सुचेता कडेठाणकर
आपल्या सर्वांना माहीत आहे, की सर्व सजीवांमध्ये माणसाचं वेगळं स्थान निर्माण होण्यामागे काही कारण असेल, तर ते आहे माणसाची बुद्धी. बुद्धी म्हणजे, “माहिती” नव्हे. गुगल किंवा पुस्तकं किंवा शाळा किंवा कॉलेजमध्ये जाऊन आपण घेतो, ते असतं सीमित ज्ञान. परंतु आपल्याला मिळालेलं ज्ञान केव्हा, कसं वापरायचं आणि केव्हा, कसं वापरायचं नाही हे सागणारी ती आपली बुद्धी. ही बुद्धी असीम आहे, विवेकी आहे. आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या भावनांना बुद्धीची जोड मिळाली की जो विचार होतो, तो मानवतेचा विचार (Navratri 2022 Special Dasra Emotion of Humanity).
भावनांचं नियोजन करण्याचा विचार जेव्हा जेव्हा आपण करतो, तेव्हा मुख्यतवे करुन नकारात्मक विचार आणि भावनांचे नियोजन करण्याचा विचार येतो. कारण आपल्याला त्रासदायक वाटणाऱ्या भावना मुळात नकारात्मक असतात. परंतु सकारात्मक भावनांचा अतिरेक सुद्धा टाळायलाच हवा. एक गोष्ट लक्षात ठेवता येईल ती अशी -भावना सर्व प्राणीमात्रांना असतातच. परंतु या भावनांमध्ये केवळ स्वतःच्या अस्तित्वाचा विचार असतो, तेव्हा ती भावना जाते पाशवी पातळीवर. जेव्हा या भावनांमध्ये स्वतः बरोबरच इतरांचा विचार येतो, तेव्ही ती भावना येते मानवतेच्या पातळीवर.
दसऱ्याच्या या मंगलदिवशी आपण सर्व भावनांच्या सीमा ओलांडून माणूसपणाच्या एकाच भावनेकडे जायची इच्छा ठेवली, तर खऱ्या अर्थानं सीमोल्लघंन होईल.
(लेखिका योगतज्ज्ञ आहेत.)
sucheta@kohamschoolofyoga.com