Lokmat Sakhi >Mental Health > ऑफिसचे काम, अभ्यास करताना फोकसच करता येत नाही, एकाग्रता कमी?... ३ सोपे योग प्रकार... मन, मेंदू होईल एकाग्र... 

ऑफिसचे काम, अभ्यास करताना फोकसच करता येत नाही, एकाग्रता कमी?... ३ सोपे योग प्रकार... मन, मेंदू होईल एकाग्र... 

Improve Your Focus : Types Of Yoga : एकाग्रता वाढविण्यासाठी आपण प्रामुख्याने काही खास योगा प्रकारांचा वापर करून आपली एकाग्रता वाढवू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2023 03:17 PM2023-01-31T15:17:50+5:302023-01-31T15:31:56+5:30

Improve Your Focus : Types Of Yoga : एकाग्रता वाढविण्यासाठी आपण प्रामुख्याने काही खास योगा प्रकारांचा वापर करून आपली एकाग्रता वाढवू शकतो.

Office work, can't focus while studying, low concentration?... 3 simple yoga types... mind, brain will be concentrated... | ऑफिसचे काम, अभ्यास करताना फोकसच करता येत नाही, एकाग्रता कमी?... ३ सोपे योग प्रकार... मन, मेंदू होईल एकाग्र... 

ऑफिसचे काम, अभ्यास करताना फोकसच करता येत नाही, एकाग्रता कमी?... ३ सोपे योग प्रकार... मन, मेंदू होईल एकाग्र... 

कोणत्याही प्रकारचे काम करण्यासाठी एकाग्रता महत्वाची असते. एकाग्रतेशिवाय आपण कोणतेही काम करू शकत नाही. भारतीय जीवन आणि प्राचीन कथांमध्ये देखील एकाग्रतेचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे. आपल्याला जर यश मिळवायचे असेल तर एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे. आजही बऱ्याच लोकांना आव्हानात्मक काम करण्यामध्ये प्रचंड अडचणी येतात. महत्त्वाच्या परीक्षेचा अभ्यास करणे असो, मोठ्या प्रोजेक्टवर काम करणे असो. आपल्याला ते एखादे विशिष्ट काम करण्याची इच्छाशक्ती असते मात्र लक्ष कसे केंद्रित करावे हे मात्र आपल्याला समजत नसते. अनेक अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की योगा आणि ध्यानधारणा नियमित केल्याने एकाग्रता वाढविण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत होते. एकाग्रता वाढविण्यासाठी आपण प्रामुख्याने काही खास योगा प्रकारांचा वापर करून आपली एकाग्रता वाढवू शकतो. कोणती आहेत ती योगासन पाहुयात(Improve Your Focus : Types Of Yoga).

एकाग्रता वाढविण्यासाठी कोणते आहेत तीन योगा प्रकार... 

१. प्रसरिता पदोत्तनासन :- प्रसरिता पदोत्तनासन नैराश्य, ताण, टेन्शन नियंत्रित करण्यात मदत करते. कारण या आसनाचा सराव करताना मेंदूला रक्तपुरवठा होतो. मज्जासंस्थेला आराम देण्यासोबतच श्वसन प्रणाली सुधारण्यासही मदत होते. प्रसारित पदोत्तनासन करताना धड आणि छातीवर दाब येतो. अशा परिस्थितीत जेव्हा पाठीच्या वरच्या आणि खालच्या भागावर ताण येतो तेव्हा श्वासोच्छवासामुळे शरीराला जाणीव होण्यास मदत होते. जागरूकतेने आत्मविश्वास व एकाग्रता वाढण्यास मदत मिळते.  

१. सर्वप्रथम दोन्ही पाय एकमेकांपासून लांब ठेवत दोन्ही पायांत किमान ४ फुटांचे अंतर असावे. 
२. आता दोन्ही हात कमरेवर ठेवून हळुहळु पुढील बाजूस झुका. 
३. त्यानंतर थोड्या वेळाने त्याच स्थितीत हळुहळु वर या. 

२. वृक्षासन :- वृक्षासनाच्या मुद्रेमध्ये उभे राहताना शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे मेंदूवरही ताण पडतो. एका ठिकाणी लक्ष केंद्रित केल्यामुळे स्थिर उभे राहता येते. संतुलन राखताना आपण मानसिकदृष्ट्या सक्षम होत असतो. या आसना दरम्यान पायावर पडणार्‍या ताणावर दुर्लक्ष करुन फोकस करणे आवश्यक असते. परिणामी स्थिर उभे राहण्याच्या प्रयत्नामध्ये आपण जितका वेळ वृक्षासनाचा सराव करु, तितका वेळ आपण अप्रत्यक्षरित्या एकाग्रतेचा सराव देखील करत असतो.

१. सर्वप्रथम सरळ ताठ उभे रहावे. 
२.  दोन्ही हात मांड्याजवळ घेऊन जा, त्यानंतर उजवा पाय गुडघ्यामध्ये दुमडून त्याचा तळवा डाव्या मांडीवर ठेवा.
३. डावा पाय सरळ रेषेत असावा. हे करताना स्वतःच्या श्वाच्छोश्वासावर लक्ष द्या.
४. एक दीर्घ श्वास घ्या. तो श्वास सोडताना दोन्ही हात वरच्या दिशेला घेऊन जा.
५. दोन्ही हात डोक्यावर घेऊन 'नमस्कार' या मुद्रेमध्ये आणा.
६. हे करत असताना डाव्या पायावर येणार्‍या ताणाकडे दुर्लक्ष करण्यासाठी समोरच्या कोणत्याही गोष्टीकडे एकटक पाहत रहा.
७. एक दीर्घ श्वास घ्या. तो श्वास सोडताना दोन्ही हात खालच्या बाजूला घेऊन जा. डाव्या मांडीवर ठेवलेला उजवा पाय खाली जमिनीवर ठेवा.
८. आता डाव्या पायाचा तळवा उजव्या पायावर ठेवून संपूर्ण प्रक्रियेची पुनरावृत्ती करा.

३. परिवृत्त उत्कटासन :- परिवृत्त उत्कटासन या आसनाच्या नावावरूनच हे आसन वेगवान आणि शक्तिशाली असल्याचे लक्षात येते. जेव्हा तुम्ही काल्पनिक खुर्चीवर बसून हे आसन करत असता तेव्हा शरीराला खूप ताकद आणि तग धरण्याची गरज असते. या आसनामुळे संपूर्ण शरीरात स्थिरतेची भावना निर्माण होते. त्यामुळे एकाग्रता वाढविण्यास मदत होते. 

१. सर्वप्रथम ताठ उभे राहा. 
२. आता उजवा पाय हळुहळु थोडा गुडघ्यात दुमडून त्यावर दोन्ही हातांच्या मदतीने डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर स्थिर ठेवा. 
३. आपण खुर्चीत बसताना जसे मागे झुकून बसतो तसेच काल्पनिक खुर्चीत बसल्याची कृती करावी. 
४. आता आपले दोन्ही हात नमस्कारच्या मुद्रेत आणावे आणि शरीराचा सगळा भार उजव्या पायांवर घेण्याचा प्रयत्न करावा.

Web Title: Office work, can't focus while studying, low concentration?... 3 simple yoga types... mind, brain will be concentrated...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.