Join us  

सुप्रसिद्ध गायिका मरीना डायमंडीसला झाला क्रोनिक फटीग सिंड्रोम, रिपोर्ट नॉर्मल पण थकवा सतत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2023 4:09 PM

Singer Marina Diamandis diagnosed with Chronic Fatigue Syndrome : अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिकरित्या कमकुवत असल्याचे दिसते.

कोणतेही विशेष कारण नसताना महिनो न महिने सतत थकल्यासारखे वाटणे, काहीही न करता फक्त आराम करावासा वाटणे, अंगदुखी, डोकेदुखी, नैराश्य यांसारख्या समस्यांनी ग्रस्त असाल तर तुम्हालाही क्रोनिक फटीग सिंड्रोम झाला असू शकतो. प्रसिद्ध गायिका आणि गीतकार असलेल्या मरीना डायमंडीसला हा आजार झाला असून गेले काही महिने ती या आजाराशी झुंज देत आहे. ती म्हणते हेल्दी असणं म्हणजे काय हेच अनेकदा लक्षात येत नाही. असे होण्यामागे नेमके कारण सांगता येत नसून कमकुवत प्रतिकारशक्ती, हार्मोन्सचे असंतुलन किंवा एखादे व्हायरल इन्फेक्शन होणे अशी महत्त्वाची कारणे असू शकतात. यामागे आपली जीवनशैली चांगली असणे आवश्यक असते. व्यायाम, आहार आणि मन:शांती  झोप या ४ गोष्टी महत्त्वाच्या असून त्याकडे पुरेसे लक्ष देणे आवश्यक असते (Singer Marina Diamandis diagnosed with Chronic Fatigue Syndrome).

(Image : Google)

काय असतो क्रोनिक फटीग सिंड्रोम

थकवा जाणवणे ही तशी सर्वसामान्य समस्या आहे. परंतु, सतत थकवा जाणवत असेल, छोटे काम केले तरी थकवा जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नका. कारण हे लक्षण क्रॉनिक फॅटीग सिंड्रोमचे असू शकते. या समस्येत आराम केला तरी सुद्धा थकवा दूर होत नाही. तपासण्या सुद्धा नॉर्मल येतात. ६ महिन्यांपेक्षा जास्त दिवस थकवा जाणवत असल्यास क्रॉनिक फॅटीग सिंड्रोम असल्याचे सांगितले जाते. या आजारात कोणतेही विशेष कारण नसताना व्यक्तीला सतत थकवा येत राहतो. अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिकरित्या कमकुवत असल्याचे दिसते. 

ही परिस्थिती दिर्घकाळ अशीच राहील्यास व्यक्ती नैराश्यात जाण्याची शक्यता असते. हार्मोन्सचे संतुलन न राहणे, रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे अशा समस्या उद्भवल्याने संबंधित व्यक्तीला सतत आजारी असल्यासारखे वाटते. अशाप्रकारे सतत थकवा येत असेल तर त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या करणे, त्यातील निदानानुसार योग्य ते उपचार आणि औषधे घेणे अतिशय गरजेचे असते. 

हा आजार झाला आहे हे कसे ओळखाल? 

(Image : Google)

1. सतत सांधेदुखीचा त्रास.

2. झोप न येणे. झोपल्यानंतरही आळस राहणे

3. स्मरणशक्तीची समस्या.

4. सतत घसा खराब होणे.

5. थोडी शारीरिक मेहनत केली अधिक काळ आजारी असल्यासारखे वाटणे.

6. थकवा आल्यामुळे डोकेदुखीचा त्रास.

7. स्नायूंमध्ये सतत वेदना.

 

टॅग्स :मानसिक आरोग्यआरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल