Lokmat Sakhi >Mental Health > दिवसभर राहाल फ्रेश - आळस जवळ फिरकणार नाही! घ्या जपानी लोकांचे ७ स्टेप्स काइझेन टेक्निक

दिवसभर राहाल फ्रेश - आळस जवळ फिरकणार नाही! घ्या जपानी लोकांचे ७ स्टेप्स काइझेन टेक्निक

Kaizen Japanese Technique to Overcome laziness : काईझेन पद्धतीच्या वापराने आपण आळस दूर करुन आपल्यातील उत्पादनक्षमता वाढवू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 01:08 PM2023-06-13T13:08:57+5:302023-06-13T13:10:30+5:30

Kaizen Japanese Technique to Overcome laziness : काईझेन पद्धतीच्या वापराने आपण आळस दूर करुन आपल्यातील उत्पादनक्षमता वाढवू शकतो

Kaizen Japanese Technique to Overcome laziness : Stay fresh all day - laziness won't come around! Take the Japanese 7-Step Kaizen Technique | दिवसभर राहाल फ्रेश - आळस जवळ फिरकणार नाही! घ्या जपानी लोकांचे ७ स्टेप्स काइझेन टेक्निक

दिवसभर राहाल फ्रेश - आळस जवळ फिरकणार नाही! घ्या जपानी लोकांचे ७ स्टेप्स काइझेन टेक्निक

आळस हा आपला सगळ्यात मोठा शत्रू असतो असं आपण अनेकदा ऐकलं असेल. मात्र तरीही तो झटकण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी आपण फार काही विशेष प्रयत्न करत नाही. अगदी नेहमीच्या कामातले काही करायचं असो किंवा नव्याने एखादी गोष्ट करायची असो आपल्यात असलेल्या आळसामुळे हे काम बरेच दिवसांपासून मागे पडलेलं असतं. मग एकदम गळ्याशी आलं की आपण ते काम करण्यासाठी धावपळ करतो. पण आधीच आळस न करता हे काम करुन ठेवलेले असेल तर ऐनवेळी होणारी धावपळ होणार नाही (Kaizen Japanese Technique to Overcome laziness). 

जपानी लोकं त्यांच्या वर्कहोलिक असण्यासाठी आणि कायम फ्रेश असण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ते वापरत असलेली ‘काईझेन’ ही पद्धती. हे एकप्रकारचे तत्वज्ञान असून त्याच्या वापराने तुम्ही स्वत:मध्ये बरेच बदल घडवून आणू शकता. काईझेन पद्धतीच्या वापराने आपण आळस दूर करुन आपल्यातील उत्पादनक्षमता वाढवू शकतो तसेच स्वत:ला एकप्रकारची शिस्त लावण्यासाठीही हा माईंडसेट अतिशय उपयुक्त ठरतो. यासाठी काही महत्त्वाच्या पायऱ्या असून त्या कोणत्या आणि कशा फॉलो करायच्या हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. 

१. आळशीपणाची सवय ओळखा 

आळस दूर करण्याची सर्वात महत्त्वाची आणि पहिली पायरी म्हणजे आपण आळशी आहोत हे ओळखा. हा आळस आपल्या वागण्यात, विचारांत आणि संपूर्ण रुटीनमध्ये असल्याने आपल्याला कोणत्या गोष्टींचा आळस आहे हे ओळखा.

२. लहान लहान ध्येय निश्चित करा 

आळस दूर करायचा म्हणजे एकदम मोठ्या गोष्टींचे ध्येय घेऊन त्यावर काम करायचे असे नाही तर काईझेननुसार लहान लहान ध्येय समोर ठेवून त्याचे महत्त्व समजून घ्या. ध्येय मोठे असेल तरी त्यासाठी कराव्या लागणाऱ्या लहान लहान गोष्टी लक्षात घेऊन त्या साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. 

३. वन मिनीट रुल फॉलो करा 

हे अतिशय शक्तिशाली असे टेक्निक असून तुम्ही जी गोष्ट करणे टाळत होतात ती अगदी १ मिनीटांत करा. आपण आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टीची सुरुवात करत नाही हाच त्यातला अवघड भाग असून शकतो. पण एकदा सुरुवात केली की ते किती सोपे आहे हे समजते आणि मग आपण ती गोष्ट पूर्णही करतो. 

४. रुटीन ठरवा 

कोणत्याही गोष्टी करण्यासाठी एक नेमके रुटीन ठरवा आणि त्यानुसारच कामे करा. त्यामुळे तुमचा आळस दूर होण्यास निश्चितच मदत होईल. दिवसभरातील व्यायाम, खाणे, काम, रिलॅक्सेशन अशा प्रत्येक गोष्टीसाठी रुटीन सेट करा आणि त्यानुसारच कामे करा. 

५. प्रोमोडोरो टेक्निक 

हे टाईम मॅनेजमेंट टेक्निक असून उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी हे अतिशय उपयुक्त टेक्निक आहे. तुम्ही करत असलेले कोणतेही काम २५ मिनीटांनी ब्रेक करा. यामुळे तुमचा फोकस कायम राहण्यास मदत होते आणि तुम्ही खूप थकत नाही. 

(Image : Google)
(Image : Google)

६. दृष्टीस पडतील असे संकेत वापरा

तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी समोर दिसतील अशा संकेतांचा वापर करा. यामध्ये स्टीकी नोटस, बोर्ड यांसारख्या गोष्टींचा समावेश असेल. एखादी गोष्ट सतत समोर असेल तर तुम्ही मोटीव्हेटेड राहता आणि उत्पादनक्षमता वाढते. 

७. स्वयंशिस्त पाळा 

आळशीपणा हा स्वयंशिस्त नसण्याचाच एक भाग आहे. मात्र स्वत:ला थोडी शिस्त लावली तर कामं आणि ध्येय पूर्ण करणे सोपे होते. यासाठी डे़डलाईन्स निश्चित करणे, कामांचे प्राधान्यक्रम ठरवणे, जागरुकता असणे गरजेचे आहे.    

Web Title: Kaizen Japanese Technique to Overcome laziness : Stay fresh all day - laziness won't come around! Take the Japanese 7-Step Kaizen Technique

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.