बोलतो तो ज्युलिया रॉबर्टसच्या आवाजात. आपल्या धीर गंभीर आवाजातून आणि प्रभावशाली शैलीतून ज्युलिया रॉबर्टस ‘मदर नेचर’ बनून संवाद साधते.
जगातल्या प्रत्येकानं निसर्गाचा संवेदनशीलतेनं विचार करण्यासाठी ज्युलिया रॉबर्टस ‘मदर नेचर’ बनून संवाद साधते. निसर्गाच्या रौद्र रुपाचे वेगवेगळे चेहेरे जग अनुभवत असताना ज्युलिया रॉबर्टस हिचा व्हायरल होणारा व्हिडीओ आपल्या निसर्गाप्रती जागरुक आणि संवेदनशील होण्याचा संदेश देतो.
मदर नेचर असलेली ज्युलिया रॉबर्टस म्हणते की , ‘ कुणी मला निसर्ग म्हणतं, तर उरलेले मला निसर्ग माता म्हणतात. मी इथे साडेचार बिलियन वर्षांपासून आहे. तुमच्यापेक्षा 22, 500 पटींपेक्षा जास्त काळ झाला आहे माझ्या या अस्तित्त्वाला. माझ्या अस्तित्त्वासाठी मला माणसांची गरज नाही, पण माणसाला माझी गरज आहे. हो, तुमचं भविष्य माझ्यावरच तर अवलंबून आहे. माझी जेव्हा भरभराट होते, तेव्हा तुम्हीही समृध्द होतात, मी जेव्हा कोसळते तेव्हा तुम्हीदेखील कोसळता , उध्वस्त होतात. पण मी इथे युगानुयुगांपासून हे. मी विविध प्रजातींना तुमच्यापेक्षा उत्तम रितीने पोसू शकते आणि तुमच्याहून जास्त त्यांची उपासमारही करु शकते. माझा समुद्र, माझी माती, खळखळून वाहणारे माझे पाण्याचे प्रवाह, माझे जंगल तुम्हाला जसं भरभरुन देऊ शकतात तसं तुमच्यापासून हिरावूनही घेऊ शकतात!’, असा खाडकन डोळे उघडणारा संदेश नेचर मदर झालेली ज्युलिया रॉबर्टस देते.

छायाचित्र : गुगल 

माणसाला यापुढच्या काळात आनंदानं, सुखानं आणि शांततेनं जगायचं असेल तर त्याला सांभाळणार्‍या निसर्गाला जपायला त्यानं शिकलं पाहिजे हा संदेश देण्यासाठी ज्युलिया रॉबर्टसनं या लघुपटात आपल्या आवाजातून भूमिका केली आहे. ज्युलियाचा आवाज तुमच्या कानातून मनापर्यंत पोहोचला आहे का आणि त्या आवाजानं काय सांगितलंय ते तुमच्या मेंदूला समजलंय का? ही परीक्षा आता आपल्या सगळ्यांची आहे. 

Web Title: Julia Roberts tells the story of Nature Power, if you want to live on earth, do it! what Julia Roberts told.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.