Lokmat Sakhi >Mental Health > स्वतःवर प्रेम करा, पण कसं? 5 गोष्टी करा, पडाल स्वतःच्याच प्रेमात

स्वतःवर प्रेम करा, पण कसं? 5 गोष्टी करा, पडाल स्वतःच्याच प्रेमात

आज अनेक मानसिक समस्यांचं मूळ स्वत:कडे दुर्लक्ष होण्यात सापडते असं अभ्यास सांगतो. त्यामुळेच तज्ज्ञ अनेक समस्यांवरचा एक उपाय म्हणून स्वत:वर प्रेम करण्याचा, स्वत:ला आनंदी ठेवण्याचा सल्ला देतात. स्वत:वर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 06:28 PM2022-03-05T18:28:27+5:302022-03-05T18:36:23+5:30

आज अनेक मानसिक समस्यांचं मूळ स्वत:कडे दुर्लक्ष होण्यात सापडते असं अभ्यास सांगतो. त्यामुळेच तज्ज्ञ अनेक समस्यांवरचा एक उपाय म्हणून स्वत:वर प्रेम करण्याचा, स्वत:ला आनंदी ठेवण्याचा सल्ला देतात. स्वत:वर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं?

Love yourself, but how? Do 5 things, fall in love with yourself | स्वतःवर प्रेम करा, पण कसं? 5 गोष्टी करा, पडाल स्वतःच्याच प्रेमात

स्वतःवर प्रेम करा, पण कसं? 5 गोष्टी करा, पडाल स्वतःच्याच प्रेमात

Highlightsस्वत:वर प्रेम करण्यासाठी आपल्याला काय आवडतं ते ओळखणं, त्यासाठी वेळ काढणं, वेळ देणं हे जमायला हवं.बळजबरीनं एखादी गोष्ट करण्यात मनावर जे दडपण येतं ते नाही म्हणता आल्यानं एकदम उतरतं.स्वत:मधल्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन सतत चुका, दोष शोधत राहिल्यास आपलं आपल्यावरचं प्रेम कमी होतं.

आपल्यावर आपल्या जवळच्यांचं असलेलं प्रेम कमी झालं की जीव तुटतो, दुखावला जातो. आपल्या प्रियजनांच्या प्रेमासाठी आपला जीव तळमळतो हे खरं. पण आपल्या आपल्या स्वत:वरच्या प्रेमाची, काळजीचीही तितकीच गरज असतो. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते इतरांच्या प्रेमाच्या तुलनेतन् स्वत:वरल्या स्वत:च्या प्रेमाची आपल्याला जास्त गरज असते. पण हीच गरज पुरवण्यास प्रामुख्याने महिला कमी पडतात. आपल्या आनंदाचा मार्ग इतरांनी आपल्यावर केलेल्या प्रेमात जसा सापडतो तसाच तो मार्ग जर आपण आपल्या प्रेमात असू तर जास्त लवकर सापडतो,मानसोपचार तज्ज्ञ प्रेमाबद्दल बोलताना म्हणतात, की आपण आपल्या स्वत:वर प्रेम करु तेव्हाचआपण इतरांवर प्रेम करु शकतो,पण हे स्वत:वर प्रेम करणं वाटते तितकी सहज गोष्ट नाही.

 

Image: Google

आज अनेक मानसिक समस्यांचं मूळ स्वत:कडे दुर्लक्ष होण्यात सापडते असं अभ्यास सांगतो. त्यामुळेच तज्ज्ञ अनेक समस्यांवरचा एक उपाय म्हणून स्वत:वर प्रेम करण्याचा, स्वत:ला आनंदी ठेवण्याचा सल्ला देतात. वाचताक्षणी सोपा वाटणारा हा उपाय सहजासहजी शक्य होत नाही. स्वत:वर प्रेम करण्याच्या तुलनेत, स्वत:ची काळजी घेण्यापेक्षा जास्त सोपं इतरांवर प्रेम करणं सोपं वाटतं, दुसऱ्यांची काळजी कशी घ्यायची ते माहित असतं. जेव्हा स्वत:च स्वत:वर प्रेम करण्याची वेळ येते तेव्हा अनेकींना आपण स्वार्थी तर नाही आहोत, आपण चूक तर नाही ना करत अशा अपराधीभावाच्या शंका येतात. स्वत:वर प्रेम करणं हे अवघड वाटत असलं तरी काही उपायांमुळे हा उपाय सहज करता येतो.

स्वत:वर प्रेम करण्यासाठी..

Image: Google

1.आपल्याला काय आवडतं ते ओळखा

इतरांची काळजी घेणं, कोणाला काय हवं नको ते बघणं, हा गुण महिलांची ताकद आहे. याच गुणांद्वारे त्या इतरांचं मन जिंकतात. पण अशी दुसऱ्यांची आवड निवड जपता जपता मात्र त्या स्वत:कडे पूर्ण दुर्लक्ष करतात. आपल्याला काय आवडतं याची दखल घेण्यास विसरतात. पण तज्ज्ञ सांगतात , की स्वत:वर प्रेम करण्यासाठी आपल्याला काय आवडतं ते ओळखणं, त्यासाठी वेळ काढणं, वेळ देणं हे जमलं तर स्वत:वर प्रेम करणं जमू शकतं. आपल्याला जे आवडतं ते ओळखता येणं जितकं महत्त्वाचं तितकंच आपल्याला काय आवडत नाही हे ओळखून ते बळजबरीनं करावं लागत असल्यास त्याला रोखणं यामुळेही स्वत:वरचं प्रेम वाढू शकतं. 

Image: Google

2. नाही म्हणण्यास शिकणं...

कोणी तोंडातून अमूक शब्द उच्चारताच आपली इच्छा असो वा नसो तो झेलण्याची सवय लागलेली असल्यास कुठल्या गोष्टीला नाही म्हणणं शक्य होत नाही. मग अशा परिस्थितीत जे आवडत नाही त्यालाही हो म्हणावं लागतं. पण यामुळे आपण आपल्या आनंदात स्वत:च अडथळे निर्माण करतो असं तज्ज्ञ म्हणतात. स्वत:ला आनंदी करायचं असेल, स्वत:वर प्रेम करायचं असेल तर जे आवडत नाही, जे शक्य नाही त्याला नाही म्हणायला शिकावं. बळजबरीनं एखादी गोष्ट करण्यात मनावर जे दडपण येतं ते नाही म्हणता आल्यानं एकदम उतरतं. मन हलकं फुलकं ठेवण्यासाठी , आनंदी जगण्यासाठी सतत हो म्हणण्याचं दडपण झुगारुन नाही म्हणता येणं ही आवश्यक बाब असल्याचं तज्ज्ञ म्हणतात. 

Image: Google

3. इतरांशी तुलना करु नका

आपल्याकडे जे आहे ते न बघता सतत इतरांकडे किती जास्त, किती छान आहे, हे बघण्याची सवय असल्यास मन स्वत:बद्दल कायम असमाधानी राहातं. सुखाचा मार्ग समाधानात असतो. हे समाधान तेव्हाच लाभतं जेव्हा आपण आपल्याकडे काय आहे ते बघतो. आपली आणि इतरांची तुलना करणं थांबवल्यास आपल्याकडे जे आहे त्याकडे बघण्याचा, त्यावर मेहनत घेण्याचा मार्ग सापडतो. 

Image: Google

4. स्वत:ची ताकद ओळखा

तज्ज्ञ म्हणतात सतत इतरांवर टीका करता करता आपण स्वत:वरही टीका करु लागतो. स्वत:मधल्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन सतत चुका, दोष शोधत राहातो. यामुळे आपलं आपल्यावरचं प्रेम कमी होतं.  स्वत:तल्या ताकदीचा, गुणांचा आदर करता आला तर आपल्यातली नकारात्मकता कमी होवून इतरांकडे बघताना दोष टाळून गुणांचा, त्यांच्यातील ताकदीचा विचार करता येणं शक्य होतं असं तज्ज्ञ म्हणतात.

Image: Google 

5. स्वत:ला माफ करा

इतरांच्या चुका आपण सहजासहजी माफ करु शकतो. पण स्वत:ला माफ करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपण हात आखडता घेतो. छोटीशी चूक झाली तरी स्वत:ला दोष देत राहाण्याच्या सवयीमुळे आपलं आपल्यावरचं प्रेम कमी होतं. त्यामुळे तज्ज्ञ म्हणतात स्वत:कडून छोट्या मोठ्या चुका होणं सामान्य बाब आहे. पण त्यासाठी स्वत:ला सतत दोष देत राहाणं , स्वत:ला कधीच माफ न करणं ही सामान्य बाब नाही. चुकांसाठी स्वत:ला माफ करुन पुढे जाता आलं तरच आपण आपल्यावर प्रेम करु शकतो असं तज्ज्ञ म्हणतात. 

Web Title: Love yourself, but how? Do 5 things, fall in love with yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.