''स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'' हे खरंच आहे. आई आणि मुलाचं नातं खूप खास असतं. मुलं कितीही मोठी झाली तरी देखील आईसाठी लहानच असतात. आईवरचं हेच प्रेम व्यक्त करण्यासाठी जागतिक मातृदिन म्हणजेच मदर्स डे साजरा केला जातो. तुम्ही तुमच्या आईसाठी काय स्पेशल कराल आज?
मुलं मोठी झाली, कमावती झाली की आईसाठी काहीतरी खास करुच शकतात. असं काही जे तिनं स्वत:साठी कधी केलं नाही, कारण तिनं स्वत:ला बाजूला सारुन मुलांसाठीच्या खर्चाला प्राधान्य दिलं. आपलं सुख कधी पैशाशी जोडलं नाही. त्यामुळे कमावत्या मुलांनी तरी आईसाठी काही स्पेशल करायलाच हवं(Mother's Day: How you can make this Sunday more special for your mom?).
आईचं फोटोशूट
आई स्वतःसाठी कधीच वेळ काढत नाही. ती स्वतःला वेळ देऊन मेकअप जास्त करत नाही. कामाच्या व्यापात तिला या गोष्टींसाठी वेळ मिळत नाही. पण तिला आवडणार असेल तर या मातृदिनी आपल्या आईचा सुंदर मेकअप-मेकओव्हर करुन फोटोशूट करा.
आई झाल्यानंतर वजन वाढलं, व्यायामाला वेळच नाही? करा फक्त २ सोपे व्यायाम, व्हा फिट आई
आईला काय आवडतं?
आई बाराही महिने आपल्या घरातल्यांसाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवते. पण कधी आपण तिच्या आवडीचा विचार केला आहे का? यंदा तुम्ही तिच्या आवडीचा बेत करा. आईच्या आवडीचे सगळे पदार्थ करा.
ट्रेण्डी गॅजेट भेट
तिला नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती द्या. शिकवा आणि फोनपासून किचनच्या उपकरणापर्यंत आवडतं गॅजेट घेऊन द्या.
चाळीशीनंतर महिलांचं वजन का वाढतं? वय वाढलं की वजन वाढतंच का? तज्ज्ञ सांगतात, एक उपाय
स्पा आणि रिलॅक्स
आईलाही जरा निवांतपणा द्या. एखादं स्पा कुपन,फेशियल.. जे तिला आवडेल जरा स्ट्रेस फ्री करेल असं काही करा.
मुव्ही नाईट प्लॅन
साहजिक आपल्या आईला क्लासिक मुव्ही आवडत असतील. दिवसाच्या शेवटी तिच्यासाठी खास, तिच्या आवडीचा चित्रपट लावा. आईसाठी खास घरातच चित्रपटगृहाचा माहौल तयार करा.