Lokmat Sakhi >Mental Health > वजन आणि कॉर्टिसोल लेव्हल कमी करण्यासाठी प्या खास ५ ड्रिंक्स, तब्येतीत लवकर दिसेल सुधारणा

वजन आणि कॉर्टिसोल लेव्हल कमी करण्यासाठी प्या खास ५ ड्रिंक्स, तब्येतीत लवकर दिसेल सुधारणा

Drinks To Reduce High Cortisol Level : कॉर्टिसोलचं प्रमाण वाढलं की, व्यक्तीचा तणाव वाढतो. अशात कोणत्याही गोष्टीवर फोकस करण्यास समस्या होते. हार्मोन्समध्ये बदल हे वजन वाढण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 13:56 IST2025-01-10T12:40:25+5:302025-01-10T13:56:43+5:30

Drinks To Reduce High Cortisol Level : कॉर्टिसोलचं प्रमाण वाढलं की, व्यक्तीचा तणाव वाढतो. अशात कोणत्याही गोष्टीवर फोकस करण्यास समस्या होते. हार्मोन्समध्ये बदल हे वजन वाढण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.

Morning Drinks To Reduce High Cortisol Level | वजन आणि कॉर्टिसोल लेव्हल कमी करण्यासाठी प्या खास ५ ड्रिंक्स, तब्येतीत लवकर दिसेल सुधारणा

वजन आणि कॉर्टिसोल लेव्हल कमी करण्यासाठी प्या खास ५ ड्रिंक्स, तब्येतीत लवकर दिसेल सुधारणा

Drinks To Reduce High Cortisol Level : आजकाल ऑफिसमधील कामाचा वाढता ताण आणि टार्गेट पूर्ण करण्याचं प्रेशर यामुळे जास्तीत जास्त लोक आजकाल तणावात असतात. कामाच्या वाढत्या प्रेशरमुळे रात्री पुरेशी झोप होत नाही. अशात शरीरात कॉर्टिसोल आणि इतर हार्मोन्समध्ये बदल बघायला मिळतो.

कॉर्टिसोलचं प्रमाण वाढलं की, व्यक्तीचा तणाव वाढतो. अशात कोणत्याही गोष्टीवर फोकस करण्यास समस्या होते. हार्मोन्समध्ये बदल हे वजन वाढण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. तणाव आणि लठ्ठपणामुळे इतरही गंभीर आजारांचा धोका असतो. अशात एक्सपर्ट तुम्हाला सकाळी काही ड्रिंक पिण्याचा सल्ला देतात. हे ड्रिंक्स तुमच्या शरीरातील कॉर्टिसोल आणि वजन नियंत्रित करण्यास मदत करतात. डायटिशिअन मनोली मेहती यांनी यासंबंधी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी ड्रिंक्सची माहिती दिली आहे.

कॉर्टिसोल कंट्रोल करण्यासाठी ड्रिंक

हळद, काळी मिरी आणि अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगर

तुमचा तणाव वाढला असेल तर कॉर्टिसोल लेव्हल कमी करण्यासाठी सकाळी एक ग्लास पाण्यात चिमुटभर हळद, थोडं काळी मिरी पावडर, एक चर्तुथांश मेथीचे दाणे आणि दालचीनी पाडवर मिक्स करा. यात वरून एक छोटा चमचा अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर मिक्स करा. आता यात वरून गरम पाणी टाका आणि सकाळी हळूहळू प्या.

ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये कॅटेचिन, इतर पॉलीफेनॉल्स आणि एल-थीनाइन नावाचे तत्व आढळतात. हे तत्व तणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक शांतता वाढण्यास मदत करतात.

लिंबाचा रस आणि मध

सकाळी लिंबू आणि मधाचं पाणी प्यायल्यानं शरीर डिटॉक्स होतं आणि हार्मोनही बॅलन्स होतात. हे तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एका लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाकून प्या. काही दिवसात तुम्हाला आराम मिळेल आणि पचनक्रियेतही सुधारणा होईल. 

पुदिन्याच्या चहा

पुदिन्याच्या चहामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स गुण असतात, जे तुमचा आळस दूर करण्यास मदत करतात. सोबतच यानं कॉर्टिसोल आणि इतर हार्मोन्स नियंत्रित करण्यास मदत मिळते. तसेच वजन कमी करण्यासही मदत मिळते.

अश्वगंधाचा चहा

शरीरात वाढणारा मानसिक तणाव दूर करण्यासाठी तुम्ही अश्वगंधाचा चहा पिऊ शकता. अश्वगंधाच्या नियमित वापरानं मेंदुला शांतता मिळते आणि झोपेतही सुधारणा होते. याच्या मदतीनं कॉर्टिसोल हार्मोनची लेव्हलही सामान्य राहते.

Web Title: Morning Drinks To Reduce High Cortisol Level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.