Lokmat Sakhi >Mental Health > Navratri 2022 : पॉवर ऑफ इमोशन, या नवरात्रात शिका स्वत:च्या भावना ओळखण्याचे तंत्र, पाहा ३ सूत्र..

Navratri 2022 : पॉवर ऑफ इमोशन, या नवरात्रात शिका स्वत:च्या भावना ओळखण्याचे तंत्र, पाहा ३ सूत्र..

Navratri 2022 Tips Regarding How To Handle Emotions : नवरात्रीच्या निमित्ताने भावनांचे नियोजन कसे करता येईल याविषयी समजून घेणार आहोत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2022 10:10 AM2022-09-26T10:10:14+5:302022-09-26T10:15:02+5:30

Navratri 2022 Tips Regarding How To Handle Emotions : नवरात्रीच्या निमित्ताने भावनांचे नियोजन कसे करता येईल याविषयी समजून घेणार आहोत.

Navratri 2022 : Power of Emotions, this Navratri learn techniques to identify your emotions, see 3 sutras.. | Navratri 2022 : पॉवर ऑफ इमोशन, या नवरात्रात शिका स्वत:च्या भावना ओळखण्याचे तंत्र, पाहा ३ सूत्र..

Navratri 2022 : पॉवर ऑफ इमोशन, या नवरात्रात शिका स्वत:च्या भावना ओळखण्याचे तंत्र, पाहा ३ सूत्र..

Highlightsकोणतीच भावना नकरात्मक म्हणून आपल्याला कायमची हद्दपार करायची नाही. तर, प्रत्येक भावनेचं नियोजन करायचं आहे.आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, शारिरिक परिस्थितीनुसार त्या व्यक्तीच्या भावनेची गुणवत्ता ठरवणे योग्य नाही

सुचेता कडेठाणकर 

नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याचा दहावा दिवस आपण नऊ वेगवेगळ्या भावनांना नव्याने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरेचवेळा आपण काही भावनांना गृहित धरतो. म्हणजे, मला अमूक गोष्ट सहन होत नाही म्हणजे नाहीच किंवा अमूक एका माणसाबरोबर मला कायम छानच वाटतं. असं आपण गृहित धरतो आणि मग एखाद्या वेळी ती व्यक्ती बरोबर असूनही छान वाटलं नाही, तर आपण त्याचा दोष त्या व्यक्तीला देतो. प्रेम, आनंद, भीती, दुःख, राग, नैराश्य, आशा, धैर्य, आश्चर्य, किळस अशा कित्येक भावना आपण सर्व जण विविध परिस्थितीनुसार अनुभवतो आणि दाखवतो. या सर्वांबद्द्ल थोडा विचार करु. हे मुद्दे पटतात का बघा आणि थोजा विचार करा (Navratri 2022 Tips Regarding How To Handle Emotions). 

(Image : Google)
(Image : Google)

१. सगळ्या भावना तितक्याच महत्त्वाच्या 

कोणतीही भावना निरुपयोगी किंवा टाकाऊ नसते. सर्व भावना महत्वाच्या आणि उपयोगी असतात. उदा- राग किंवा निराशा या भावना नकारात्मक मानल्या जातात. पण त्या पूर्णपणे टाकाऊ नाहीत. राग आला नाही तर लढण्याची जिद्द कशी निर्माण होणार. निराशा नसेल, तर मनुष्य नवीन मार्ग कसे शोधणार. म्हणजे, कोणतीच भावना नकरात्मक म्हणून आपल्याला कायमची हद्दपार करायची नाही. तर, प्रत्येक भावनेचं नियोजन करायचं आहे. म्हणजे काय, तर मोबाईलची रिंग पूर्ण सायलेंट देखील नाही करायची आणि volume full सुद्धा नाही ठेवायचा. सहन होईल आणि काम होईल एवढा आवाज ठेवायचा. 
 
२. व्यक्ती कोणीही असो भावना पोहोचणे महत्त्वाचे

एखाद्या व्यक्तीची भावना महत्वाची आणि दुसऱ्या व्यक्तीची तीच भावना मात्र बिन महत्वाची असं कधीच नसतं. उदा - पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीला उत्तम जेवण झाल्यावर निर्माण होणारी तृप्तीची भावना जास्त महत्वाची आणि सामान्य माणसाला उत्तम जेवणानंतर जाणवलेली तृप्तीची भावना कमी महत्वाची असू शकेल का? नक्की नाही. म्हणजेच आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, शारिरिक परिस्थितीनुसार त्या व्यक्तीच्या भावनेचं आणि पर्यायाने त्या व्यक्तीची गुणवत्ता ठरवणे योग्य ठरणार नाही. 

३. एखाद्या गोष्टीवरुन व्यक्तीबद्दल अंदाज बांधणं योग्य नाही 

एकाच प्रसंगात दोन व्यक्तींना निरनिराळ्या भावना जाणवू शकतात आणि त्या दोन्हीही भावना तितक्याच खऱ्या असू शकतात. उदा - दिवाळीमध्ये फटाक्यांचा आवाज ऐकून एखाद्या व्यक्तीला आनंद होत असेल, तर दुसऱ्या व्यक्तीला त्याच आवाजाची भीती वाटू शकेल. दोन्हीही भावना सच्च्या आहेत. पण त्यावरुन आपण त्या व्यक्तीबद्दल अंदाज बांधणं चुकीचं होईल.

(लेखिका योगतज्ज्ञ आहेत)

sucheta@kohamschoolofyoga.com


 

Web Title: Navratri 2022 : Power of Emotions, this Navratri learn techniques to identify your emotions, see 3 sutras..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.