Lokmat Sakhi >Mental Health > तुम्हाला पॉझिटिव्ह स्ट्रेस आलाय की निगेटिव्ह? आधी आपला स्ट्रेस ओळखा..

तुम्हाला पॉझिटिव्ह स्ट्रेस आलाय की निगेटिव्ह? आधी आपला स्ट्रेस ओळखा..

स्ट्रेस स्ट्रेस म्हणून घाबरण्यापेक्षा आपल्याला आलेला स्ट्रेस चांगला आहे की वाईट हे तर माहित हवं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 01:47 PM2021-07-03T13:47:26+5:302021-07-03T13:51:45+5:30

स्ट्रेस स्ट्रेस म्हणून घाबरण्यापेक्षा आपल्याला आलेला स्ट्रेस चांगला आहे की वाईट हे तर माहित हवं..

positive and negative stress, how to recognize it,manage stress, causes of stress | तुम्हाला पॉझिटिव्ह स्ट्रेस आलाय की निगेटिव्ह? आधी आपला स्ट्रेस ओळखा..

तुम्हाला पॉझिटिव्ह स्ट्रेस आलाय की निगेटिव्ह? आधी आपला स्ट्रेस ओळखा..

Highlights शरीरभर मरगळ बसलेली जाणवते कशातच उत्साह दिसत नाही. आता प्रश्न असा की हा ताण कमी करायचा कसा?

पूनम घाडीगावकर

मला खूप स्ट्रेस आला आहे ! मनावर खूप ताण आहे हे वाक्य सहज ऐकत असतो पण आपण त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. खरे पाहता तणाव (स्ट्रेस) ही शरीरात होणारी सामान्य प्रतिक्रिया असते. तणाव हा फक्त शरिराच्या बदलांना मिळणारा प्रतिसाद असतो. मानसिक ताण ही एक मानवी प्रतिक्रिया आहे, जी प्रत्येकाला होते, खरं
तर मानवी शरीर तणाव अनुभवण्यासाठी आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी डिझाईन केलेले आहे. जेव्हा आपल्याला तणाव जाणवतो तेव्हा तो आपल्या शरीर, भावना आणि बौद्धिक वर परिणाम करताना दिसतो. 
तणाव येणे ही गोष्ट नेहमीच वाईट नसते. सामान्यतः तणाव हा दोन प्रकारात आपल्याला आढळून येतो एक आहे युस्ट्रेस म्हणजेच सकारात्मक ताण आणि डीस्ट्रेस म्हणजे नकारात्मक तणाव. 

 

आता आपण जाणून घेऊ युस्ट्रेस - हा एक सकारात्मक ताण आहे जो आपल्याला लक्ष किंवा ध्येय प्राप्त करण्यासाठी किंवा प्रयत्न करण्यासाठी, योजना आखण्यासाठी मदत करतो. तणाव हा अनेकदा सकारात्मक असू शकतो. तो आपल्याला सतर्क ठेवतो, आपल्याला प्रवृत्त करतो, आणि धोका टाळण्यासाठी तयार ठेवतो. उदाहरणार्थ, आपल्याकडे एखादी महत्त्वाची परीक्षा द्यायची आहे तर तणावग्रस्त प्रतिसाद आपल्या शरीरात अधिक मेहनत करण्यास आणि अधिक जागृत होण्यास मदत करतो. 
परंतु डीस्ट्रेस हा नकारात्मक स्ट्रेस आहे जो आपल्यासाठी एक समस्या बनतो. त्यामुळे आपल्याला सतत तणाव जाणवतो. जेव्हा आपण आपल्या आयुष्यात विविध बदल किंवा आव्हाने अनुभवत असतो तेव्हा आपले शरीर शारीरिक आणि मानसिक नकारात्मक प्रतिक्रिया देऊ लागते.
म्हणजे एक असतो पॉझिटिव्ह स्ट्रेस आणि एक असतो निगेटिव्ह स्ट्रेस.
पण हा स्ट्रेस येतो कुठून?

तणाव - स्ट्रेस कसा निर्माण होतो?


आता आपण बघूया की हा तणाव जो आहे तो कसा निर्माण होतो. 
काही व्यक्ती अवास्तव आणि परिपूर्णतावादी अपेक्षा ठेवतात. 
मनाला अस्वस्थ करणारी विचारसरणी असते, सतत चिंता करतात. नोकरीची असुरक्षितता, आरोग्य आणि वैद्यकीय चिंता, कौटुंबिक कलह, पर्यावरण प्रदूषण आणि सामाजिक त्रास असं बरंच काही एकावेळेस ऐकवतात.
आताही तेच होतं आहे. कोविड. त्यामुळे अनेक जणांना स्ट्रेस आलेला आहे. परीक्षेची अनिश्चितता, आर्थिक धोरणात बदल, नोकरी करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणाचा अभाव, भविष्यातील घटनांबद्दल काळजी वाटणं, आपल्याला किंवा आपल्या प्रियजनांना कोविड होईल की काय याची सतत चिंता, कोविडमुळे डोळ्यासमोर बांधलेला स्क्रीन टाईम, वर्क फ्रॉम होम किंवा मग एखादं व्यसन अशा अनेक बाबींमुळे तणाव जाणवतो. आणि मग स्ट्रेस छळायला लागतो.

 

 

स्ट्रेसचे परिणाम काय होता?

माझ्याकडे बरेच जण येतात. डॉक्टर पाठवतात. म्हणजे शरीराचा एखादा अवयव दुखत आहे पण वैद्यकीयदृष्ट्या काहीही समस्या नाही. खूप स्ट्रेस मुळे शरीराचा एखादा अवयव दुखत असतो. हे त्यांच्या खूप उशिरा लक्षात येते तोपर्यंत अनेक पेनकिलर औषधे घेतलेली असतात. तणावामुळे आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होतात जसं की सतत अंग दुखणे, डोके दुखणे, छातीत दुखणे, श्वसनाला त्रास होणे, झोपे मध्ये अडथळा निर्माण होणे, ब्लडप्रेशर हाय किंवा कमी होणे, शरीराचे अवयव दुखणे, शरीर कमकुवत जाणवणे, तणावामुळे सतत चिंता वाटते, चिडचिड निर्माण होते, अस्वस्थता जाणवते, सतत भीती वाटते, मन दु:खी राहतं, चिडचिड स्वभावामुळे आक्रमकता वाढते, रागीट स्वभाव होऊ शकतो आणि या सगळ्यामुळे कुठेतरी आपल्या दैनंदिन कामावर/जीवनावर परिणाम होतो असतो . मुलांचा अभ्यासावर, वागण्यावर, नोकरी करणाऱ्यांच्या कामावर परिणाम दिसतो. 
नकारात्मक तणावामुळे काही लोक काही गोष्टींच्या आहारी जाताना दिसतात, मद्यपान - धूम्रपान करताना
दिसतात. काहीजण कधीकधी खूप खातात किंवा अन्न ग्रहण करत नाहीत. लोकांमध्ये मिक्स होण्याचे टाळतात, त्यांच्या दैनंदिन गोष्टीमध्ये अडथळे निर्माण होताना दिसतात. शरीरभर मरगळ बसलेली जाणवते कशातच उत्साह दिसत नाही. आता प्रश्न असा की हा ताण कमी करायचा कसा?
ते पुढच्या भागात..


( लेखिका मानसशास्त्रज्ञ असून दिशा कॉउंसेलिंग सेंटर मुंबई येथे काम करतात.)
http://www.dishaforu.com/

Web Title: positive and negative stress, how to recognize it,manage stress, causes of stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य