प्रत्येक नात्याची संकल्पना वेगळी असते. नात्याला मजबुती मिळते ती प्रेमाने. एखाद्यावर आपण किती प्रेम करतो, त्या व्यक्तीचा किती आदर करतो याला फार महत्त्व असते. (National Hugging Day: Hug Matters ) बरोचदा असं होतं की, प्रेम आहे पण तरी त्या नात्यात आपुलकी नाही. त्या नात्यात दिलासा कमी असतो. असं का होतं? प्रेम नुसते असून उपयोग नाही. ते व्यक्त करता आले पाहिजे. बरेचदा आपण ते व्यक्त करण्यात कमी पडतो. (National Hugging Day: Hug Matters ) एखाद्यावर आपण किती प्रेम करतो, याची जाणीव त्याला सतत करून देणे महत्त्वाचे असते. मग ते नाते फक्त प्रियसी- प्रियकराचेच असते असे नाही. आईबरोबरचे नाते, वडिलांबरोबरचे नाते, भावंडांबरोबरचे नाते आणि मैत्रीचे नाते देखील. प्रत्येक नात्याची उब वेगळी असते. नात्यात कितीही ताणतणाव असला तरी प्रेम असतेच. उणीव असते ती व्यक्त होण्याची. आपण समोरच्याला आपल्या प्रेमाची जाणीव करून देत नाही.(National Hugging Day: Hug Matters ) संवादाची कमतरता असतेच. पण स्पर्शाची कमतरताही असते. ज्याला आपण 'फिजिकल टच' असं म्हणतो.
मानसोपचारतज्ज्ञही सांगतात, आपल्या जवळच्या माणसांचा स्पर्श भावनांवर परिणाम करते. म्हणून एखाद्या दुर्दैवी घटनेनंतर पिडिताला मिठी मारतात. हातात हात धरल्याने किंवा मिठी मारल्याने डोक्यातील विचार शांत होतात. एकटेपणाची भावना नाहीशी होते. आपल्याला आधार देणारी माणसं आजूबाजूला असल्याची जाणीव होते. आपण आपल्या माणसांना मिठी मारायला मुकतो. पण तसे करू नका. भेटल्यानंतर हात मिळवून भेटा. अगदी जवळच्या माणसांना मिठी मारून भेटा. एखादा जर वाईट काळातून जात असेल तर, त्याला आपली एक मिठी आधार वाटते. आनंदाच्या क्षणांमध्येही मिठी मारून अभिनंदन करा. आपण आई-वडिलांना मिठी मारायला विसरूनच जातो. त्यांना तुमचे प्रेम जाणवू द्या.अगदी नवरा बायकोच्या नात्यालाही हा नियम लागू होतो. सेक्स लाइफ कितीही चांगली असू द्या. तरी बरेचदा मीठीची उणीव असते. दोन्ही कृतींमधील भावना आपल्याला सारख्या वाटतात. पण त्या वेगळ्या आहेत.
मिठीला आपण 'कम्फर्ट प्रोव्हाइडर' म्हणू शकतो. मैत्रीच्या नात्यातही आपण प्रेम व्यक्त करायला विसरून जातो. इतर नात्यांसारखीच मैत्रीही महत्त्वाची असते. मित्रांमध्ये अनेकदा दुरावा निर्माण होतो. हा दुरावा दूर करण्याची ताकद या मिठीत आहे. जर कोणाशी भांडण वगैरे झालं आहे. त्या माणसाची उणीव भासतेय. तर त्याला जादूची झप्पी देऊन तर बघा. नातं पुन्हा पूर्वीसारखंच आनंदी होऊन जाईल.