शरीराला जसे आजार होतात तसेच मनाला देखील होतात. शरीराचे आजार मान्य होतात, ते इतरांना सांगितले जातात, त्या आजारांचं लाड कौतुक केलं जातं, करवून घेतलं जातं. पण तशी परिस्थिती मानसिक आजारांबाबत मात्र नसते. मानसिक आजार लपवले जातात. त्याबद्दल बोललं जात नाही. ही परिस्थिती अजूनही आजूबाजूला दिसते. मात्र स्टार कॅटेगिरीतले अभिनेते, अभिनेत्री, त्यांचे नातेवईक, खेळाडू मात्र मोकळेपणानं स्वत:ला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल बोलतात. हे त्रास सहन करताना काय होत होतं, त्यातून आपण कसे बाहेर पडलो याबद्दल मोकळेपणानं सांगतात. त्यामागे त्यांचा उद्देश कोणीही आपल्या मानसिक आजाराकडे दुर्लक्ष करु नये, त्यांना स्वीकारावं आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी उपचार घ्यावेत, स्वत: प्रयत्न करावेत, इतरांची मदत घ्यावी हाच असतो. मॉडेल अभिनेता मिलिंद सोमण याची पत्नी अंकिता कोंवरही देखील बॉलिवूड जगात प्रसिध्द आहे. मिलिंद सोबतचे फिटनेस व्हिडीओ समाजमाध्यमांवरुन सतत व्हायरल होत असतात. सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अंकिता तिला झालेल्या डिप्रेशनच्या आजाराबद्द्ल बोलते.
Image: Google
अंकिता म्हणते, मी डिप्रेशनच्या त्रासातून गेले, त्यातून बाहेर पडले. पण अजूनही मला अँंग्झायटीचे (अस्वस्थतेचे) झटके मधून मधून येत असतात. पण त्यांचा सामना करण्याचं तंत्र मी शिकले आहे. अंकिता आपल्या या तंत्राबद्दल सांगते. स्वत:वर प्रेम करणं हे एक माध्यम आहे डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचं, अँंग्झायटीशी लढण्याचं. मी आता स्वत:वर प्रेम करायला शिकले आहे असं अंकिता सांगते .
https://www.instagram.com/reel/CUcqwCzInRh/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" data-instgrm-version="14" style=" background:#FFF; border:0; border-radius:3px; box-shadow:0 0 1px 0 rgba(0,0,0,0.5),0 1px 10px 0 rgba(0,0,0,0.15); margin: 1px; max-width:540px; min-width:326px; padding:0; width:99.375%; width:-webkit-calc(100% - 2px); width:calc(100% - 2px);">https://www.instagram.com/reel/CUcqwCzInRh/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" style=" background:#FFFFFF; line-height:0; padding:0 0; text-align:center; text-decoration:none; width:100%;" target="_blank">View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमधे अंकिता म्हणते की, अनेक वर्षांपासून आपण नैराश्यात होतो. सोबत अँंग्झायटीचे झटके येत होते, आजही अधून मधून ते येतच असतात. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी मी एक मार्ग शोधला आहे, स्वत:वर प्रेम करण्याचा. रोज सकाळी उठून मी स्वत:ला सांगते की मी स्वत:वर खूप प्रेम करते. असं सांगितलं की मला खूप छान वाटतं. या सेल्फ टॉकचा उपयोग डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी तर झालाच पण अंॅग्झायटीशी लढतानाही मी याच सेल्फ टॉकचा उपयोग करते आहे, असं अंकिता सांगते. ती म्हणते की मी जसं स्वत:ला माझं माझ्यावर प्रेम आहे असं सांगते तसंच आता माझ्याकडे जे काही आहे ते खूप आहे आणि जे माझ्याकडे नाही त्याचं मला काहीच वाटत नाही. स्वत:वर प्रेम करणं हेच खरं प्रेम आहे. हे प्रेमच आपल्याला सगळ्यातून तारतं. त्यामुळे स्वत:वर प्रेम करण्याचा सल्ला अंकिता या व्हिडीओमधून देते.
Image: Google
अंकिता कोंवरच्या या व्हिडीओचं कौतुक होत आहे. स्वत:वर प्रेम करणं हे सोपं नसतं. पण हा मार्ग स्वीकारल्यानंतर काय घडू शकतं हे अंकितानं आपल्या उदाहरणातून दाखवल्यामुळे मानसिक आजारांचा सामना करणार्यांना तिच्या या व्हिडीओचा, त्यातील संदेशाचा नक्कीच फायदा होईल अशी चर्चा समाज माध्यमांवर घडते आहे.