Lokmat Sakhi >Mental Health > करण जोहरच नाही तर इलियाना डीक्रूजलाही छळणारा 'बॉडी डिसमॉर्फिया' हा आजार नेमका काय? लक्षणं काय सांगतात..

करण जोहरच नाही तर इलियाना डीक्रूजलाही छळणारा 'बॉडी डिसमॉर्फिया' हा आजार नेमका काय? लक्षणं काय सांगतात..

What Is Body Dysmorphia?: बघा करण जोहर, इलियाना डीक्रूज या कलाकारांना छळणारा 'बॉडी डिसमॉर्फिया' हा आजार नेमका असतो कसा आणि त्याची लक्षणं कशी ओळखायची.... (Karan Johan, Ileana D'cruz suffering from mental disease)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2024 02:26 PM2024-07-09T14:26:10+5:302024-07-09T14:58:10+5:30

What Is Body Dysmorphia?: बघा करण जोहर, इलियाना डीक्रूज या कलाकारांना छळणारा 'बॉडी डिसमॉर्फिया' हा आजार नेमका असतो कसा आणि त्याची लक्षणं कशी ओळखायची.... (Karan Johan, Ileana D'cruz suffering from mental disease)

karan johan, ileana d cruz suffering from mental disease body dysmorphia, what is body dysmorphia? what are the symptoms of body dysmorphia? | करण जोहरच नाही तर इलियाना डीक्रूजलाही छळणारा 'बॉडी डिसमॉर्फिया' हा आजार नेमका काय? लक्षणं काय सांगतात..

करण जोहरच नाही तर इलियाना डीक्रूजलाही छळणारा 'बॉडी डिसमॉर्फिया' हा आजार नेमका काय? लक्षणं काय सांगतात..

Highlightsबरेच सर्वसामान्य लोक असेही असू शकतात ज्यांना हा आजार आहे, पण त्याविषयी माहिती नसल्याने तो त्यांना आतापर्यंत ओळखताच आलेला नाही.

वेगवेगळ्या शारिरीक आजारांवर उपचार होणं जसं गरजेचं असतं, तसंच मानसिक आजारांवरही वेळीच उपचार करणं गरजेचं असतं. हल्ली तर सततचा ताण, टेन्शन, स्पर्धा यामुळे शारिरीक आजारांप्रमाणेच मानसिक त्रासही खूप वाढले आहेत. बॉडी डिसमार्फिया हा आजारही एक प्रकारचा मानसिक आजार असून करण जोहर आणि इलियाना डिक्रुझ हे बॉलीवूड सेलिब्रिटी या आजाराचा सामना करत आहेत. या दोघांनीही त्यांचा हा आजार ओळखला आणि उघडपणे तो सगळ्यांसमोर मान्यदेखील केला. पण बरेच सर्वसामान्य लोक असेही असू शकतात ज्यांना हा आजार आहे, पण त्याविषयी माहिती नसल्याने तो त्यांना आतापर्यंत ओळखताच आलेला नाही. म्हणूनच पाहा बॉडी डिसमॉर्फिया हा आजार नेमका असतो कसा आणि काय त्याची लक्षणं...(Karan Johan, Ileana D'cruz suffering from mental disease body dysmorphia)

 

बॉडी डिसमॉर्फिया आजार कसा असतो?

अनेक अभ्यासक असं म्हणतात की बॉडी डिसमॉर्फिया हा एक काल्पनिक मानसिक आजार आहे. कारण या आजारात त्या व्यक्तींनी स्वत:भोवती असा समज करून घेतलेला असतो की त्यांच्यामध्ये काहीतरी शारिरीक व्यंग किंवा कमतरता आहे. वास्तविक पाहता ते व्यंग नसतंच.

पावसाळ्यात साप घरात येण्याची भीती वाटते? ३ उपाय करा, साप घराच्या आसपासही फिरकणार नाही

किंवा त्यांना त्यांच्या शरीरात जी काही कमतरता जाणवत असते ती समोरच्या व्यक्तीला मुळीच दिसत नाही. पण या आजाराने त्रस्त असणारे लोक मात्र कायम त्याच गोष्टींचा विचार करतात. त्यांच्या मते त्यांच्यामध्ये जी उणीव आहे, व्यंग आहे ते इतर कोणाला दिसेल काय, लोक ते पाहतील का असे विचार सतत त्यांच्या मनात येत असतात. या आजारामुळे त्यांना आत्मविश्वासही कमी होतो.

 

बॉडी डिसमॉर्फिया या आजाराचं लक्षण

स्वत:बद्दल सतत असं काही वाटणं हेच बॉडी डिसमॉर्फिया या आजाराचं लक्षण आहे. तुम्हाला जर असं स्वत:बद्दल सतत वाटत असेल, आपण कसे दिसतो, लोकांचं आपल्याकडे लक्ष आहे का?

रिमझिम पावसात करून खा मुगाच्या डाळीची खमंग भजी, चवीला मस्त- पचायला हलकी, बघा रेसिपी 

 याचा विचार सतत डोक्यात येत असेल तर एकदा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. एका विशिष्ट वयातच हा आजार होतो, असं काहीही नाही. तुम्हाला कोणत्याही वयात या बॉडी डिसमॉर्फियाचा त्रास जाणवू शकतो.  

 

Web Title: karan johan, ileana d cruz suffering from mental disease body dysmorphia, what is body dysmorphia? what are the symptoms of body dysmorphia?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.