सरतं वर्ष संपतं तेव्हा आपण सगळेच वर्षाला निरोप देताना पार्टी प्लॅन करतो. गेल्या वर्षाला निरोप देताना वर्ष किती पटकन गेलं असं म्हणत वर्षभरात घडलेल्या गोष्टी आठवतो. येत्या वर्षात काय काय प्लॅन करायचं याचंही नियोजन करतो. जानेवारीच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात या गोष्टी नेमाने केल्याही जातात. मात्र जसे दिवस जातात तशा त्यातल्या काही गोष्टी मागे पडतात. पण नवीन वर्षाची सुरुवात आनंदात आणि उत्साहात करायची तर आवर्जून करायलाच हव्यात अशा गोष्टी (New Year Resolutions and Plans)
१ सकारात्मक गोष्टी आठवा
गेल्या वर्षात काय घडले याचा विचार करताना आपल्या डोक्यात साधारणपणे नकारात्मक गोष्टी आधी येतात. मात्र आपल्याला कोणती नवी माणसे भेटली, वर्षभरात आपण नव्याने काय शिकलो, कोणत्या गोष्टी साध्य केल्या हे आठवत नाही.पण नवीन वर्षात पाऊल टाकताना या सकारात्मक गोष्टी आठवायला हव्यात. इतकेच नाही तर नवीन वर्षातही आपण कोणत्या चांगल्या गोष्टी करु शकतो यांची यादी करुन दररोज झोपताना कोणत्या चांगल्या गोष्टी आपण केल्या हे आवर्जून आठवायला हवे.
(Image : Google)
२ स्वत:साठी काही वेळ राखून ठेवायचे ठरवा
आपण रोज उठून घरातली कामं करतो, ऑफीसला जातो, दैनंदिन व्यवहार करतो. पण यामध्ये अनेकदा आपण स्वत:ला वेळ देतोच असे नाही. पण नवीन वर्षात आपण व्यायाम, एखादा छंद, आपल्या आवडीच्या गोष्टी, आपल्या मित्रमैत्रीणींना वेळ देणे अशा गोष्टी आवर्जून करायला हव्यात. त्याबाबत योग्य नियोजन करुन या गोष्टी प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
(Image : Google)
३ ध्येय निश्चित करा आणि त्यादृष्टीने प्रयत्न करा
आपल्याला शिक्षणाच्या, करिअरच्यादृष्टीने कोणत्या गोष्टी नव्याने शिकायला हव्यात ते शोधा. त्यादृष्टीने काहीतरी करायला हवे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना आपल्याला अमुक एक गोष्ट या वर्षात साध्य करायची आहे त्याबाबतचे नियोजन करा. आर्थिकदृष्ट्या काही ध्येय गाठायची असतील तर त्यादृष्टीने प्रयत्न करा.
आशा आहे की नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल. आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि आपल्या सर्व आशा पूर्ण होतील.सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.